मधुमक्षिका | Madhumakshika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मधुमक्षिका  - Madhumakshika

More Information About Author :

No Information available about विनायक कोंडदेव ओक - Vinayak Kondadev Ok

Add Infomation AboutVinayak Kondadev Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विद्याभ्यास. ड्‌ मानाव्या, असें भाह्यी सांगत नाहीं. परंतु, आपले स्थितीशी त्यांची अनुकूलता नसल्यास त्या वजोव्या. दुग्ध हा पदार्थ निरोग्यानें सेविला असतां बलप्रद होतो खरा; तथापि तोच पदार्थ संनिपात किंवा कफदोष झालेल्या माणसाने सेविल्यास प्राणहारक होतो. ही गोष्ट सर्वत्र लागू करावी. मूख जन विद्येचा तिरस्कार करितात. ठीकच आहे. कुतऱ्यानें कस्तुरीस कर्देम मानिलें, तर त्यांत कांहीं नवल नाहीं. कां की, तिच्या ग्रुणाचा अनुभव त्याला स्वतः घेतां येत नसतो; व इतरांनीं घेतलेला समजण्याची त्याला शक्तिही नसते. तेव्हां त्याजकडे काय बोल? कितीएक मूढ लोक, “कोल्हा आणि द्राक्षे,” ह्या न्यायानं विद्येस वाईट ह्यणतात. परंतु विद्येस मनापासून वाईट ह्यणणारा असा मलुष्य फार विरळा. कां कीं, ती पाहिजे त्या कामास साह्य देण्यास सिद्ध असतं. पाहा, भिछ, कोळी वगरे लोक ह्यणजे ज्यांच्या वंशांत कधीं कोणींच पांढऱ्यावर काळें केले नाहीं, व जे स्वतः तसेच अक्षरशून्य राहण्याचा निश्चय धरून चा- लतात, ते देखील, ज्यांस सामान्य लिहिणे, वाचणें व अल्पखल्प गणित येतें, त्यांस मोठ देववान्‌ मानितात. खरोखर चांगल्या गोष्टीस वाखाणणें, ह्यास फार सुज्ञपणा छागतो असें नाहीं; तर जें चांगलेंव उपयुक्त आहे, त्याचें, हरप्रयत्नानं संपादन करून, त्याचा यथायोग्य उपयोग करणें, हंच शहाण्याचें लक्षण होय. विद्येचा उपयोग केवळ पुस्तकी ज्ञानाने होत नाहीं. ह्यास पुस्तकांबाहेरचें व्य- बहारज्ञान पाहिजे. तें ज्ञान विचारपूर्वक अवलोकनानं आणि अनुभवानं प्राप्त होत असतें. पुस्तकांवरून शिकलेल्या अनेक विषयांवर वाकपांडित्य करणारे असे विद्यार्थी शाळांत पुष्कळ तयार होतात. पण सगळं साहित्य पुढं ठेऊन, जें बोलतां तं कम्ून दाखवा, असं सांगितले असतां, पुढं सरणारा असा शतांमध्यें एकादाच निघतो. संकटांतून पार पडण्याच्या, व उद्योगाने सख्खहित करून घे- ण्याच्या पुष्कळ युक्ति, विद्याथी जनांनीं पुस्तकांत वाचिलेल्या असतात; व ल्या त्यांस आठवतही असतात. परंतु, त्यांचा उपयोग कोठें कोणत्या प्रकारें करावा, हं व्यवहारज्ञान त्यांस नसव्यासुळे, ते विद्वान्‌ असूनही त्यांस अविद्वानांपेक्षांकथी कधीं अधिक विपत्ति भोगाव्या लागतात. ह्याचं कारण असें कीं, त्यांचं बहु- तेक आयुष्य केवळ पुस्तकी ज्ञान संपादण्यांत गेलेले असतें आणि, त्याचा उपयोग करण्यास आवश्यक जॅ व्यवहारज्ञान, तें संपादण्यास ट्यांस मुळीच अवकाश सांपडलेला नसतो. तर्‌ असं करूं नये. कोणतीही उत्तम वस्तु म- हाप्रयासानें मिळविली, पण तिचा उपभोग जर आपणास घेतां येत नाहीं, तर ती मिळविली आणि न मिळविली सारखीच. एकादा मलुष्य चांगला वैद्यक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now