पुरोगामी जनगर्जना - (मई-जून 2018) | PUROGAMI JANGARJANA- (MAY-JUNE 2018)

PUROGAMI JANGARJANA- (MAY-JUNE 2018) by पुस्तक समूह - Pustak Samuhविभिन्न लेखक - Various Authors

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सोशलिस्ट स्पिरीट.” भाईंनी समाजवादावर विपुल लिखाण करून लोकशाही समाजवादाचे तत्त्वज्ञान आपल्या मांडणीने समृद्धही केले. एका लेखात भाई म्हणतात, “समाजवादाचा विचार करताना त्या विचारधारेची मूल्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था या दोन्हींचाही विचार करावा लागेल. मूल्यव्यवस्थेच्या पायावरच समाजव्यवस्थाही उभी राहत असते. त्यातील पाया स्थिर, खंबीर व भक्कम हवा. मात्र त्यावरील रचना ही प्रवाही व स्थलकाल यानुसार बदलतही राहणार हे गृहीत धरले पाहिजे. मूल्यव्यवस्थेचा विचार करताना जगाच्या आधुनिक इतिहासात विशेषत: विविध राज्यक्रांत्यांद्वारे जी मानवी मूल्ये समाजापुढे आली त्यांचाच प्रामुख्याने विचार करावा लागतो. अमेरिकन, फ्रेंच, रशियन राज्यक्रांत्यांनी याबाबत फार मोठे योगदान दिलेले आहे. त्यातूनच स्वातंत्र्य, समता, व बंधुता या त्रिसूत्रीचा उदय झालेला आहे. भारतामध्ये विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यात सामाजिक न्याय या मूल्याचा समावेश करावा लागला. त्यामुळेच भारताच्या सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय ही चतु:सुत्री समाजापुढे ध्रुव ताऱ्यासारखी आढळ बनली आहे. समाजवादाची ही भक्कम मूल्यप्रणाली आहे. मात्र समाजामध्ये या मूल्याच्या आधारावर कशी व कोणती समाजव्यवस्था निर्माण करायची आणि तिचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्वरूप काय असणार है मात्र स्थलकालानुसार ठरवावे लागते. त्यामुळेच समाजवादी विचारधारा ही प्रवाही व गतिमान बनली आहे. बदलत्या संदर्भात समाजवादाची मांडणी स्वाभाविकपणे बदलत जाते व त्या त्या समाजात उचित असे रूप धारण करते. त्यामुळेच समाजवादाचे भारतीय रूप आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.” भाईंनी हे भान आयुष्यभर जपल्याने ते कधी कालबाह्य झाले नाहीत आणि त्यांचे पाय भारतीय मातीत घट्ट रोवलेले राहिले. भाईंनी नुसते समाजवादी राजकारणाचे स्वप्न पाहिले नाही तर डाव्यांच्या तिसऱ्या पर्यायाची व्यापक मांडणी केली. “पँथर ते नक्षलवादी” हे त्या मांडणीचे सूत्र होते. या मांडणीत भाई म्हणतात, “ही एक केवळ राजकीय ऐक्याची हाक नाही. पँथर एका टोकाला व नक्षलवादी दुसऱ्या, यांच्यामधील सर्व शक्तींना हा पुकारा आहे. शोषितपीडित अशा सर्व सामाजिक डे समूहांना आज आपल्यावरील अन्याय निवारणासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.” भाई पुढे म्हणतात, “हे ऐक्य कसे होणार हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यासाठी ऐक्याचा रोड-मॅप बनवावा लागेल. परिवर्तनवादी पक्ष व संघटनांत तात्त्विक व वैचारिक मतभेद नाहीत असे मानण्याचे कारण नाही. अंतर्गत मतभेदाच्या रेषेजवळ देशावरील संकटाची मोठी रेष काढल्यास आपापसातील मतभेदांची रेषा खचितच छोटी ठरेल. पण त्यासाठी संघटनात्मक अहंकाराची थोडीफार छाटणी करावी लागेल.” हे लिहिताना भाईना मार्क्सवाद, आंबेडकरवाद, नक्षलवाद, समाजवाद, गांधीवाद अशा सर्व छटांची जाणीव होती. भाईंनी या ऐक्यासाठी पूर्ण रोजगार, कृषी औद्योगिक अर्थव्यवस्था, मोफत शिक्षण, सर्वांना आरोग्य, आणि जाती निर्मूलन अशी पंचसूत्री दिली होती. यावरून हेही लक्षात येते की भाईची ही मांडणी व्यवहारात यायला कठीण वाटली तरी स्वप्नाळू नव्हती, देशापुढील आव्हानांचा भविष्यवेधी सामना करणारी होती. जातीयवादाच्या पारंपरिक आव्हानाबरोबर देशापुढे आता जागतिकीकरण आणि जमातवाद ही आव्हाने उभी ठाकत असल्याची वास्तववादी जाणीव होती. भाईंनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीला आधुनिक जगाशी आणि बदलत्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न केला. यामुळेच असेही म्हणता येईल की भाईंचे आयुष्य तीन व्यापक संघर्षांना समर्पित होते; जातीयवाद, जागतिकीकरण आणि जमातवाद. हिंदू धर्मातील जातीयवादाला जन्म घालणाऱ्या जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेला त्यांचा प्रखर विरोध होता. याबाबत त्यांच्या भूमिका या महात्मा फुले यांचे वाड्मय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “अनिहीलेशन ऑफ कास्ट” यांवर आधारलेल्या होत्या. भाई मनुस्मृतीचे कट्टर विरोधक होते. अर्थात याबरोबर सर्व धर्मांच्या मांडणीच्या सखोल अध्ययनाची जोड होतीच. “कार्ल मार्क्स आणि भारतीय जातिप्रथा* या लेखात भाई लिहितात, “कार्ल मार्क्स याने जातिप्रथा उन्मूलनाला प्राधान्य देण्याचा विचार मांडलेला असो नसो, भारतीय समाजाने जातीविध्वंसन ही बाब प्राधान्याची मानण्याची गरज आहे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी स्वीकारण्याची नितांत आवश्यकता आहे. इतकेच नव्हे तर गौतम बुद्धाने मांडलेल्या दोन बाबी भारताच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. पुरोगामी र $लब्नग्लना-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now