व. वे. सु. अय्यर | Va. Ve. Su. Ayyar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
182
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अ. के. भागवत - A. K. Bhagavat
No Information available about अ. के. भागवत - A. K. Bhagavat
रा. अ. पद्मनाभन - Ra. A. Padmnaabhan
No Information available about रा. अ. पद्मनाभन - Ra. A. Padmnaabhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वराह नेरी 7?
बायबलमधील वचनांनी आशीर्वाद दिला, ““तू सॉल सारखा जा आणि पॉलसारखा परत
ये'', १९० ६ मध्ये सुब्रह्मण्यम् रंगूनला गेले.
वरिष्ठ इंग्रज बॅरिस्टरना सुब्रह्मण्यम् फारच आवडले. बॅरिस्टरांचे अनेक पक्षकार तमिळ
चेट्टियार होते. त्यांचे इंग्रजी मर्यादितच असल्याने सुब्रह्मण्यम् सारखा कनिष्ठ वकील फार
उपयोगी ठरला. शिवाय सुब्रह्मण्यम् स्वतः दाव्यांचे तर्जुमे करण्यात निष्णात असत. एकदा
इंग्रज बॅरिस्टरशी बोलतांना पशुपती अय्यरनी आपल्या मेव्हण्याची प्रगती कशी काय आहे,
असे विचारले. इंग्रज बॅरिस्टरने सुब्रह्मण्यम् यांची स्तुती केली, एव्हढेच नव्हे तर ते
इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्याच्या लायकीचे आहेत, असे मतही दिले. पशुपती अय्यरना
फार आनंद झाला. पण सुब्रह्मण्यमूनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना दुःख झाले. कारण
असले साहस करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी साधनसामुग्री नव्हती.
रंगूनला त्यावेळी तिरूचीची काही इतर कुटुंबे होती. त्यांची सुब्रह्मण्यमना अगदी
जवळची माहिती होती. डॉ. टी. एस. एस. राजन् हे तिरुचीहून आले होते. ते डॉक्टर
म्हणून निष्णात होते पण शाही वैद्यकीय सेवेमधील (आय.एम.एस्.) एका उध्दट इंग्रजाने
त्यांचा अपमान केला आणि त्याच्या निषेधार्थ राजन् ह्यांनी सरकारी नोकरी सोडली.
त्यांनी लंडनला जाण्यापुरते पैसे जमा केले आणि भारतमार्गे लंडनला जाण्यासाठी रंगून
सोहले. राजन् ह्यांच्या जाण्यामुळे सुब्रह्मण्यम् ह्यांची लंडनला जाण्याची भूक आधिकच
तीब्र झाली.
सुदैवाने पशुपती अय्यर स्वतःची एक योजना घेऊन पुढे आले. ते स्वतः शेअर
बाजारात उलाढाली करीत असत. त्यामुळे त्यांना वाटले की आपल्याला लंडन येथे खरेदी
विक्रीत मदत करणारा कोणी मिळाला तर आपल्याला त्याचे मोठे सहाय्य होईल. स्वतःचा
अभ्यास सांभाळून सुब्रह्मण्यम् ह्यांनी ह्याकडे लक्ष दिले, तर त्यांना इंग्लंडला जाण्यास
मदत करण्याची राजनूनी तयारी दर्शविली; पण सुब्रह्मण्यमूना स्टॉक्स व शेअर्सची
काहीही माहिती नव्हती. पशुपती अय्यर ह्यांच्या पायाशी बसून त्यांनी स्टॉक्स आणि
शअर्सचा श्रीगणेशा गिरवला आणि त्यांना खूष केले. ह्यावरून त्यांची परदेशगमनाची दृढ
इच्छा दिसून आली.
_ अशा प्रकारे रंगूनला पोचल्यापासून दहा महिन्यांच्या आत सुब्रह्मण्यम् पुन्हा एकदा
समुद्रसफरीस - ह्यावेळेला लंडनच्या - निघाले. १९०७ च्या शेवटच्या पाव वर्षात
सुब्रह्मण्यमूनी इंग्लंडला प्रयाण केले. त्यावेळेस त्यांनी आपल्या नावाचा संक्षेप केला. आणि
पुढे ते केवळ 'व्ही. व्ही. एस. अय्यर” ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.
इंग्लंडला जाण्यासाठी रंगून सोडतांना तरुण अय्यरनी अदयावत युरोपीय पोषाख
घातला होता. ह्यांच्या डोक्यावरील केस कापलेले असून, मधून भांग पडलेलः होता.
पौरुषदर्शक मिशा चेहऱ्याला शोभा देत होत्या. त्यांना युरोपीय रीतीरिवाजाचे कितीही प्रेम
असले, तरी ते स्वतःच्या संस्कृतीचे चाहते होते. त्यांची पेटी इंग्रजी व लॅटिन पुस्तकां-
User Reviews
No Reviews | Add Yours...