हक्क पुस्तकांचा , हक्क आनंदांचा - अरविन्द गुप्ता | HAKK PUSTAKANCHA, HAKK AANANDCHA- ARVIND GUPTA'S INTERVIEW

HAKK PUSTAKANCHA, HAKK AANANDCHA- ARVIND GUPTA'S INTERVIEW by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपलब्ध होतील. वाचू द्या सगळ्यांना नवनवीन पुस्तकं. मी जेव्हा शाळांमध्ये जायचो, तेव्हा मला दिसायचं की कोणत्या वर्गाला विज्ञान खेळणी दाखवायची हेही शाळाच ठरवायच्या. अरे, सर्वांना खेळू द्या ना. समजा, त्यातली काही मुलं पुढ कला-वाणिज्य-समाजशास्त्र शिकणार असतील, पण त्यांना खेळणी नकोत असं शाळेनं का ठरवावं? त्यामुळे मग मी एखाद्या शाळेत गेलो, की सगळ्या मुलांनी खेळणी पाहावीत असा आग्रह धरायचो. खेळण्याचा आनंद सर्वांना मिळायला हवा. तसाच वाचण्याचा आनंदही सर्वांना मिळायला हवा. जा कित्येक शाळांमध्ये तर वाचनालयं नसतात, वाचनाचे तासही नसतात. हो. जसं हल्ली वर्तमानपत्रं संपादकांशिवाय चालतात, तशा शाळाही वाचनालयांशिवाय चालवतात. जर शिक्षकांनीही भरपूर वाचलं नाही, चांगले शैक्षणिक अनुभव मिळवून वाचले नाहीत, तर त्यांना मोठीमोठी स्वप्नं कशी दिसतील? म्हणून त्यांना वाचायला मिळतंय ना हे पाहण्याचं काम आपलं आहे. देर? -मोठी स्वप्नं म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हे फार सापेक्ष आहे. पण, मुलांना अगदी आनंदी बालपण मिळावं, त्यांना त्यांचे मार्ग ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळावं, त्यांना वाचण्यासाठी भरपूर पुस्तकं पब्लिक डोमेन मध्ये असावीत. पैसे नव्हते म्हणून अमूकतमूक चांगलं वाचू शकला नाही अशी वेळ कोणावरही यायला नको. आपापल्या मातृभाषेत मुलांसाठी भरपूर साधनं उपलब्ध व्हावीत. जगामध्ये साहित्याचा फार मोठा खजिना आहे. त्यातलं अंशमात्र जरी आपल्या देशातल्या मुलांसाठी आपण त्यांच्या त्यांच्या भाषेत आणू शकलो, तरी पुष्कळ काम होईल. मग त्यातून काय वाचायचं, हे मुलांना आपापलं निवडूदे. आपल्याकडे चांगल काम करणारी, अत्यंत संवेदनशील, अशी पुष्कळ माणसं आहेत. त्यांची काही कमतरता नाही. मी माझ्या अनुभवाच्या जोरावर असं म्हणतो आहे. त्यांच्या मदतीनं मुलांना जीवनदायी अनुभव द्यायला हवेत. जी उ सर्वांची मालकी असायला हवी असं जे तुम्ही म्हणताय, त्यामागची तुमची कल्पना सांगाल का? ५१ | पालकनीती | ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१३ मी जेव्हा टेल्कोत काम करत होतो तेव्हा बघायचो, की ट्रक्स बनवणाऱ्या कामगारांना जेवढे पैसे मिळतात, त्यापेक्षा ऑफिसर्सना बरेच जास्त मिळतात. ट्रक बनवणाऱयांपेक्षा रस्ता बनवणाऱ्यांना फार कमी पैसे मिळतात. खरं तर रस्ते ट्रकपेक्षा जास्त महत्त्वाचे नाहीत का? मग असं का, असा विचार करताकरता मला अधिक मूलभूत प्रश्‍न पडू लागले- या समाजावर नियंत्रण कोणाचं? संसाधनांवर मालकी कोणाची? आणि का? मग या परिस्थितीत आपण काय करायला हव? या प्रश्‍नांची आपली आपली उत्तरंच आपल्याला शोधावी लागतात. ते शोधण्यासाठी मी वर्षभर रजा घेतली. त्या काळात काही दिवस किशोरभारती संस्थेत (होशंगाबाद जिल्ह्यात) विज्ञानशिक्षणासाठी स्थानिक साधनं तयार करण्याचं काम केलं. नंतर काही दिवस केरळमध्ये लॉरी बेकर यांच्याबरोबर स्वस्त घरं बनवण्याचं काम केलं. पण एवढ्यानंही भागणार नाही, यापेक्षा वेगळं काही करावं लागेल असं लक्षात आलं होतं. म्हणून १९८० मध्ये मी टेल्को सोडली आणि 'विदूषक कारखान्या त सहभागी झालो. हा कारखाना म्हणजे आयआयटीतल्या काही संवेदनशील लोकांनी, शाहडोलच्या आदिवासी भागात चालू केलेल एक कम्यून होतं. त्यात दुनु रॉय, सुधीन्द्र शेषाद्री, संजीव घोटगे वगैरे सहभागी होते. इथं आम्ही सर्व कामं वाटून घेऊन करायचो. स्वयंपाक करायचो, एक वर्कशॉप चालवायचो, डिझेल ट्रक आणि पंप दुरुस्त करायचो आणि मुख्य म्हणजे आम्हाला पडत असलेल्या अपरंपार प्रश्‍नांचं विश्लेषण आणि चर्चा करायचो. इथं (?6/5008| 5 ?0॥॥08' या न्यायानं मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तर सापडू लागली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now