केरळ | Keral

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : केरळ - Keral

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ केरळ पुरंश्रींचा हेवा करावा, निसर्गाची ही देणगी त्या जीव ओतून जोपासतात, हं विशेष ! रोज तेल-उटण्यांनीं केशामदन करतील, डोक्यावरून न्हातील, केस सुकवतील, विंचरतील, काळजीपूर्वक त्यांची विरचना करतील, त्यांवर वेणी किंवा गजरा माळतील अन्‌ या कामीं खर्ची पडलेला वेळ सार्थकीं लागला असेच समजतील, केरळी स्त्रीचा सगळा नखरा काय तो केशप्रसाधनांत असतो अन्‌ दिसतो. केरळांतली सगळीच राहाणी साधी अन्‌ निसगीला अनुकूल अशी आहे. भात है त्यांचें मुख्य अन, तीन्ही ठाव भात अन्‌ वर थोड सांबार किंवा ताक मिळाले कीं, त्यांचा आत्मा खूष! निजायला एक चटई पुरेशी असते, त्यांना वेड आहे ते फक्त छत्रीचे, प्रत्येकाच्या हातांत लहान वा मोठी छत्री असायलाच हवी, एक वेळ केरळी माणूस अनवाणी बाहेर पडेल; पण छत्री व्ांखेला मारल्यावांचून पाय बाहेर काढायचा नाहीं, इकडे कापडी छत्र्या तर सर्रास आहेतच; शिवाय ते लोक बांबूचा दांडा लावून ताडपत्री छत्र्याहि तयार करतात. ताडपत्री छत्र्या विद्देषिकरून नम्पूतिरि ब्राह्मणांच्या बायका वापरतात, उन्हासाठी अन्‌ त्याचबरोबर आपला मुखडा जनतेच्या दृष्टीपासून लपवण्यासाठी त्यांना या छत्र्यांचा उपयोग होतो. अशा तीन चार बायका एकत्रपणे रस्त्याने निघाल्या, कां दूरच्या माणसाला ताढपत्र्यांची राहुटीच चालत येत असल्याचा भास होतो, छत्रीच्या या अतिरिक्त वापरामुळे बाहेरचे लोक केरळाला * छत्र्यांचा देश 1 असं कुतूहलाने संबोधतात. त्रिवेद्रम्‌ ही केरळाची राजधानी. पूर्वाच्या त्रावणकोर संस्थानाचीहि हीच राजधानी होती, खंर नांव * तिरु अनंतपुरम्‌ .? त्याचा अर्थ श्री अनंतपुरम्‌ असा आहे, अनंत म्हणजे पद्मनाभस्वामी, त्याच्याच नांवाने तै नगर वसले अन्‌ तोच तिथला राजा झाला, पूर्वीचे अधिपति या अनंताचे प्रतिनिषि म्हणून त्या संस्थानचा कारभार पाहात, त्यापूर्वी तै * अनंतवन * होतें, वन म्हणजे खरोखरीच दाट जगलच, ब्रिल्वमंगल नांवाचा एक साधु श्रीविष्णूच्या अनुग्रहासाठीं एका ठिकाणीं तप॒ करीत बसला होता, कांहीं काळाने तिथे एक मुलगा नित्यनेमाने येऊं लागला, मुलगा मोठा ब्रात्य होता, तो अनेक प्रकारे बालचेष्टा करून ब्रिल्व- मंगलाच्या साधनेत विष्न आणी, त्याचे चित्त स्थिरच होऊं देत नसे, असे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now