पाणी कुठवर आलं गं बाई ? | PANI KUTHEVAR ALA GA BAI

PANI KUTHEVAR ALA GA BAI by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द वरील भागात होणा-या पाणलोट विकास कामांमुळे चांगल्या/ समाधानकारक पावसाळी वर्षात फारसा परिणाम जाणवत नाही, याउलट असमाधानकारक वर्षात परिणाम जाणवतो. धरणाच्या पाणी साठ्यामधून उपसा करण्यावरही काही निर्बंध असावेत, जीवनासाठी आवश्यक पिण्याच्या पाण्याला धरणाच्या साठ्यामधून सरळपणे उपसा करण्याला प्राधान्याने मुभा दिली पाहिजे. पण अलिकडे व्यापारी व नगदी पिकांसाठी प्रचंड पाण्याचा उपसा केला जात आहे हे मांगी प्रकल्पाच्या पाटस्थळामध्ये दिसून आले. त्याने प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच तडा बसतो. धरणाच्या पाटस्थळातील आणि त्याच्या वरील भागातील, बुडित क्षेत्रातील शेतक-यांचा धरणातील पाणी स्वतः पुरते खेचून आणण्यासाठी खटाटोप चाललेला असतो. त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि उद्‌भवणारी वंचितता ही सर्वश्रुत आहे. मांगी मध्यम प्रकल्पात आम्ही पाहिले की, धरणाच्या बुडित क्षेत्रातील शेतकरीं पाण्याचा भरमसाठ उपसा करीत असल्याने पाटस्थळांतील शेतक-यांच्या वाट्याला वंचितता आली. अगोदरच्या काळात धरणातील बुडित क्षेत्रातील शेतक-यांना काही प्रमाणात पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली होती. ती पिण्याचे पाणी व ठिबक सिंचनासाठी मर्यादीत होती असे सांगण्यात येते. पण त्या पाण्याचा अतिवापर होत असल्याने वंचिततेत भरच पडली. शेतकरी त्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करू लागले. खात्याकडूनही बुडित क्षेत्रातुन होणा-या पाणी उपशावर देखरेखीसाठी खास यंत्रणा विकसित केली गेली नाही. त्यामुळे पाटस्थळातील व बुडित क्षेत्रातील शेतकरी यांच्यात पाणी वाटपाचे नियोजन करताना अडचणीं उद्‌भवतात. व सिंचन वंचिततेवरील उपाय सिंचनाच्या समस्येचा अनेक पातळीवर विचार होत आहे. पण त्यावर प्रभावी उपाय योजना करणे आजतागायत अनेकांना शक्‍य झाले नाही. या पुस्तिकेत महाराष्ट्रातील सिंचन वंचिततेच्या अभ्यासाच्या आधारावर काही उपाय, वंचितता कमी करण्यासाठी आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत. अर्थात ही त्यावरील उपायांची 'ब्लू प्रिंट' आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र निश्‍चित काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्यात आहेत, ज्यांच्या पालनाने, कृतीने आणि बदलाने सिंचन वंचिततेवर मात करणे शक्‍य आहे. महाराष्ट्रातील अभ्यासातून निघालेले निष्कर्ष, उद्‌भवणारे प्रश्‍न आणि त्यांच्या सोडवणूकीचे मार्ग या बाबत पुढे चर्चा केली आहे. १. धरणाच्या पाणलोट प्रवाहातील कमतरता धरणाच्या पाणलोट भागातून धरणांमध्ये येणा-या येव्यामध्ये लक्षणीय घट होते आहे हे आम्हाला अभ्यासातून स्पष्टपणे पहायला मिळाले. प्रकल्प उभारलेल्या ठिकाणच्या शेती-हवामानाचा अपुरा अभ्यास, किंवा चुकीची अनुमाने, पाणलोट क्षेत्रात होणा-या पाऊसमानाची दोलायमानता आणि पाणलोटाच्या वरील भागात वेगवेगळ्या जलसंवर्धनाचे प्रयत्न इ. सर्व कारणांमुळे धरणाच्या पाणलोटातून धरणात कमी पाणीसाठा होऊ लागला आहे. कमी पावसाच्या काळात, मोठ्या प्रमाणात पाणी साठा कमी होतो. पाण्याची चणचण जाणवू लागते. हा प्रश्‍न अगदी संवेदनशील बनतो. तेव्हा त्यावर वेळीच उपाय करणे अगत्याचे आहे. त्या दिशेने निरनिराळे मार्ग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now