वेचक आणि वेधक | VECHAK AND VEDHAK

Book Image : वेचक आणि वेधक  - VECHAK AND VEDHAK

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मोर्चा-मोर्च्याचा खेळ पाहणारे आनंदून उड्या मारत होते. एक आवाज आला... “मालकाच्या आईला...” “मालकाच्या बायकोला...'' “मालकाच्या पोरीला...'* मुली या घोषणा ऐकून भीतीनं अधिकच गोठून गेल्या. “ए्‌ अरे रॉकेल आणा...” जाळा... चला, ही मालकाची गाडी जाळा...'' “चला रॉकेल टाका... काडी लावा... पेटवा.” मुलांनी खोट्या गाडीवर खरं खरं रॉकेल टाकलं. मालकाच्या खोट्या खोट्या घरावर रॉकेल टाकलं. खोट्या मालकावर रॉकेल यकलं. सर्रकन काडी पेटवली. लावली. एकच भडका उडाला. पोलीसवाले ठण ठण घंटी वाजवत गाडी घेऊन आल्यासारखे गोलगोल फिरू लागले. मुलं बोंबा मारू लागली. भडकलेल्या आगीत काहीबाही टाकू लागली. उन्हाची साय आता तप्त पोलादासारखी खदखदायला लागली होती. आमरण उपोषणाला बसलेलं झाड आगीच्या धुरानं काळवंडून गेलं. पेंगून पेंगून थकलेल्या बायका मुलांच्या किंचाळण्याने जाग्या झाल्या. आगीची आच त्यांना जाणवली. त्या घाबरल्या. आगीच्या वाढत्या जोराकडे पाहून स्तंभित झाल्या. विचारू लागल्या! “काय झालं? कसं झालं?? कुणी केलं???” त्या सगळ्या जणी आगीकडे टकामका पाहू लागल्या. तेवढ्यात मुलांचा घोळका, घोषणा देत त्यांच्याच दिशेने येऊ लागला. नहीं चलेगी... नहीं चलेगी हम सब... हमारी मांगे.... मालकाच्या बायकोला... मालकाच्या पोरीला... बाया संतापल्या. पुढं झेपावल्या. म्हणाल्या,*रे कारट्यांनो, काय घाणेरडं बोलता मेल्यांनो...'' ''हा कसला बाई खेळ...'' “जीवघेणा... जिवावरचा...” मोर्चा / २८ “ये कशात रे दगड मारतो!” “अग बाई लागलं ग5'' “रे रे रे चटका बसेल ना!” “ये... गाढवा, तिचा परकर का ओढतोस... सोड तिला!” “नाही सोडणार! आम्ही मोर्चा-मोर्चा खेळतो!” “मोर्च्यामध्ये हे असंच असतं!” मुलांचा घोळका आता भयानक क्रुद्ध झाला होता. त्वेषपूर्ण आवाजात घोषणा देत देत आता बायकांच्या जवळ येऊन पोहचला. मुलांच्या घोळक्यात असकन्‌ घुसून बाया त्यांना पकडायचा प्रयत्न करू लागल्या. पण, त्यातल्या काही मुलांनी पुन्हा घोषणा दिली. मालकाच्या बायकोला... मालकाच्या पोरीला555 आणि मुलांनी एका बाईला पकडलं. तिच्या साडीशी झटापट करू लागली. ती आर्तपणे किंचाळू लागली. मुलं ओरडू लागली, दगड फेकू लागली. घोषणा देऊ लागली. पेटती काठी घेऊन तिच्याभोवती नाचू लागली. बाई घाबरीघुबरी होऊन ओरडत होती. साडीत पाय अडकून अखेर ती जमिनीवर पडली. तिच्या धपापत्या उरावर एक जण बसला आणि तिला बोचकारू लागला. तिनं त्या मुलाकडे असहायपणे पाहिलं. त्या मुलाचा चेहरा क्रुद्ध आणि लालबुंद झालेला होता आणि त्याचे डोळे तर... सकाळी सुरा घेऊन मोर्चाला जाताना तिच्या नवऱ्याचे डोळे असाच अंगार ओकत होते! ती पुन्हा एकदा जिवाच्या आकांताने ओरडली... बाकीच्या बायका आपापल्या घरात पळून गेल्या होत्या. विनमस्कपणे भातुकलीच्या विस्कटलेल्या खेळाकडे पाहात होत्या. उन्हाची साय आता चवताळलेल्या नागिणीगत डंख मारू लागली होती. झाडं अगतिक होऊन मोर्चा-मोर्च्याचा खेळ पाहत होती. सारा आसमंत भीतीनं शहारून गेला. मोर्च्याच्या खेळात अडकलेली बाई ““वाचवा, वाचवा55'' अशा विनवण्या वेचक आणि वेधक / २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now