नारद भक्ति सूत्र विवरण | Naaradabhakti Sutr Vivaran

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नारद भक्ति सूत्र विवरण  - Naaradabhakti Sutr Vivaran

More Information About Author :

No Information available about धुंडामहाराज देगलूरकर - Dhundamaharaj Degaloorakar

Add Infomation AboutDhundamaharaj Degaloorakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(९) प्रकार व त्यांच्यातील तरतमभाव (५६-५७), भक्तीचे इतर साधनसापेक्ष सुलभत्व व त्याची कारणे (५८-६०), भक्तीच्या प्राप्तीसाठी निषेधात्मक व विधायक कतंव्ये (६१-६६), एकनिष्ठ भक्तांचे श्रेषत्व व त्यांच्याद्वारे होणारे कायं (६७-७३), साधकभक्तासाठी अकरणीय व करणीय साधना (७४-७९) सजनभक्तीनें भगवत्पय़राप्ती (८०) भक्तीच्या सवंश्रेष्ठतेच्या घोषणेने उपसंहार (८१), एकाच भक्तीची अकरा रूपे (८२), भक्त्याचार्यांचे भक्तीसंबंधी एकमत (८३), फलश्रुति (८४) यावरून नारदाच्या या सुत्रामध्ये भक्तीचा किती अंगांनी विचार केला आहे याची कल्पना येईल हा विचार सूत्ररूपाने मांडीत असता त्यांनी ' वादो नावलगम्ब्य: ।' हे त्यांच्याच एका सूत्रात सांगितलेले धोरण अवलंबिले आहे असे दिसते. पण कोणत्याही तत्त्वाचा विचार म्हटला की त्यात काही मतभिन्नता, वेगळी दृष्टी, असा प्रकार होणारच. त्याप्रमाणे नारदांनीही भक्तिनिष्ठेचे स्वरूप सांगत असता (सूत्रे १५ ते १८) आणि भक्तीच्या साधनांचा विचार करीत असता (सूत्र २८ ते ३७) इतरांच्या मतांचा निर्देश केला आहे. त्यातही थोडी आग्रही व खंडण- मंडणात्मक भूमिका भकती व ज्ञान याच्यामध्ये साध्यसाधन असा सबंध आहे काय या प्रदताचा विचार करीत असता त्यांनी घेतली असल्याचे दिसते (सूत्र २८ ते ३३). भक्तिमार्गात तसे फारसे मतभेदांचे मृद्दंच नाहीत, असलीच तर आवड भिन्न असल्यामुळे भावभिन्नता असेल. पण इतर परमार्थमार्गांशी भक्तीची तुलना करीत असता काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, या सत्रांमध्ये “सा तु कमंज्ञानयोगेभ्योषप्यधिकतरा । 1 असे २५वे सूत्र आहे. याचा विचार करताना मतभिन्नता होणारच. पण अशा मतभेदाच्या प्रसंगात त्या भिन्न तत्त्वांचा समन्मय कसा करावा याचे मार्गदर्शन आपल्याला श्रीमत्‌भगवद्‌्गीता आणि ज्ञानेश्वरी व नाथभागवत या ग्रंथांमधून मिळते. म्हणून या विवरणामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ग्रंथातील सुंबर विवेचनाचा आधार घेतला आहे. हे ग्रंथ प्रमाणभूत असल्यामुळे त्यांच्या साह्याने केलेले विवरण हे वरील मतभिश्नतेसंबंधी कणाच्या शंका असल्यास त्यांचे यथोचित निरसन करू शकेल यात शंका नाही. ' वादो नावलम्ब्य: ।' हा नारदांचा आदेश एकाप्रकारे या विवरणाच्या- संबंधातही पाळला गेला आहे. ही नारदभक्तिसृत्रे ही देवर्षी नारदांचीच आहेत का इतर कृणाची ? ही नारदांचीच असल्यास कोणत्या नारदाची ? त्यांचा काळ कोणता ? ही सूत्रे वल्लभसंप्रदायाची आहेत का बंगालमधील चैतन्यसंप्रदायाची ? इत्यादी जे प्रइन या सूत्रांचे बहिरंग अभ्यासक उभे करतात त्यांतील कोणत्याच वादात ग्रंथकार पडलेले नाहीत व ग्रंथाचा जो वाचकवर्ग गृहीत धरून या ग्रंथाची रचना क्षाली आहे त्यांनाही त्यासंबंधीच्या वादात रस असेल असे वाटत नाही.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now