डॉ० अनिल काकोडकर | DR. ANIL KAKODKAR

DR. ANIL KAKODKAR  by ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDEपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDE

No Information available about ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDE

Add Infomation AboutA. P. DESHPANDE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
म्हणाले, (पण मला तेथे जायचे आहे, तुम्ही स्वत: पण जात आहात.' तर ते म्हणाले, 'संशोधन म्हणजेच “आर अँड डी आणि विकास हेच तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.” मग काकोडकर संतापले आणि मेकोनींकडे गेले आणि त्यांना म्हणाले, “मला तुम्ही पीपीडीला का पाठवत नाही? तेव्हा मेकोनी म्हणाले, 'सुब्रमण्यमनी मला सांगून ठेवले आहे की याला आर अँड डी हेच ठिकाण योग्य आहे.” त्यावर काकोडकर म्हणाले, “मी पहिला आलो, मला माझ्या आवडीचा विभाग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्य तुम्ही मला पहिल्यापासून दिले नाहीत. माझ्यावर अन्याय होतो आहे.' तेव्हा मेकोनी म्हणाले, “पीपीडीचे संशोधन आणि विकास सगळा येथेच होणार आहे. ते काम येथे बसूनही तुला करता येणार आहे.” आज काकोडकरांना जाणवते की के. सुब्रमण्यम हे उत्तम मार्गदर्शक (मेंटॉर) होते आणि त्यांनी काकोडकरांच्या बाबतीत केले तेच योग्य होते. _) त्या वेळी कॅनडा-भारत अणुकार्यक्रम चालू होता आणि प्रत्येक तुकडीतील वयाने ज्येष्ठ आणि हुशार विद्यार्थ्यांना कॅनडाला पाठवित. काकोडकरांच्या अगोदरच्या सर्व तुकड्यांतील विद्यार्थी गेल्यावर मग सातव्या तुकडीची वेळ आली आणि काकोडकरांना विचारण्यात आले, 'तू जातोस का? काकोडकर म्हणाले, मला एमटेक करायला पाठवा. मग मी जातो.' आधीच्या तुकडीतील शेषाद्री यांना मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये एमटेक करण्यासाठी पाठविले होते. पण नंतर तो कार्यक्रम बंद करण्यात आला. तेव्हा बीएआरसीमध्ये एक नियम होता- अभियंत्यांनी पीएच.डी. वगैरेच्या मागे लागायचे नाही. त्यांनी आपला प्रकल्प पुरा करावा. काकोडकर म्हणाले, “तुम्ही पहिल्या-दुसर्‍्या तुकडीतील लोकांना एमटेक करायला पाठवले.” के. सुब्रमण्यम तर काकोडकरांना सांगून सांगून थकले होते की, 'तू कॅनडाला जा. तुझ्या मागचे लोक जातील मग तुझी संधी जाईल, तू स्पर्धेतून बाद होशील.” त्यांनी काकोडकरांसाठी खूप धडपड केली. शेवटी त्यांनी काकोडकरांसाठी आयएइए (आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था) फेलोशिप शोधून काढली. त्यामार्फत लोकांना पदव्युत्तर शिक्षणासाठी जाता यायचे. काकोडकरांना ही फेलोशिप मिळाली ते वर्ष होते १९६८. उच्च २० । डॉ. अनिल काकोडकर शिक्षणासाठी कोणाला डेप्युटेशनवर पाठवण्याची ही गोष्ट बऱ्याच वर्षांनंतर घडत होती. १९७४ पर्यंत हे चालू होते. पुढे तेही बंद झाले. नॉटिगहॅम विद्यापीठात एक्सपेरिमेंटल स्ट्रेस अँनॅलिसिससाठीचा एम.एस्सी.चा विशेष अभ्यासक्रम उपलब्ध होता. इतर विद्यापीठांत स्ट्रेस अँनॅलिसिस होते, पण एक्सपेरिमेंटल स्ट्रेस अँनॅलिसिस नव्हते. काकोडकरांनी तो शिक्षणक्रम खूप लक्षपूर्वक पुरा केला. नॉटिंगहॅम विद्यापीठात असताना काकोडकरांनी शेवटच्या परीक्षेचे पेपर्स लिहिले. तेथील परीक्षा पद्धती एवढी पारदर्शक आणि स्वच्छ होती, की पेपर तपासून झाल्यावर बाहेरच्या परीक्षकांनी काकोडकरांच्या प्राध्यापकांना कळवले की, 'काकोडकरांनी चांगले पेपर्स लिहिले असून मी त्यांना शंभरपैकी शंभर गुण दिले आहेत आणि त्यापेक्षा जास्त देता येणार नाहीत.' काकोडकरांनी नंतर त्यांचा प्रबंध परीक्षकांना पाठवला. परीक्षकांनी तो तपासला आणि “आम्ही तो स्वीकारला' असे ते म्हणाले. मग काकोडकरांनी त्यांच्या प्रोफेसरांना विनंती केली की, भाझी तोंडी परीक्षा (व्हायवा) घेऊन टाका, म्हणजे मी भारतात परत जायला मोकळा होईन.” मग काकोडकरांच्या प्रोफेसरांनी बाहेरच्या परीक्षकांना अशी तोंडी परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या सोयीची तारीख विचारली. तेव्हा ते आधी म्हणाले, “एक-दोन दिवसांत सांगतो.” काकोडकरांच्या प्रोफेसरांनी बाहेरच्या परीक्षकांना परत आठवण दिल्यावर ते म्हणाले, भया विद्यार्थ्याचा प्रबंध वाचून माझे पूर्ण समाधान झाले आहे. त्यांना विषय पूर्ण समजला आहे. तेव्हा तोंडी परीक्षेची गरज आता मला वाटत नाही.* काकोडकरांना त्याचे खूप आश्चर्य वाटले. आपल्याकडे उपचार म्हणून तरी नक्कीच तोंडी परीक्षा घेतली गेली असती. मग मात्र काकोडकर पदवीदान समारंभाला थांबलेच नाहीत. कारण त्याला अजून खूपच अवधी होता. पदवीदान समारंभ झाल्यावर विद्यापीठाचे औपचारिक पत्र आले की त्यात नाव आणि परीक्षेत मिळालेले यश याचा व्यवस्थित उल्लेख केलेला असतो. पण काकोडकरांनी नॉटिंगहॅमहून भारतात परतण्यापूर्वी त्यांनी प्रोफेसरांना विनंती केली की, मला एखादे तात्पुरते प्रमाणपत्र (प्रोव्हिजनल सर्टिफिकेट) द्या आणि पदवीदान समारंभ झाला, की मग माझे प्रमाणपत्र मला कृपया पाठवून द्या.” त्यावर प्रोफेसरांनी काकोडकरांनाच प्रश्न केला की “कसले तात्पुरते प्रमाणपत्र?* तेव्हा काकोडकर त्यांना म्हणाले की, “मला बीएआरसीने येथे भरपगारी पाठविले आहे. तेव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण । २१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now