पण ळक्षांत कोण घेतो | Pan Laqsaant Kon Gheto

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पण ळक्षांत कोण घेतो  - Pan Laqsaant Kon Gheto

More Information About Author :

No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

Add Infomation AboutHari Narayan Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लहानपणची आठवण १ ७ करून माझ्या पेटीत टाकण्याच्या नादी लागलें व दादाहि जवळ बुक घेऊन मलाच मदत करीत होता; मधून मधून आमचें बोलणेंहि होत होतें, तें बोलणें अर्थातच बाबांच्या वतनावर होतें आमचे बाबा मोठे खाष्ट होते खरे, पण आज ते जरा विशेषच संतापले आहेत असें अम्हांस वाटलें. जिन्यांतून धावतांना पडलें तेव्हां त्यांच्या तोंडचे शब्द माझ्या कातों पडले ते मां दादाला सांगितले. दादानें तें ऐकले होते; आणखीहि तशाच प्रकारचे शब्द त्याच वेळीं ते बोलले होते. तेहि त्यानें मला सांगितले व एकंदर आम्हीं असें ठरविलें की, आज ब्राबा विशेष संतापले आहेत, आतां एक दोन दिवस त्यांच्या नजरेस पडण्याची सोय नाहीं. प्रश्ग आला आहे तर आतां आमच्या बाबांचें थोडेसें वणन देतें, म्हणजे पुढें मी जी हकीकत लिहिणार आहें, ती नीट समजण्यास ठीक पडेल. आमचे बाबा शरीरानें चांगले धष्टपुष्ट होते व खूप उच होते. त्यांचा वण गोरा परंतु ढोळे किंचित्‌ पिंगट होते. ते दिसण्यांत मोठे भव्य किंवा उप्र दिसत असत असें म्हटलें तरी चालेल आणि वर्तनाने तसे होतेहि. त्यांच्यापुढे जाण्यास सगळीं कापत. आमचा गडी शिवराम, मी अगदीं लहान होतें तेव्हांपापून आमच्या घरांत मी त्याला पाहात होतें. पण तोदेखील त्यांच्यापुढें जाण्यास फार भिई. एक भीत नसे आई. तिलादेखील ते एखादा वेळ बोलत. पण तें आपलें जितक्यास तितकंच. तिला मात्र ते स्वतः जरा वचकत, याचे कारण मला फारा दिवसांनीं कळलें. तें कारण एवढेंच होतें कीं, ते कधींहि रागांत असले म्हणजे हिने त्यांचे तोंडास तोंड द्यायचेच नाहीं. त्या वेळीं ' हूं हू ? करून वेळ मारून न्यावयाची व त्यांचा राग गेला म्हणजे ज्या गोष्टीबद्दल ते एवढे रागावले असतील तीच गोष्ट त्यांना समजून सांगून ती करून घ्यावयाची. हा तिचा मोठा गुण होता असें मीच म्हणतें असें नाहीं, प्रत्यक्ष बाबांच्या तोंडून मी कित्येक वेळां या तिच्या गुणाचें वणन ऐकलेलें आहे. बाबांचा स्वभाव फार आग्रही--दुराम्रहि म्हटला तरी चालेल--असा होता. पण ती अशी शहाणी होती कीं, तिनें त्यांच्याकडून आग्रह सोडवून त्यांस आपल्या म्हणण्याप्रमाणें करावयास लावावयाचें. त्यांनीं कांहीं गोष्ट म्हटली कीं, हिनें पहिल्या सपाट्यास * हो, करायचे तें ? असें म्हणावयाचेंच आणि थोडा वेळ निघून गेला म्हणजे मग हळूच त्यांच्याजवळ जाऊन “ मधांशीं तें करायच म्हटले खरं, पण त्यांत अशा अशा अडचणी आहेत बरं का १” असें म्हणून योग्य असेल त्याच तर्‍हेनें ती गोष्टच करून टाकायची. अशी कांहीं तिची विलक्षण चतुरता होती. दुसरी अशी एक गोष्ट होती कीं, ती भलत्या गोष्टींत कधींहि मन थालीत नसे. ज्या गोष्टींत तिचा अगर संसाराचा कांहीं संबंध नाहीं अशा गोष्टींत बोल नये असें तिचें म्हणणें असें व ती त्याप्रमाणें वागेहि, दोजारच्या ठकीची आई राधाबाई आणखी माझी आई या दोघी अगदीं फार चांगल्या मैत्रिणी असत. त्या राघाब्ाईनीं एक दिवस आमच्या आईला विचारलें: “ कायहो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now