कार्लाईल व हिंदू - चालीरीती | Kaalaariila Va Hindu Chaaliiriitii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
176
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद चिमणाजी भाटे - Govind Chimanaaji Bhaate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कालीईल्चे इातिवत्त. धू
फार वाईट वाटलें. पण तीं विचारी असल्यामुळें मुळाच्या हच्छेच्या
विरुद्ध गेलीं नाहींत.
१८१४ मध्यें टॉमस कार्लाईलन प्रथम आनन्डेल शाळेंत शिक्षकाची
नोकरी धरली, व पुद तो कर्ककल्डी येथील शाळेंत शिक्षक झाला. येथ
त्याची एडवर्ड आर्ग्हिंग या शिक्षकार्शी ओळख झाली, व दोघांचा अःयंत
खेह जमला. आर्व्हिंग कार्लीईल्ला निरनिराळ्या विषयावरील ग्रंथ
वाचण्यास देई, व कार्लाईल ते मोठ्या अधाशीपणान वाची. या दोघां
स्नेह्यांचे निरानिराळ्या विषयांवर संभाषणदही होई. या विचारविनिमया-
पासून आपला विलक्षण फायदा झाला, असें कार्लाईल मोठेपणी म्हणे.
१८१८ मध्यें या दोघांनीं कर्ककल्डीची शाळा सोडली व ते एडिंबरोस
आले. कार्लाईलने अजून निश्चित असा आपला उद्योग किंवा आय॒ष्यक्रम
आंखला नव्हता, यामुळें हीं त्याचीं पांच चार वर्षे मोठ्या काळजात व
कष्टांत गेलीं. घड खाणेंपिण॑ वेळेवर नाहीं, विद्याभ्यासाचाही बोजा फार;
या कारणाने त्याला अजीर्णांचा कायमचा विकार जडला. हा रोग
म्हणजे * आपल्या पोटाचा गाभा सतत कुरतुडणारा उंदीर १ होय असे
कार्लाईलने त्याचं विनोदी वर्णन केलेले आहे. त्याचा खिश्चन धर्मावरील
विश्वास पार उडाला होता, व त्याच्या मनांत नास्तिकवाद, संशयरवाद
वगेरे विचारांचें काहूर माजलेले होतें. शिवाय आयुष्यांतील कायमच्या
कार्यक्रमाबद्दलही अनिश्चय होता. एकदां त्याच्या मनांत एंजिनीयर
व्हावयाचें आले व त्याप्रमाणे ती धंद्याला लागणाऱ्या विषयांचा अभ्यास
करू लागला, व खनिजशास्त्र शिकण्याकरितां त्यानें जमेन भाषेचा अभ्यास
सुरू केला, एका विशिष्ट हेतूनें त्यानें जर्मन भाषेचा अभ्यास केला खरा.
पण त्यापासून एक अनवेक्षित पारिणाम घडून आला. त्याची जर्मन भाषेत
उत्तम प्रगाति झाली इतकेंच नाहीं, तर जर्मन भाषेतील वाढ्ययानें व त्यांतील
आध्यात्मिक विचारांनी त्याच्या संशयग्रस्त मनाला शांति दिली; तो या
वाळ्ययाचा मोठा अभिमानी बनला या भाषेतील विचार इंग्रजींत आण-
ण्याचा त्याचा निश्चय झाला व हेंच त्याच्या आयुष्याचें धैय बनलें. ही
गोष्ट १८२१ मध्यें घडली. या वर्षी आपला आध्यात्मिक पुनजेन्म झाला
असें कार्लाईल म्हणत असे.
User Reviews
No Reviews | Add Yours...