ऊन्ह आणि सावल्या | Uunha Aani Saavalyaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ऊन्ह आणि सावल्या  - Uunha Aani Saavalyaa

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सोरा शश सांगावं कीं माझं मीरावर प्रेम आहे.'' तितं आपल्या पजानं त्याचं तोंड झाकलं आणि ती म्हणाली, “ नको रे नको. असला काहीं वेडेपणा करशील तर माझ्या गळ्याची शपथ आहे तुला-- “ पण हा चोरटेपणा किती दिवस चालायचा ?” “चालेल तितके दिवस ! वेळच आली तर पुढें पहातां येईल, “ माधवला अस सांगतांना मीराची अशी कल्पना होती कीं साऱया गोष्टी वाबासाहेबाना सांगण्याचा प्रसग लवकर येणार नाही. तो दूर आहे. आणि जोंपर्यंत तो दूर आहे तोंपर्यंत चोरट्या गाठीभेटीच सुख मिळेल तितक घ्यायला हरकत नाही. परंतु एके दिवशीं तिला नृत्य शिकविणारे शिक्षक नित्याप्रमाणें आले, ती पायात घृगरं बांधू लागली. शिक्षकानी तबला सुरांत मिळविला आणि म्हटलं, “ हु. सुरू !” ती त्यांना म्हणाली, “ माधव येऊ देना? ” “तो येणार नाही. ” ते म्हणाले. “का?” ** बाबासाहेबानी त्याला नको म्हणून सांगितलं आहे. व्हायोलिन बाज- विणारा दुसरा कोणी तरी पहावयास हवा. मिळेल लौकरच. वाजविणारांना काय तोटा ? हवे तेवढ आहेत. माधवपेक्षां चांगला आण्‌ं आपण. ह. सुरू! * मीराला क्षणभर वाटलं पायांतील घुगर॑ फेकून द्यावींत व मास्तरांना सांगावं मला नाचायचं नाही, जा तुम्ही ! परंतु तिन आपलं मन आवरलं. असा देखावा करण्यात अथथ नव्हता, तिनं मास्तरांना फक्त एवढंच विचारलं, “ बाबांनी सांगितलं माधवला नको म्हणून ? कां १” मास्तर म्हणाले, “ तें मला कायं माहीत ? ते मला एवढंच म्हणाले दुसरा ब्हायोलिनवाला बघा . माधवला मी नको म्हणून सांगितलं आहे.” मीरा कांहीं बोलली नाहीं. नित्याप्रमाणें तिनं शिकवणी पार पाडली, परंतु शिकण्यांत तिचं चित्त मुळींच नव्हतं. आपण केव्हां एकदां माधवची भेट घेऊं, आणि काय झालं आहे तें आपल्याला केव्हां एकदां कळेल असं तिला झालं होतं. त्याच्या भेटीसाठी तिचा जीव तळमळत होता. तिला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now