यूनेस्को - विज्ञान धरातलम् , विज्ञान शालेतलम | UNESCO SOURCE BOOK FOR SCIENCE TEACHERS

UNESCO SOURCE BOOK FOR SCIENCE TEACHERS  by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उतरविल्या. शेवटी योग्य स्पष्टीकरण शोधले व ते तज्ज्ञांकडून तपासून घेतले. झाले; अशा रीतीने त्यांनी प्रश्‍न सोडविला. मिळालेल्या माहितीचा उपयोग ती मुले आता करू शकतील. प्रश्‍न सोडविण्याच्या पद्धतीची ही केवळ सुरुवात आहे. ही रीत नीट वापरली तर त्याचे सुपरिणाम दिसतील. उत्तम मार्गदर्शन लाभल्यास अशा रीतीने प्रश्‍न सोडविण्यात विद्यार्थी बरीच प्रगती करतील. मात्र शालेय जीवनात या पद्धतीची ओळख लवकर होण्यासारखी नाही. प्रश्‍नांची बिनचूक उत्तरे शोधण्यात तरबेजपणा येण्यास बराच कालावधी लागतो. जसजसा अनुभव येत जाईल तसतशी मुलामुलींना विचाराच्या शास्त्रीय पद्धतीची ओळख होत जाईल. उदाहरणार्थ : निरनिराळ्या गोष्टी उगीच कशातरी घडत नाहीत. त्यांना काहीतरी नैसर्गिक कारण लागते. तेव्हा धर्मभोळेपणा व अंधश्रद्धा सोडली पाहिजे. इतरांच्या मताची कदर करणे, आपले निष्कर्ष बरोबर असल्याची खात्री वाटेपर्यंत ते तात्पुरत्या स्वरूपाचे मानणे, विश्‍वसनीय पुरावा गोळा करणे, आपली चूक आढळल्यास स्वत:चे मत बदलण्यास तयार असणे, एकदम निष्कर्षाप्रत न जाणे, भोवताली घडणाऱ्या गोष्टींबद्दल जिज्ञासा वाटणे आणि अर्धवट स्पष्टीकरणाने समाधान न मानणे ह्या गोष्टी शास्त्रीय विचारसरणीला आवश्यक आहेत. कुशल मार्गदर्शनाखाली केलेल्या शास्त्राच्या अध्ययनामुळे या गोष्टी विद्यार्थ्याच्या अंगवळणी पडू शकतील. एवढेच नव्हे तर, अशा शास्त्रीय विचारसरणीशी मुलांचा जितका लवकर संबंध येईल तितके अधिक चांगले. आणखी एक गोष्ट म्हणजे मुलांच्या जिज्ञासेचे क्षेत्र शक्‍य तितके विस्तृत करणे. त्यांच्या निकटच्या कित्येक गोष्टींबद्दल मुलांना नैसर्गिकरित्याच कुतूहल वाटत असते. परंतु त्या पलीकडच्या कितीतरी गोष्टी त्यांना अज्ञात असतात. त्यामुळे त्याबद्दल त्यांना कुतूहल वाटू शकत नाही. खालच्या इयत्तेत ताऱ्यांची थोडीशी माहिती दिल्याने त्यांच्या मनामध्ये एका नव्या विभागाबद्दल गोडी निर्माण होईल. काहींना त्याचे कायमचे आकर्षण वाटेल. रोपट्यांच्या वाढीच्या अभ्यासाने वनस्पती लावण्याबद्दलची गोडी जागृत होईल. अशी संधी न मिळाल्यास ती व्यक्त होणार नाही. पूर्वी अशी समजूत होती की, मुलांना केवळ वनस्पतिसृष्टी व प्राणिजीवन यांबद्दलच औत्सुक्य असते. पण तसे नाही हे आता मुलांच्या आवडीनिवडीसंबंधी केलेल्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे. सृष्टीचे सर्व पैलू त्यांना आकर्षक वाटतात. काही मुलांच्या बाबतीत हे आकर्षण किंवा आवड संकुचित असल्याचा भास होतो. परंतु योग्य साहाय्य लाभल्यास इतर गोष्टींमध्येही त्यांना रमविता येईल. पुष्कळांची चिरंतन टिकणारी गोडी शालेय जीवनाच्या पहिल्या काळातच निर्माण झालेली असते. अनेक शास्त्रज्ञ याबाबतचा आपला अनुभव सांगतात. तेव्हा या गोष्टीकडे लक्ष पुरवून प्राथमिक शाळेतील शाखाध्यापन केल्यास ते अधिक फलदायी होईल. शास्त्रीय विचारसरणी व कायम जिज्ञासा यांबरोबरच मुलांमध्ये रसिकवृत्ती किवा रसिकता उत्पन्न झाली पाहिजे. ही कशी निर्माण करता येईल? निसर्गसौंदर्याबद्दलच्या प्रवचनाने खासच नाही; फुले, फुलपाखरे, मधमाश्या यांच्याबद्दल सामान्य माहिती देण्याचाही उपयोग होणार्‌ नाही. प्रत्यक्ष पाहण्यास, जवळून बारकाईने अवलोकन करण्यास, कसून तपासणी करण्यास व भोवतालच्या जगातील आश्‍चर्यकारक गोष्टी शोधून काढण्यास शिकविल्याने ही गोष्ट साध्य होईल. झाडाचे य:कश्चित पान ते काय, पण त्यातसुद्धा मानवास अजून असाध्य असलेली अन्ननिर्मितीची प्रक्रिया चालू आहे. तिला पाणी आणि कर्बद्विप्राणिल (कार्बन डायॉक्साईड) वायू हा कच्चा माल व पानांतील हिरव्या रंगाचे द्रव्य या गोष्टी आवश्यक आहेत व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ही प्रक्रिया घडते, इतकेच ज्ञान मनुष्याला आहे. अगदी शेवटच्या अणूपर्यंत या प्रक्रियेचे पथक्करण तो करू शकत असला तरी ती तो स्वत: करू शकत नाही किंवा या प्रक्रियेचे अगदी पुरे ज्ञान त्यास अजून झालेले नाही. या क्रियेशिवाय जीवन टिकणे दुरापास्त होऊन बसेल, इतके या क्रियेचे महत्त्व आहे. या प्रक्रियेसंबंधीची ही वस्तुस्थिती जेव्हा मुलाला समजते व तिचे खरे महत्त्व जाणून घेण्यास जेव्हा त्यासमदत केली जाते, तेव्हा त्याची रसिकता वाढते. विशेषतः उत्साही, बुद्धिमान आणि रसिक शिक्षकांबरोबर काम करीत असताना ती अधिक जोमाने वाढते. उ तेव्हा शास्त्राच्या अध्यापनाचे हे हेतू शिक्षकांसमोर ॥ युनेस्को - विज्ञान घरातलं, विज्ञान शाळेतलं / ३ ४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now