ज्ञानेश्वर वचनामृत | Gyaneshvar Vachanaamrit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ज्ञानेश्वर वचनामृत  - Gyaneshvar Vachanaamrit

More Information About Author :

No Information available about रा. द. रानडे - Ra. D. Rande

Add Infomation About. . Ra. D. Rande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्ताचना दे पाहतां ज्ञानेशवरीरचनच्या प्रर्वी भाषार्शली व विचारशली कशी असावी यांचें अनुमान आपल्यास काढतां येण्याजोगे आहे. महानुभावपंथांचे सवं ग्रंथ छापून निघावयास पाहिजेत; तथापि उपलब्ध असलेल्या माहितीवरून सुद्धां महाराष्ट्रभाषेच्या वाडुमयांत महानुभाव पंथानें बरीच भर टाकिली आहें असें अनुमान काढलें अगतां वावगं होणार नाहीं. या महातभाव पंथाचा उत्पादक चक्रधर यास शके ११८५ मध्ये संन्यासदीक्षा मिळाली, व दाके ११९४ मध्ये तो हा प्रांत सोडून बद्रिकाश्रमीं गेला. याचे जरी ग्रंथ प्रत्यक्ष उपलब्ध नाहींत, तथापि त्याच्या शिष्यमंडळींपैकी पुष्कळांनीं ग्रंथरचना करून ठेथिली आहे. महींद्रभट या नांवाच्या त्याच्या शिष्याने * सिद्धांतसूत्रपाठ ' या नांवाचा एक ग्रंथ केला आहे; त्यांत चक्रधराच्या तोंडचीं वचनें उद्धृत केलीं असून तीं १६०९ आहेत, व तीं सर्व मराठींत आहेत, “ पुरुष जंवं जंव पळे । संबं तंव विषो पाठीं लागे । पुरुष जंबं जंधं पाठीं लागे । तंवं तंव विषो पळे ' अशा प्रकारचीं हीं सूत्रें आहेत. चक्रधरांच्या शिष्यांपैकी भास्कर यानें शके ११९५ मध्यें ' शिक्षुपालवघध ' हा ग्रंथ रचला. “ चाउली पडलो अंत:करणी । तवम्हणे रुक्मिणी । हा गे कवण आंगणीं । चाहाळ काइसा *' अशा प्रकारच्या त्यांच्या ओंब्या आहेत. ज्यांचे शक उपलब्ध आहेत अशा इतर ग्रंथकारांपैकीं केशवराजसूरि यानें शके १२०६ त * मूरतिप्रकाश १ या नांवाचा ग्रंथ रचला, “' कीं भरौनि नित्य सुखाचा ताटों । मिया ठेविली ब्रह्मरसाची वाटी । त सुमनें लावोनि वोठीं । पान करितु ” अशा प्रकारच्या त्याच्या ओंव्यांचा मासला आहे. व सरासरी ज्ञानेश्‍वरी रचनेच्या समकालीन म्हणजे शके १२१३ मध्यें नरेंद्रपंडित यानें * रुक्मिणी-त्वयंवर * या नांवाचा आपला ग्रंथ संपविला. “' म्हणोनि उपसाहावें सकळ श्रोतां । म्यां वर्णिली श्रीक्ृषष्णकथा । जे पर्वी व्यासादिकांशीं कथितां । आली होती पुराणश्रुती ” हा एक त्याच्या ओव्यांचा मासला आहे. या सवं ओंब्यांचें ज्ञानेश्‍वरांच्या ओंब्यांशी किती साम्प आहे हें तज्ज्ञ वाचकांस सहज दिसून येईल. एकंदरींत पहातां महानभावपंथ विट्ठलसांप्रदायापेक्षां कितीही भिन्न असला, तथापि त्या सांप्रदायानें मराठीतील काव्यरचना बदीच वाढविली हें खास.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now