प्राचीन माणसे | Praachiin Maanase

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्राचीन माणसे  - Praachiin Maanase

More Information About Author :

No Information available about कृष्णाबाई मोटे - Krishnabai Mote

Add Infomation AboutKrishnabai Mote

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ 0 0 प्राचीन माणसें शस्त्रें, इत्यादीवबावत साधनें तयार करण्याकरितां कधी काळी चकमकीच्या दगडाची गरज पडली असेल याची त्यांना स्वप्नांतसुद्धां कल्पना शिवत नव्हती. ब्‌शे द पॅथं हा गृहस्थ कांही स्वतः शास्त्रज्ञ नव्हता हें खरे. पण त्याच्या वापाने त्याला नीट कसा विचार करावा हें मात्र शिकवले होतें हे निश्‍चित. म्हणूनच दोघाहि शास्त्रज्ञांनी जरी त्या दगडाविषयी शंका प्रदाणित केली होती, तरी आपला तर्क वरोबर आहे असा त्याचा विश्‍वास होता व त्यालाच तो चिकटून राहिला. त्याने नाउमेद न होतां आपलें सगोधन तसेच चाल ठेविले. असें संशोधन करीत असतां लवकरच एके दिवशी त्याला वाळूच्या थरात रुतून राहिलेला पूर्वीसारखाच आणखी एक चकमकीचा दगड मिळाला. त्यानंतर तिसराहि तसाच एक दगड मिळाला. त्या दोघानाहि पहिल्यासारखेच घाव -1लून मुद्दाम आकार आणलेले होते. हे तिन्ही दगड घेऊन ब्‌शे द पॅर्थ फिरून त्या विद्वानांकडे गेला. त्याने हे तीनहि गारगोटीचे दगड त्याना दाखविले व म्हणाला, ' पाहा हे तिन्ही दगड. तिघांना कसा सारखाच आकार देण्याचा प्रयत्न केला आहे, ते तरी पाहा ! आणि आतां सांगा, अजूनहि तुम्ही याला योगा- योग-निसर्गाची कृति-असेच म्हणणार का? असा आकार कोणी मुद्दाम दिल्याशिवाय येत नाही हे निश्‍चित. योगायोगानें किवा निसर्गचमत्काराने एखाद्या दगडाला आकार येईल पण तिन्ही दगडाना कसा येईल ? ' “ ताही बुवा, आम्हाला तरी यांत योगायोगाशिवाय दुसरें कांहींच दिसत नाही. ' शास्त्रज्ञांनी फिरून एकवार ठामपणे सांगितले. ब्‌शे द पॅथला मात्र तसे वाटत नव्हते. आपल्या मनाच्या साक्षीवर त्याची पुरी श्रद्धा होती. त्यानुसार तो अधिकाधिक शोध घेतच राहिला. त्याच्या संशोधनात एवढाहि खड पडला नाही. उलट मजुरी देऊन कांही मजुरांची मदत घेण्यास त्यानें सुरुवात केली. आपल्याला कशा प्रकारचें दगड पाहिजेत हे त्याने मजुराना समजावून सांगितलें; व तसे दगड आढळून आल्यास त्यांनी ते अलगद उचलून आपल्याकडे आणून द्यावेत. त्यासाठी आपण त्यांना कांही तरी पैसे देऊ असें त्यानें कबूल केलं. दिवसामागून दिवस असा कांही काळ लोटला. एके दिवशीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now