विषवृक्ष | Vishhavriksh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विषवृक्ष  - Vishhavriksh
[adinserter block="2"]

More Information About Authors :

बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

No Information available about बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

Add Infomation AboutBamkim Chandra Chattopadhyay

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खलय्नाचें वय झालेलें होतें, पण म्हातारा म्हणे--* आणखी थोडे दिवस जाऊंदे, कछुन्देला घालवून देऊन मी कुठं जाऊं १ कोणाच्या आधारावर जगूं १? त्या म्हाताऱ्याला हें कळत नव्हतें कीं ज्या दिवश्लीं त्याला देवाघरचें बोलावणें येईल त्यावेळीं कुन्दा कुठें जाईल १आज तसेंच झालें होतें. यमदूत त्याच्या ब्रिछान्यारोजारीं उभे होते--तो तर जायलाच निघाला होता--डउद्यां कुंदनंदिनी कुठें जाणार होती १मरणाच्या दारीं राहून एकेक श्वास सोडतांना त्या म्हाताऱ्याला हीच जाणीव तीव्रतेने होत होती. तेरा वर्षींची ती बालिका काळवंडलेल्या चेहऱ्यानें दगडाच्या पुतळीसारखी त्याच्या शेजारीं त्याच्या तोंडाकडे पहात राहिली होती. ती स्वतःला विसरली होती, उद्यां काय होणार हेंही विसरली होती, केवळ हा लोक खोडायला घाई करीत असलेल्या त्या म्हाताऱ्याच्या तोंडाकडे पहात राहिली होती,हळुहळु म्हाताऱ्याची वाचा कुंठित होत आली. निश्वास कंठाशीं आहे. डोळे निस्तेज झाले. गांजलेला पोळलेला जीव थोड्याच क्षणांत त्या यातनेंतून मोकळा झाला. त्या भयाण जागीं, मिणमिणत्या प्रकाद्यांत; बापाचा देह कवटाळून छुंदनंदिनी एकटीच बसली होती. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. झाडाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाच्या चुटपुटत्या थेंबांचा आवाज कांनीं येत होता. चाऱ्याच्या वावझडीमुळें घराच्या दारांच्या फळ्या थडाथड वाजत होत्या. पणतींतल्या दिव्याचा प्रकाशा मधुन मधून प्रेताच्या चेहऱ्यावर पडून मधुन मधून काळोखत होता. त्यांत तेल नव्हतें, चारदोन वेळ वात मोठी झाल्यासारखी दिसली आणि लगेच दिवा मालवला गेला.मुळीसुद्धा पाऊल न वाजवता नगेन्द्र दारांतून बाहेर आला.७ रात्रीची भयाण वेळ. त्या मोडक्या घरांत एकटीच कुंदनंदिनी आणि जवळ पडलेल तिच्या बापाचे प्रेत. तिनें हांक मारली---' बाब्या | ? कुणी उत्तर दिले नाहीं. कुंदेला वाटलें, बापाला झोंप लागली. पुन्हा वाटलें, मृत्यू काहा १ तसें म्हणवेना तिच्यानें. शेवटीं हांकही मारवेना आणि विचारही करवेना.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now