भगवान बुद्ध | Bhagavaan Buddh

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
13 MB
                  Total Pages : 
224
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about धर्मानंद कोसम्बी - Dharmanand Kosmbi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(६) प्रस्तावना
महावेदल्ल व चूळवेदल्ल अशीं दोन सूत्रे मज्झिमनिकायात आहेत.
त्यावरून वेद हे प्रकरण कशे होते याचे अनुमान करता येते. त्यापैकी
पहिल्या सुत्तात महाकोट्टित सारिपुत्ताला प्रश्न विचारतो आणि सारिपुत्त
त्या प्रश्नाची यथायोग्य उत्तरे देतो. दुसऱ्यात धम्मदिन्ना भिक्षुणी आणि
तिचा पूर्वाश्रमातील पति बिशाख या दोघाचा तगाच प्रकारे प्रदनोत्तर-
ख्याने सवाद आहे. ही दोन्ही सुत्ते बुद्धभाषित नव्हत. परतु तग्माच
रीतीच्या सवादाना वेदल्ल म्हणत असत. श्रमण, ब्राह्मण आणि
इतर लोकाबरोबर बद्ध भगवताचे जे सवाद झाले असतील, त्याचा एक
निराळा संग्रह करण्यात आला होता व त्याला वेदल्ल हे नाव देण्यात
आले होते, असे दिसते.
ही नऊ अगे अस्तित्वात वेण्यापूर्वी सुत्त आणि गेय्य ह्या
दोनच अगात बाकीच्या अंगाचा समावेद करण्यात येत होता अमे
महासुञज्ञतासुत्तातील खालील मजकुरावरून दिसून येते.---बरद्ध भगवान
आनदाला म्हणतो, “न खो आनन्द अरहति सावको सत्थार अनुबन्धितु
यदिद सुत्त गेय्य वेय्याकरणस्स हेतु । त किमस्स हेतु । दीघरत्त हि वो
आनन्द धम्मा सुता धाता वचसा परिचिता ” [*हे आनन्द, सुत्त
आणि गेय्य याच्या वेय्याकरणासाठी (स्पष्टीकरणासाठी ) श्रावकाने
शास्त्या (गुरूच्या) बरोबर फिरणे योग्य नाही. का की, तुम्ही या गोष्टी
ऐकल्याच आहेत, आणि तुम्हाला त्या परिचित आहेत.” ) म्हणजे सुत्त
आणि गेय्य एवढ्यातच बरद्धोपदेश होता आणि वेय्याकरण किवा
स्पष्टीकरण श्रावकावर सोपविण्यात आले होते. होता होता त्यात
आणखी सहा अगाची भर पडली, आणि पुढे त्यातील काही अगाची भसळ
करून सव्याचीं बरीच सुत्ते बनविण्यात आली. त्यात बुद्धाचा खरा उपंदेश
फोणता व बनावट कोणता हे सागणे जरी कठीण जाते, तरी अशोकाच्या
भाब्रा किवा भाब्रू शिलाळेखाच्या आधारे पिटकातील प्राचीन भाग
कोणते असावेत याचे अनुमान करता येणें शक्य आहे.
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...