डॉ. कैळास | Dr. Kailaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dr. Kailaas by विनायक देवरुखकर - Vinayak Devrukhakar

More Information About Author :

No Information available about विनायक देवरुखकर - Vinayak Devrukhakar

Add Infomation AboutVinayak Devrukhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ५ कालिंदी : मग बाबा, जरा उशीरा गेलांत तर नाहीं का चालणार ! बाबा० : हेच-हंच आमचं जिथं तिथं नडत ! वेळेचं महत्त्व आपल्या लोकांना जेव्हां कळेल तो सुदिन समजावा. समाजांत सुधारणा घडवून आणायची असेल तर प्रथम लोकांना वेळेचे महत्त्व पटवून दिलं पाहिजे. मनुष्याच्या आयुष्यांतला एक एक क्षण मोलाचा असतो. तो वायां दवडून उपयोगी नाहीं. शांता० : आतां घरांतच व्याख्यान देणार वाटतं १ बाबा० : (हंसून ) काय हरकत आहे १ पंचवीस वर्षांमागं जाहीर व्याख्यान देण्यापूर्वी मी तुलाच श्रोता करून घरांतच व्याख्यानाची तालीम घेत नव्हतां का १ आज मी मोठीं व्याख्यानं देती, या माझ्या यद्याचं श्रेय तुलाच आहे. पुढारी व्हायच असेल तर त्याला व्याख्यान देतां आलं पाहिजे; आणि ब्याख्यानबाजी कमवायची असेल तर त्यानं स्वतःच्या पत्नीसमोर प्रथम व्याख्यानबाजी गाजविली पाहिजे. समजलं १ शांता० : ( हंसून ) कांहीं तरीच आपलं बोलणं. बाबा० : कांहीं तरी कां म्हणतां १ माझ्या कोणत्या वाक्याला टाळ्या पडतील हें तुम्हीच मला अगोदर सांगत होतां; आणि नेमक्या त्याच वाक्यांना लोक टाळ्या वाजवीत असत. शांता० : हें मात्र खोटं बरं का ! एकदां मला दुपारी झाप येत होती. त्या वेळीं आपण माझ्यासमोर व्याख्यान झोडलंत. व्याख्यानाच्या तालावर मला झाप लागली; आणि टाळ्या द्यायला मी विसरून गेलें. केव्हां बाहेर जाणं झालं तेंसुद्धां मला समजल नाहीं. घरीं परत आल्यावर आपण सांगितलं कीं, तें व्याख्यान फार उत्तम वठलं म्हणून, बाबा० : (हंसून) असं एकदां झालं खरं. ते असो. (घड्याळांत पाहून ) माझी जाण्याची वेळ होत आली आणि अजून हरबाचा पत्ता नाहीं. माझे कपडे- कालिंदी : मी काढून ठेवतें हं बाबा. ( जाते. ) बाबा० : हे बघा, कृष्णराव काळे येतील आतां. माझ्याचबरोबर निघता म्हणाले. ते आले कीं आम्ही दोघेजण जाऊ राजेसाहेबांकडे. 1 दारावर घंटा वाजते. “ बाबासाहेब, येऊं का आंत १?? बाबासाहेब




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now