महाराष्ट्रे शिल्पकार - बेरिस्टर नाथ पै | MAHARASHTRACHE SHILPKAR - BARRISTER NATH PAI

MAHARASHTRACHE SHILPKAR - BARRISTER NATH PAI by जयानंद मठकर - JAYANAND MATHKARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जयानंद मठकर - JAYANAND MATHKAR

No Information available about जयानंद मठकर - JAYANAND MATHKAR

Add Infomation AboutJAYANAND MATHKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२र बॅ. नाथ पै गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचा सहभाग आणि आयुष्याच्या अखेरच्या पर्वात सौमाप्रश्‍नासाठी त्यांनी केलेले प्राणांतिक उपोषण या पार्वभूमीवर लोकसभेने त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी असा आग्रह नाथ पै यांनी लोकसभेत धरला होता. पण नोकरशाहीने सेनापती प्रांतिक पुढारी आहेत, ते लोकसभेचे सदस्य नव्हते या कारणास्तव सेनापतीना लोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात अडसर निर्माण करून ठेवला होता नाथ पै यांनी लोकसभेचे सभापती श्री.संजीव रेड्डी आणि सभागृहाला सुनावले, ''या लोकसभेचा पाया सेनापती बापटांसारख्या स्वातंत्र्ययोळ्ध्यांनी घातला आहे. आपण आज इथे आहोत ते त्यांनी केलेलं बलिदान, स्वातंत्र्यासाठी दिलेली झुंज आणि केलेले आत्मसमर्पण यामुळेच. त्यांची पुण्याई आम्हाला विसरता येणार नाही.” बॅ. नाथ पे यांच्या प्रयत्नामुळे शेवटी १ डिसेंबर १९६७ रोजी लोकसभेने सेनापती बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली. अशाप्रकारे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या मान्यवरांना लोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा बॅ. नाथ पे यांच्यामुळे सुरू केली. लोकसभा म्हणजे लोकशाहीचे पवित्र मंदिर बॅ. नाथ पै लोकसभेला लोकशाहीचे पवित्र मंदिर मानीत असत. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे वैचारिक आदान-प्रदान करण्याचे व्यासपीठ मानीत असत. लोकसभेतील प्रत्येक क्षण सत्कारणी लागला पाहिजे, बाष्कळतेने वाया जाता कामा नये याबाबत ते सदेव दक्ष असत. लोकसभेतील प्रत्येक क्षणावर जनतेचे लाखो रुपये खर्च होत असतात तेव्हा त्याचा सदुपयोग करणे हे लोकसभा सभासदांचे आद्य कर्तव्य 'आहे असे ते मानीत असत. आज लोकसभेत विरोधी पक्ष अतिरेकी आकांड तांडव करून लोकसभेचे काम शुल्लक कारणावरून बंद पाडण्यात धन्यता मानतात. बॅ. नाथ पै यांचा अष्ण प्रकारांना कडवा विरोध असे लोकसभेत जेव्हा महाजन अहवाल चर्चेला आला त्यावेळी बॅ. भाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षाचे कर्नाटकातील खासदार सभापतीच्या आसनासमोर बैठक मारून बसले होते. बॅ.नाथ पै यांनी त्यांना त्यांच्या जवळ जाऊन विचारले आज या चर्चेच्या निमित्ताने तुमची बाज्‌ मांडण्याची चांगली संधी चालन आलेली असताना तम्ही ती अशा वाह्यात वर्तनाने का दवडता आहात?'' बॅ नाथ पे यांच्या या सवालाने ते खासदार खजील झाले आणि मुकाट्याने आपल्या जागेवर जाऊन बसले. प्रसंगावधान राखन बॅ. नाथ पै यांनी आपल्या अमोल बॅ. नाथ पै २३ वक्तृत्वाने आणि कौशल्याने असे अनेक प्रसंग हाताळून लोकसभेची शान राखली. डॅनियल वॉलकॉट प्रकरण अमेरिकन नागरिक डॅनियल वॉलकॉट सोन्याचा आंतरराष्ट्रीय चोरटा व्यापार करणारा कुप्रसिद्ध स्मगलर. तो एकदा मुंबई नजीक समुद्र किनाऱ्यावर विमानाने उतरला. तेथून जवळच्या पोलीस स्टेशनवर गेला. आपल्या विमानासाठी त्यांने पोलिसी संरक्षण मिळविले. येथील काम उरकून तो परत निघून गेला. एकदा नव्हे तर तीनवेळा संरक्षण आणि पोलीस यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला होता. वॉलकॉट प्रथम 'किल्बी' म्हणून भारतात आला आणि नंतर “बॉलकॉट' म्हणून आला. हे सारे प्रकरण बॅ.नाथ पै यांनी उजेडात आणले. १८ नोव्हेंबर १९६३ रोजी तहकुबी सूचनेद्वारा बॅ.नाथ पे यांनी लोकसभेत वॉलकॉट प्रकरणावर चर्चा घडवून आणली. या चर्चेत भाग घेताना बॅ. नाथ पै म्हणाले, ““मॉन्तेरिओ, भूपत, लायक अल्ली या सर्वांचा मुकुटमणी वॉलकॉट! असे लोक भारतात येतात कसे? आणि आमचा फजितवाडा करून परत जातात कसे? आमच्या देशांत गुन्हा केलेल्या गुन्हेगाराला सजा देण्यासाठी आम्हाला दुसऱ्या देशाची मदत घ्यायला लागावी हे आमच्या स्वाभिमानाला शोभते काय? आमचे हात असे बळकट व्हावेत आणि टेहळणी खाते खरोखरीच असे जागृत व्हावे की आम्हाला लंडनमधील व्हाईट हॉलमध्ये जाऊन 'आमच्या गुन्हेगाराला पकडण्यास आम्हाला मदत करा हौ!' अशी याचना करण्याची वेळच आमच्यावर न यावी. सर्व गुन्हे माफ झाले आहेत अशा थाटात येणाऱ्या वॉलकॉटला देशात पाऊल टाकायची हिंमत होऊ नये असे सामर्थ्यवान आम्ही कधी बनणार? मॉन्टेरियो आमच्या देशात येऊन म्युनिसिपल कचेऱ्या तुडचितो आणि वर हे कृत्य केल्याची प्रौढी मिरवितो या सर्वातून काय निष्कर्ष निघतो? काय बोध होतो?*' असे प्रश्‍न उपस्थित करून नाथ पै उपहासाने आणि व्राग्याने म्हणाले, ''4616 3 [16 1क्षाव पायाब, ५० (5९5 ॥४०४€०, ५० 0 1'&वूपाड्प, पापत डिप 0015 पपक्षष्षा&प, ७०006 (७ ॥0बि.”' (ही भारतभूमी, लोकहो या, कुठलीही धास्ती नाही, कुठल्याही भांडवलाची गरज नाही, अफाट नफ्याला वाव, या या भारतात या, तुमचे स्वागत आहे.) गांधीजींच्या हत्येनंतर एक अमेरिकन सैनिक म्हणाला होता, '“या देशात कांहीही सुरक्षित नाही, कुणालाही संरक्षण नाही. एका साध्या बंदुकीने मी सबंध हिंदुस्थान जिंकू शकतो.'' याचा उल्लेख करून नाथ पै म्हणाले, ''या त्याच्या उद्‌गाराबद्दल मलाही विलक्षण संताप येतो. तो असे काहीही करू शकणार नाही
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now