श्री शंकराचार्य | Shri Shankaraachaarya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री शंकराचार्य  - Shri Shankaraachaarya

More Information About Author :

No Information available about महादेव राजाराम बोडस - Mahadev Rajaram Bodas

Add Infomation AboutMahadev Rajaram Bodas

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१] उपन्यास. ऊ दिवाकर, समंतभद्र, अकलंक, विद्यानंद वगेरे समकालीन ठरल्यास शंकरा- चायींचा काल अधिकच निश्चेत होईल. हिंदुस्थानांतील जेन बोद्ध ग्रन्थांचें व अद्वेतभिन्न संप्रदायांच्या ग्रन्थांचें प्रकाशन अजून पुष्कळच व्हावयाचे आहे. तसेंच तिबेट, चान, ब्रह्मदेश, सिंहलद्वीप, जावा, सयाम येथील ग्रन्थही अजून अज्ञात आहेत. या देशांतून राज्यसत्ता सुस्थिर होऊन प्राचीनविद्येचें पुनर्जीवन होईल, तेव्हांच भरतखंडाचा खरा इतिहास तयार होइल. खुद्द शंकराचारयासंबंधाचे दोन ताम्रपट पुढं आले आहेत;पण ते कितपत विश्वसनीय आहेत तें आज सांगतां येत नाहीं. हे दोन्ही ताम्रपट दारका मठांत सांपडले. पेकीं सुधन्या राजाच्या ताम्रपटावर भिति युधिष्ठिर टाक २६६३ आश्विन शु. १५, म्हणजे इसवी सनापूर्वी ४३७ वर्षे अशी आहे व ताम्रशासन देणारा सुघन्वा राजा सोमवंश चूडामागे युधिष्टेर- परंपरेतील आहे. द्वारकामठस्थ जत्रीप्रमाणें आद्य शकराचायीचा जन्म युधि- रर शक २६३१ वैशाख शुक पंचमीस झाला, व ३२ व्या वर्षी म्हणजे युधिष्ठिर शक २६६३ कार्तिक शुक पौर्णिमा रोजीं नियाण झाले, म्हणजे सुधन्वा राजाचें ताम्रशासन नियांणाचे पूर्वी एक महिना दिलें असावे.अस्सल ताम्रपट बाहेर येईपर्यंत, व सुधन्वा राजा कोठें व कधीं झाला हें निश्चित होईपर्यंत, या ताम्रपटावर भरंवसा ठेवतां येत नाहीं. ताम्रपटांतील मजकूर वादग्रस्त आहे, व युधिष्ठिर शक तर मुळींच खरा मानता येत नाहीं. दुसरा ताम्रपट, गुजरमंडलार्धाश्वर सर्वजिद्व्मा राजाने विक्रमार्क संवत्सर ९४१ वेशाख शु० ४ चा शारदापीठस्थ श्रीनुसिंहाश्रम स्वार्मांचे नांवाने दिला आहे. हे नमुसिंहाश्रम स्वामी,द्वारकार्पीठावरील २९ वे, विक्रम सं.९६० ज्येष्ठ व. ४ पर्यंत होते. द्वारकापीठावर हक्क सांगणाऱ्या मूलबागळ स्वामीच्या युरुपरंपरत नुसिंहाश्रम स्वामी मुळींच नाहींत. अस्सल ताम्रपट पुढे येऊन सर्वजिद्र्मा राजाचा पत्ता लागेपर्यंत या ताम्रपटाचेंहि विशेष महत्त्व मानतां येत नाहीं. निरनिराळ्या मठांच्या गुरुपरंपरा किती परस्परविरोधी आहेत, ह पुढें दाखविण्यांत येईल. त्यावरून व कोणत्याही स्वामींच्या नांवावरून एतिहासिक अनुमान काढणें घोक्याचें आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now