डॉ० वसंत गोवारीकर | VASANT GOWARIKAR

VASANT GOWARIKAR by ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDEपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDE

No Information available about ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDE

Add Infomation AboutA. P. DESHPANDE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पाऊस पडायला लागला कौ बाहेरचे सरडे, कीटक, साप यांसारखे प्राणी आत यायचे. फारसे काम नसल्याने सगळे सहकारी बसूनच असायचे. प्रयोगशाळा नाहीत, वर छतसुद्धा नाही, कबुतरे टेबलावर घाण करायची. साराभाईंना हे सगळे सांगितले दी म्हणायचे, “भारतात काम करायची तुम्हाला अजून सवय झाली नाही.” पुढे तेथील गोठ्यात प्रयोगशाळा स्थापन झाली. तेथील बिशपचा तो गोठा होता. सगळीकडे झाडे- झुडपे वाढलेली होती. ती आधी साफ करून घेतली. तेथे वसंतरावांची धन प्रणोदकाची प्रयोगशाळा उभारली. जगात दुसरीकडे घन प्रणोदकांच्या ज्या प्रयोगशाळा होत्या, त्या वातानुकूलित, ठरावीक सापेक्ष आर्द्रता असलेल्या, सुरक्षेसाठी विशेष सुविधा असणाऱ्या असतात. आणि येथे? कसलीच सुरक्षा काही नाही. वसंतरावांच्या मते केवळ अज्ञान होते म्हणूनच ते तसले धाडस करू शकले. चक्क उघड्या खलबत्त्यात रसायने घालून ते घोटत असत. त्या वेळी काही अपघात झाला नाही, स्फोट झाला नाही हे त्यांचे नशीबच म्हणायचे. _) एकदा का केरळमधील मुसळधार पाऊस सुरू झाला, की सगळी प्रयोगशाळा हादरायची. भिंती ओल्या व्हायच्या. सरपटणारे प्राणी आत यायचे. खिडक्या-दरवाजे फुगून जायचे. झंझावाती वारा आत शिरायचा आणि तेथील सर्व जण जिवापाड जपत असलेल्या एका फळकुटावर लिहिलेला संदेश वाऱ्याबरोबर आत आलेल्या पावसाने पार धुवून जायचा. थोडी उघडीप झाली की तेथील काम करणाऱ्यांपैकी कोणीतरी पुन्हा त्याच उत्साहाने त्या फळकुटावर लिहायचे, 'ट॒ स्ट्राइव्ह दू सीक, टू फाइंड अँड नॉट टू यील्ड' म्हणजेच झगडत रहा, झुंजत रहा, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा. नित्य नव्याचा शोध घेत रहा आणि आपल्या ध्येयाची कास सोडू नका. शरण जाऊ नका, हार मानू नका. एकंदर सावधपणे कसे जायचे, एका नवीन तंत्रज्ञानात तुम्ही जात असताना आजूबाजूला पाहून चालायचे असते. भीती होती त्यामुळे निर्माण होणारा सावधपणाही होता. तो त्यांच्या एकूण गटासाठी धडाच होता. तंत्रज्ञान हे असे निर्मिले जात होते. कार्यालयापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर अग्निबाण प्रक्षेपित करायची सुविधा होती. या सुविधेत प्रक्षेपणाची दिशा व जमिनीशी होणारा कोन बदलता येत असे. अरबी समुद्राच्या दिशेने १८ 1 डॉ. वसंतराव गोवारीकर अम्निबाण प्रक्षेपित केला जाई. त्या वेळेस या बाबतीत भारतात जे तंत्रज्ञान होते, ते दारूगोळा बनवणाऱ्या (ऑर्डनन्स) फॅक्टरीमध्ये होते. तेव्हा आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कोणतेही अचूक दिशादर्शक किंवा नियंत्रित क्षेपणास्त्र (मिसाइल) बनवले जात नव्हते. सगळीच अंदाजाने जाणारी होती. त्याचे वजन सुमारे दहा किलोग्रॅमचे. ' इस्त्रोचे स्वप्न एस.एल.व्ही.-३ म्हणजे उपग्रह अंतराळात सोडण्याचे होते. त्याकरिता जी रचना चालली होती त्याच्याशी वसंतरावांचा संबंध होता. आणि त्या अग्निबाणाचे वजन काय असणार होते? तब्बल सतरा टन - म्हणजे १७,००० किलोग्रॅम. सगळ्यात मोठी म्हणजे १ मीटर व्यासाची मोटर तयार होणार होती ती अग्निबाणाच्या पहिल्या टप्प्याची. तिचे वजन होणार होते दहा टनांचे. आणि त्यावेळी फक्त दहा किलोग्रॅम क्षमतेची तयारी होती. पण वीसेक वर्षांनी आपल्याला काय करायचे आहे याचा जर डोक्यात सतत विचार असेल, तर मनुष्य पुढील वाटचाल करू शकतो. इस्रोत काम करणाऱ्यांना स्वातंत्र्य होते. परदेशी तज्ज्ञांना भारतीय प्रयोगशाळा कशा असाव्यात, त्यात काय लागेल याची विचारणा करावी हे भाभा-साराभाईना मान्य मव्हते. तेथे प्रत्यक्ष काम करणाऱ्या शास्त्रज्ञानी आपल्याला काय हवे, कोणत्या सुविधा हव्यात, कोणती उपकरणे हवीत हे ठरवावे असाच त्यांचा आग्रह असे. तरुण किंवा अनुभवी भारतीय शास्त्रज्ञांनी चुका केल्या तरी हरकत नाही, पण त्यांच्या कल्पनेनुसारच प्रयोगशाळा बांधल्या गेल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे. नवीन सुविधा, प्रयोगशाळा किंवा उपकरणे निर्माण करायला साराभाईंचा कधी विरोध नसे, पण मागितले की लगेच मिळाले इतके ते काम सोपे नव्हते. नवीन सुविधा कोणाला व कशाला हवी याची एक सामूहिक चर्चा होत असे. त्या सुविधेची गरज आहे असे सांगणाऱ्याला त्याचे म्हणणे शास्त्रज्ञांच्या सभेत पटवून द्यावे लागे. अशा सभेत बोलणाऱ्याचे ज्ञान, अभ्यास, विषयाची तांत्रिकता आणि चातुर्य पणाला लागे. सभेतला प्रत्येक शास्त्रज्ञ अशा बोलणाऱ्याला जोखत असे. कोण हुशार आहे, कोण अभ्यासू आहे, कोणाचे ज्ञान सखोल आहे, कोण उथळ आहे, कोण सभेत तर्कशुद्ध बोलू शकतो, कोणाच्या काय उणिवा आहेत, कोणाची ताकद कशात आहे, अशा पुन्हा मायभूमीकडे । १९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now