भीम भोई | BHIMA BHOI

Book Image : भीम भोई  - BHIMA BHOI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सीताकांत महापात्र - SITAKANT MAHAPATRA

No Information available about सीताकांत महापात्र - SITAKANT MAHAPATRA

Add Infomation AboutSITAKANT MAHAPATRA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क इतर साहित्यकृती 'ब्रह्म निरूपण गीते या संग्रहात भीमाने ब्रह्माचे स्वरूप आणि गुणधर्म वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: चौथ्या सर्गामध्ये हा प्रयत्न आढळतो. हे वर्णन परिस्थिती, गुणधर्म आणि वस्तूंमधून निर्माण होणाऱ्या विरोधाभासांच्या जोड्यांच्या मालिकांमधनू केलेले आहे. काही बिरोधाभास असे आहेत, तो शिष्य आहे आणि तो गुरू आहे. तो अंधार आहे आणि प्रकाशही आहे. तो शिक्षा देतो आणि तोच शिक्षा भोगतो. तों कैदी आहे आणि बंदीपाल ही तोच आहे. तो कर्म आहे, तो भ्रम आहे आणि तरीही तो मृत्युदेव यम आणि काल अशा दोन्ही भूमिकांतून शिक्षा देतो. तो बोलतो, तरीही मो मूक असतो. तो निराकार असूनही त्याला आकार आहे. तो अनोखा कलावंत आहे आणि सर्व कलावस्तूंतही तोच आहे. सर्वसंग ल्याग करून देवत्वाला पोचलेला योगीही तोच आणि विलास करणारा भोगीही तोच आहे. ' भीमा भोईला जाणीव होती की वेद आणि वेदान्तांना सुद्धा ब्रह्माची, सर्व अशाश्वत दश्यवस्तूंच्या तळाशी वसणार्‍्या अपरिहार्य ब अपरिवर्तनीय सत्याची, व्याख्या करणे जमलेले नाही. वस्तुत: आपल्या लेखनात तो हे अनेक वेळा सांगतो. त्याला ही जाणीव आहे की शास्त्रे किंवा बुद्धिवादी पुरुषाचे विह्ठत्तापूर्ण वादविवाद हा काही परमेश्वराचे स्वरूप जाणण्याचा मार्ग नाही. त्यातून माणूस संशय आणि अनिशश्‍चितेतच्या जाळ्यात अधिकाधिक सापडतो. ज्ञानाचे प्रदर्शन मांडणाऱ्या पंडितांना ब्रह्माचे ज्ञान होत नाही कारण ते ब्रह्म बुद्धी, तर्कशास्त्र आणि ज्ञानाच्या पलिकडचे आहे. लहान मूल ज्या आर्ततेने आईसाठी तळमळते तशी आर्त तळमळ हाच ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग आहे. ब्रह्म कृपामय, दयामय आहे आणि आपण आपला अहंकार नष्ट करून अंत:करणपूर्वक त्याच्या आशीर्वादांसांठी आणि कृपेसाठी तळमळत असू तरच तो आपल्या पापांची क्षमा करील. या संदर्भात भीमा भोईचे रामकृष्ण परमहस्तांशी थोडे साम्य आहे. रामकृष्णांप्रमाणे भीमा भोई गूढवादी नव्हता आणि समाधीमध्ये जात नसे. पण आत्मा परमेश्वरासाठी व्याकूळ होऊन तळमळत असेल तर त्यातून व्यक्तीचे जीवन विशुद्ध होठ, यावर त्याचा विश्‍वास होता. 'ब्रह्मनिरूपणा 'मध्ये त्याने वेद, पुराणे आणि इतर पारंपारिक ग्रंथांमधल्या पढीक ज्ञानाला इतर साहित्यकृती 27 फारसे महत्त्व दिलेले नाही. याउलट तो म्हणतो की यांपैकी कोणत्याही पवित्र ग्रंथात परमेश्वराचे स्वरूप आणि स्वभाव यांविषयीचे ज्ञान नाही. तो पुढे असे सांगतो की तेहतीस कोटी देवता, असंख्य योगिनी, क्रषी, गंधर्व आणि किन्नर यांना त्याची शक्‍ती आणि आविष्कार समजलेले नाहीत. ग्रह ताऱ्यांनीही परमेश्वर समजलेला नाही. क्रतूंच्या चक्रात आणि चार धर्मात त्याच्या अस्तित्वाचे गूढ सामावले जात नाही. इतर ठिकाणी भीमा भोईने सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या वीणेच्या आवाजाचा संदर्भ दिला आहे. या वीणेचा ध्वनिहीन ध्वनी केवळ ध्यानयोगातूनच ऐकता येतो. या मार्गाने चिरंतन वसंत क्रतू असलेल्या आणि आत्म्याची तहानभूक हरपून टाकणाऱ्या महाशून्याकडे जाता येते. भीमाच्या मनात सतत या मार्गांचा विचार असे आणि अंतिम सत्याचे खरे दर्शन असा तो मार्ग त्याला साध्य करायचा होता. र *अस्त्क बिहारी गीता'मध्ये भीमाने सर्व मानवांना, आणि विशेषतः भक्तांना, पवित्र तापसी जीवन जगण्याचा आणि आपले अंत:करण पूर्णपणे परमेश्वराच्या आज्ञांप्रमाणे व्यतीत करण्याचा उपदेश केला आहे. कलियुगामध्ये उदंड माजलेल्या पापांच्या आणि अन्यायांच्या जाणिवेने तो व्यथित झालेला दिसतो. समाजाचा अध:पात आणि मूल्यांचा ऱ्हास पाहून भीमाला यातना होतात. समाजाला नवजीवन आणि ब्यक्तीला मोक्ष मिळावा म्हणून हा ऱ्हास थांबवण्यासाठी जी कर्मे करायला हवी त्या कर्माची मालिका अस्त्क बिहारी गीता मध्ये पहायला मिळते. अहंकार आणि त्याच्यापाठोपाठ येणारे ढोंग यांचा त्याग करून सत्य महिमा धर्माचा म्हणजे परमेश्वरी मार्गाचा अवलंब करण्याचा आणि अलेख आणि महिमामध्ये मोक्ष शोधण्याचा उपदेश भीमाने केला आहे. “अस्त्क बिहारी गीता मध्ये ज्ञान आणि भक्तियोगाचे वर्णन सोप्या भाषेत केले आहे. प्रत्येक जीवनामधल्या, प्रत्येक निर्मिती मधल्या ब्रह्माच्या वैश्विक अस्तित्वाच्या कल्पनेचे भीमाने सुंदर वर्णन केले आहे. आणि सुचवले आहे की पूर्ण समर्पण आणि शरणागती या मार्गानेच मोक्ष सहज मिळवता येतो. त्याच्या शब्दात - “घाटाजवळ नावाडी आहे. तो नदी ओलांडून देतो. तो तुमच्या आत्म्याला पार करील. हे शरीर घनदाट अण्ण्यासारखे आहे. परमेश्वराचे स्मरण करा. तो तुमच्या मध्ये, तुमच्या शरीर अस्तित्वाच्या कणाकणामध्ये भरलेला आहे.” महिमा धर्म आणि त्याच्या तत्त्वांचा 'निर्वेद साधना हा महत्त्वाचा भाग आहे. पण त्यातील काव्य फार उच्च दर्जाचे नाही. स॒त्यमहिमा धर्माचे संस्थापक प्रबुद्ध गुरू महिमा स्वामी आणि गोविंद बाबा यांच्यातील संवादामधून काव्य पुढे जाते. या संवादातून सत्यमहिमा धर्माची मूलतत्त्वे स्पष्ट केली आहेत. महिमा स्वामींनी गोविंदबाबांना सत्यमहिमाच्या धार्मिक मार्गाची महत्त्वपूर्ण तत्त्वे सांगून त्यांच्या शंका आणि अडचणींचे निवारण केले आहे. सत्यमहिमा धर्माचे प्रमुख तत्त्व निवृत्ती किंवा वैराग्य किंवा निष्कामता आहे आणि प्रवृत्ती नव्हे, या कल्पनेवर भर दिलेला आहे. चंदनाचे छाप, फुले, टिळे किंवा जानवे ही बाह्य चिन्हे महत्त्वाची नाहीत. साधे व पवित्र जीवन, भिक्षा मागूनही चालेल पण, जे मिळेल ते स्वीकारून जगणे हेच केवळ महत्त्वाचे आहे. वेदांमध्ये सांगितलेले आचार मानवी जीवन आणि मुक्तीच्या शोधासाठी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now