मराठीतीळ स्त्रीधन | Marathitil Streedhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathitil Streedhan by सरोजनी बाबर - Sarojani babar

More Information About Author :

No Information available about सरोजनी बाबर - Sarojani babar

Add Infomation AboutSarojani babar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कुळाचार पपरा अशी एऐंटी मिरवली तर ती वाखाणली गेली. शून्यातून विश्‍व उभं करीत मनातील एऐंश्वर्य भोगायची तिची ही कल्पना अठरा विश्‍वे दारिद्रय असलेल्या घरातही स्वीकारण्याजोगी ठरली. त्याचप्रमाणं वरचेवर माहेरचं मूळ येऊनही माहेरी पाठविताना काचकूच करणाऱ्या शंकराच्या साक्षीनं जर कधीमधी, *वटसावित्रीचा पुजते वड, बेंदरानं केला चड, बेॅदराची घेते काव, नाग- पंचमीचा जाव, नागपंचमीच्या दिवशी करते व्ह्यारी, आली गवराय गणपतीची स्वारी, गवराय गणपतीला वहाते दूर्वा, गवराय गणपतीचं घेते दोरं, आलं म्हाळाचं म्हईनं म्होरं, म्हाळाच्या म्हईन्याची निवडते डाळ, आली घटाची माळ, घटाच्या माळेला देते गाठी, शिलंगनाची झाली दाटी, शिलंगनाचं घेते सोनं, दोन्ही दिवाळ्यांनी केलं येणं, दिवाळीची पाजळते पंती, आली संक्रांत नेन्ती, संक्रांतीचं पुजते सुगड, आली माही पुनव दुगड, माही पुनवेची पुजते ओंबी, शिमगा खेळे झोंबी, शिमग्याची करते पोळी, आली रंगपंचीम भोळी, रंगपंचमीचा उधळला रंग, पाडवा आला टोलेजंग, पाडव्याची उभारते गुढी, आखितीनं मारली उडी, आखितीची पुजते करा, दिवाळी होस्तोवर दम धरा मग मी येईन »€ > »€ राव तुमच्या घरा. ' एखादीनं असा दणका उडवून दिला तर हास्याचा गदारोळ उसळून गेला. मनावरचा जडभार सेल झाला. एकदम हास्यविनोदाची कारंजी फुलली. आणि मग एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातील, रेवती म्हणे जी यादवा । आधि घ्या ईचीया नांवा । हळदी सग ईसी लावा । देवाधिदेवा श्रीकृष्णा ।। हग आधार घेत अशा गोष्टी अनेक वर्षे चालल्या असाव्यात याची आवर्जुन नोंद घेतली गेली. पति-पत्नींमधील संबंध आणखीनच सुखावले. आणि नाव घे म्हटल्याबरोबर “नाटकांत नाटक सुभद्राहरण » > >» रावांच्या नावाचं आज काय कारण असं डोळं वटारीत दटावणारी रंभा हौसेमौजेनं राजीखुषीनं सांगून मोकळी झाली की, उ पंढरीच्या देवळाला सोन्याचा कळस > > » सवांचं नाव घ्यायला मला नाही आळस. '




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now