छत्रपती शिवाजी | Chhatrapati Shivaajii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
170
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about सेतुमाधवराव पगडी - Setumadhavrav Pagadi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रारंभीची वर्षे 7
सुरूवातीस दक्षिणेत लहान लहान स्वतंत्र राज्यांमध्ये हा प्रदेश वाटला गेला.
मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थितीतील हा बदल थोडासा का होईना, त्यांना अनुकूलच
ठरला.
दक्षिणेतील ही राज्ये फार मोठी नव्हती. प्रत्येक राज्याच्या ताब्यात दक्षिणेचा
थोडासा भाग असे. संपत्ती आणि मनुष्यबळ ही मोठ्या राज्यांना उपलब्ध असतात,
ती या राज्यांना कोठून मिळणार ? ही राज्ये आपसात भांडत, कधी विजयनगरसारख्या
राक्तीविरुद्ध अल्पकाळ एकत्र होत. पण गोवा आणि उत्तर कोकण येथे ठाण मांडून
बसलेल्या पोर्तुगीजांच्याविरुद्ध ती काही करू शकली नाहीत.
बहामनींच्या काळापासून दक्षिणेत इराण, अरब आणि आफ्रिका यांची
किनारपट्टी येथून लोकांचे येणे सतत चालू होते. लवकरच दक्षिणेच्या राजकारणात
अमीर उमराव म्हणून तुर्क, इराणी, अरब आणि आफ्रिका ( शिद्दी) यांचा समावेश
होऊ लागला. दक्षिणेतील लोकांच्या दृष्टीने हे सर्वजण क्षितिजाच्या पलीकडून
आले, (फारसी भाषेत क्षितिजाला आफाक म्हणतात.) म्हणून या नवागतांना
आफाकी म्हणू लागले. यातच उत्तरेकडून आलेल्या पठाणांची भर पडली. लवकरच
या पठाणांचे जे बळ वाढले ते निश्चितच उपेक्षणीय नव्हते.
बहामनींचे लष्करी अधिकारी म्हणून पंधराव्या शतकात मराठ्यांची फारच
थोडी नावे आढळतात. तरीपण मुधोळचे घोरपडे यांनी थोडेबहुत नाव कमावले.
अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा संस्थापक हा मृळचा महाराष्ट्रीय ब्राह्मण.
त्याचे धर्मान्तर करून त्याला मुसलमान करण्यात आले होते, असाच प्रकार
वऱ्हाडच्या इमादशाही घराण्याच्या बाबतीत घडला. या घराण्याचा संस्थापक
फत्तेउल्ला हा मूळचा ब्राह्मण. दक्षिणेकडील युद्धात हा कैदी म्हणून सापडला होता.
विजापूर, गोवळकोंडा आणि बिदर, येथील घराण्यांचे संस्थापक हे सर्व तुर्कवंशीय
होते.
मराठ्यांच्या परिस्थितीत बदल झालेला आपल्याला सोळाव्या शतकात
आढळून येतो. अहमदनगर राज्यात मुलकी कारभारातून काही मराठ्यांना महत्व
प्राप्त झाले. मराठ्यांच्या पायदळाला नायकवाडी म्हणत, त्यांचा उपयोग
किल्ल्यातील शिबंदी म्हणून करण्यात येऊ लागला.
पण समकालीन फारशी बखरींतून आणि कागदपत्रांतून मराठ्यांचा उल्लेख
येतो तो हलके आणि चपळ घोडदळ बाळगणारे आणि गनिमी काव्याने लढणारे
असा. सैय्यद अहमद तबातबाई हा इ.स. 1580 मध्ये इराकमधृन आला. नळदुर्गच्या
वेढ्यात त्याने मराठ्यांचे निरीक्षण केले. त्याने आपले मत दिले की मराठे हे मध्य
User Reviews
No Reviews | Add Yours...