साहित्य - संग्रह ३ | Saahitya Sangrah 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saahitya Sangrah  3 by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) संमेल्नांतील अध्यक्षीय भाषणांत उद्मार काढले, कीं परिस्थितीच्या व इंग्रजी- च्या जौखडाखालीं आपली मराठी भाषा मरणार, त्यांच्या या विधानाबद्दल परांजपे म्हणतात, “पारतंत्र्याच्या तिटकाऱ्याच्या दुष्टीनें राजवाडे यांची काळजी लक्षांत घेण्यासारखी नाहीं असें कोण म्हणेल १ पण एवढें ख[स कीं, आपली मराठी भाषा मरणोन्मुख झालेली नसून तीं उत्तरोत्तर उदयोन्मुख होत चाल- लेली आहे. तिच्यांत इस्टीं जर थोडा तेजस्वितेचा कमतरपणा दिसत असेल तर तो सध्याकाळच्या नंतरचा नसून प्रातःकाळच्या पूर्वीचा आहे. :श्रीज्ञानेश्‍्वर महाराजांच्या गीतेवरील भावार्थदीपिकेपासून लो. टिळकांच्या गीतारहस्यापर्यंत मराठीमध्यें आतांपर्यंत अनेक ओजस्वी ग्रंथ निर्माण झाले आहेत. ती मराठी भाषा मरण्याकरतां जन्माला आलेली नाहीं. ज्या भाषेत रामदासांनी शिवाजीला स्वधमरक्षणाची प्रेरणा केली, ज्या भाषेमध्यें शिवाजी महाराजांनी मराठयांचे स्वराज्य आणि स्वातत्र्य प्रस्थापित केलें ती मराठ्याची भाषा मारण्याकरितां जन्माला आलेली आहे, मरण्याकरतां नव्हे, मराठी भाषा न'ट होणे केव्हांही शक्‍य नाहीं.?”? सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या उद्योगाबद्दल ते म्हणतात, “आपल्या भाषेबद्दल इतका सकारण आत्मविदवास असतांना तिच्यामध्ये परकीय शब्द आले तर ते आपल्या भाषेचे नकसान करीत नसून उल्ट आपल्या भाषेतील दब्दसंपत्ति वाढविण्यालाच कारणीभूत होतात. त्यांना धक्के मारून घालवून देण्यांत आपण आपल्या भाषेचा कांहीं फायदा करीत आहों असा मुळींच अर्थ होत नाहीं.” पूर्वी पोतुगीज व मुसलमान यांच्या हातचे अन्न खाल्ल्यामुळे जात गोली, आतां अख्खा किरिस्तांव वा मुसलमान खाल्ला तरी जात जाणार नाहीं, त्याच भावनेने या प्रदहनाकडे पाहून आपण परकी शब्द पचवून ते आत्मसातू करून टाकले पाहिजेत हं उघड आहे. पंत अनुस्वाराला कुकुमतिलका- इतकें महत्त्व देत, म्हणून त्यांना सनातनी मानण्यांत येत असे; पण भाषेच्या बाबतींत त्यांचे विचार असे किती प्रगमनशील होते आणि मराठीच्या उज्वल भवितव्याबद्दल त्यांना चैतन्यपूर्ण आत्मविश्वास किती वाटत होता, याची कल्पना त्यांचें संपूण भाषण वाचणारांना सहज होण्यासारखी आहे. राजद्रोशबद्दल झालेल्या शिक्षेवून शिवरामपंत सुटून आल्यानंतर थोडक्याच दिवसांनीं सरकारनें काळ? पत्राकडून दहा हजारांचा जामीन मागितला. जामीन« क्रीची रक्‍कम भरली तरी सरकार ती केव्हां जप्त करील याचा नेम नसल्यासुळें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now