दिवास्वप्न | DIVASWAPNA

DIVASWAPNA by गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKA

No Information available about गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKA

Add Infomation AboutGIJUBHAI BADHEKA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साहेब म्हणाले, * ठीक आहे तुम्हाला जसं वाटतं आहे तसं करा. प्रयोगच करायला तुम्ही आला आहांत. पण हा चौथा महिना संपत आला. काळा फार झपाट्यानं जातोय हे लक्षांत घ्या. * नमस्कार करून मी घरी आलो. मी माझ्या पैशानं (किरकोळ खर्चासाठी जी रक्क्म होती तिच्यातून काहीच घेणं शक्य नव्हतं.) दोन चांगले झाडू खरेदी केले. एक छोटासा आरसा आणला. एक कंगवा, खादीचा एक पंचा आणि छोटी कात्री आणली. शाळेच्या आवरात एक नळ होता ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट ! त्या दिवशी मी वर्गात ही सगळी तयारी करून ठेवली. दुसऱ्या दिवशी मुलांना मी रांगेत उभं केलं. आता त्यांची सगळयाला तयारी असायची. त्यांचं माझ्यावर प्रेमही होतं, त्यांची खात्री होती कीमी जेकाही करतो ते त्यांच्या फायद्याचं असतं. मी त्यांना आरशात त्यांची तोंडं पहायला सांगितली आणि म्हणालो, * जर तुम्हाला आपलं तोंड, डोळे किंवा नाक घाणेरडं आहे असं वाटत असेल तर नळावर जाऊन धुवून या. आपले हात पाय धुवा आणि केसाला पाणी लावून या. * झालं ! सगळे “ हा 55 हू 5$ * करत एकदम बाहेर धावले आणि ढकलाढकली करत तोंड, हात, पाय, धुवायला लागले. मी मनात म्हटलं, * या मुलांना ओळीने जायचं, रांगेत उभं राहून कामं करायची, हे शिकवायला पाहिजे. असला दंगाधोपा तर आपल्या समाजात सगळीकडं चालतो. या बेशिस्तीपासून तर या मुलांना दूर ठेवलंच पाहिजे. मी लगेच तिथे एक रेघ आखली आणि म्हटलं, “ हे बघा या रेघेवर उभे राहा सगळे आणि आळीपाळीने एकेकजण नळावर जा. ” मी दोन्ही हातात दोन खादीच्या पंचाचे तुकडे घेऊन उभा राहिलो आणि मुलं दोन्ही बाजूंनी हात, पाय, तोड, डोकंपुसायला लागली. शाळेच्या आवारात हा अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच होत होता. त्यामुळे रस्त्यावरून जाता जाता लोक पाहात होते की, आज इथे हे चाललंय तरी काय ! हात, पाय, तोंड धुवून झाल्यावर आम्ही वर्गात गेलो. तिथे मुलांन कंगवा देऊन मी म्हटलं, * हं, चला आता आपापले केस विंचरा. * त्यांच्या टोप्या मी एका कोपऱ्यात ठेवून दिल्या होत्या. मुलं आता स्वच्छ, सुंदर आणि निटनेटकी दिसत होती. मी खडूनं एक गोल आखला आणि सर्वांना त्यावर बसवलं. मीपण तिथेच बसलो आणि त्यांना म्हणालो, “* बघा बरं, आता तुमचे हात किती स्वच्छ दिसताय्‌त ! तुमचे चेहेरे किती छान दिसताय्‌त ! तुम्हाला असं राहायला आवडतं की नाही ? * | ११ सगळे म्हणाले, “हो ! आवडतं तर मी म्हटलं, * मग आता असं करायचं, रोज शाळेत आल्याबरोबर हे काम करायचं. नंतर मग इतर कामं आपण करू. ” ८ चला त्या दिवशी मला फार बरं वाटलं. मनाला फार प्रसन्न वाटलं. मी म्हटलं, * चला आपण एककविता म्हणूया. * मी जी पहिली कविता म्हटली ती एक प्रार्थना होती. आपोआप माझ्या तोडून प्रार्थना बाहेर पडली. त्या दिवशी नखं कापायची राहिली. कपडे आणि बटणांच्या दुरखस्त्या करायच्या होत्या. तरी मी तात्पुरता त्यावळी तो विचार सोडून दिला आणि इतर कामं सुरू केली. (५) मी असा विचार केला की इतिहासाच्या अभ्यासाला तर मी गोष्टीतून सुरवात केलीच आहे. आता लोकगीतं गाऊन कवितेची सुरवात करावी. खूप विचार करून मी ठरवलं होतं की पहिले सहा महिने मला पायाभरणीचे काम केलं पाहिजे मग त्यावर सहा महिने अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची इमारत उभी केली पाहिजे. मुलांना जेव्हा असं काही नवं शिकायला मिळतं तेव्हा त्यांना त्यात गंमत तर वाटतेच पण आनद होतो, आणि प्रसन्नपण वाटतं. मी लोकगीताचा श्रीगणेशा करून म्हटलं, * आता आपण गाणं म्हणायचं बरं का . सगळयानी म्हणा. मी सांगतो, मी सांगितलं, “कान्हा माझ्या काळजाची कोर ग सखे कान्हा माझ्या काळजाची कोर ...... पण माझ्याबरोबर कोणीच गाणं म्हटलं नाही. मला आश्चर्य वाटलं. चौथीतल्या मुलांना एवढंही कसं नाही गाता येत ? पण त्यांना गाण्याची सवयच नव्हती. मी दुसर गाणं म्हटलं- “ माझा हा मोर बाई माझा ग मोर मोत्याचा चारा खातो माझा ग मोर * आत मुलांनी थोडं थोडं गाणं म्हटलं. पण २५ / ३० मुलांनी एकदम गायला सुरवात केली त्या कोलाहलानं वर्ग दणाणला. शेजारचे एक 0 काय चाललंय र बंद आवाज एक शब्द ऐकू आम्हाला ११ शेजारचे एक शिक्षक आले आणि म्हणाले, * काय चाललंय ? बंद करा हा आवाज. एक शब्द ऐकू येत नाही वर्गात ला.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now