शिवराजची गलोल | SHIVRAJCHII GULEL

Book Image : शिवराजची गलोल  - SHIVRAJCHII GULEL

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

भीष्म साहनी - BHISM SAHNI

No Information available about भीष्म साहनी - BHISM SAHNI

Add Infomation AboutBHISM SAHNI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लावून पहात होता. अडगळीच्या खोलीचे छत त्रिकोणी आकाराचे होते. दोन्ही बाजूला उतार आणि त्याच्या खाली एक लांब तुळई दोन्ही भिंतीतून आरपार गेली होती. त्या तुळईच्या एका बाजूला झशोक्याजवळ एक मोठं घरटं होतं. या घरट्यातून काड्या, कापूस, पिसांचे लोंबणारे घोस आम्हाला दिसत होते. हे मैनेचं घरटं होतं. कबुतरं तुळईच्या दुसऱ्या टोकाला गुर गू.. गुर गूं करत होती. आणि त्या तुळईवरून सारखी ये जा करत होती. घरट्यात मैनेची पिल्लं आहेत,'' शिवराज म्हणाला आणि त्यानं गलोलने नेम धरला. तेवढ्यात मला घरट्यातून दोन छोट्या छोट्या पिल्लांच्या चोची बाहेर डोकावताना दिसल्या. “बघितलंस? '' शिवराज म्हणाला, “ह्या विलायती मैना आहेत. त्या इथं घर नाही बनवत. नक्कीच द्यांचे आई बाबा आपल्या थव्यातून वाट चुकलेले दिसतात. इथं येऊन त्यांनी घर बांधलेले दिसतयं.*' “यांचे आईबाबा कुठे आहेत?*' मी विचारलं. “रवायला आणायला गेले असतील. येतीलच आता.*'* असे म्हणून शिवराजने परत गलोल उचलली. ८/शिवराजची गलोल मी त्याला गलोल मारण्यापासून थांबवणार होतो, पण तेवढ्यात शिवराजच्या गलोलीतून फर्रर आवाज झाला आणि पाळोपाठ टणत्कार वाजला. गलोलीतील दगड घरट्याला न लागता सरळ वरच्या पत्र्याच्या छताला जाऊन लागला. दोन्ही चोची घरट्यात दिसेनाशा झाल्या. सगळीकडे एकदम शांतता पसरली. बहधा मैनेची पिल्लं भितीनं निपचीत बसून राहिली असावीत. तेवढ्यात शिवराजनं गलोलीनं आणखी एक दगड सोडला. यावेळी दगड तुळईला लागला. शिवराजला आपल्या अचूक नेमबाजीबद्दल फार गर्व होता. दोन्ही वेळा नेम चुकल्यामुळे तो वैतागला. मग थोडा वेळ तो शांतपणे उभा राहिला. ज्यावेळी मैनेच्या पिल्लांनी आपल्या चोची बाहेर काढून घरट्यातून बाहेर डोकावलं, त्याचवेळी शिवराजने तिसऱ्यांदा दगड सोडला. यावेळी दगड घरट्याच्या कडेवर आपटला. गवताचे तीन चार तुकडे आणि कापसाचे बोळे उडाले. ते भिरभिरत येऊन फरशीवर पडू लागले, परंतु घरटं पडलं नाही शिवराजने पुन्हा गलोल ताणून नेम धरला. त्याचवेळी खोलीत एक भयानक सावली झेपावली. आम्ही मान वर करून वर पाहिलं. झरोक्यातून येणारा प्रकाश पूर्ण बंद झाला होता. खोलींत अंधार पसरला होता. झरोक्याच्या कठड्यावर एक मोठी घार आपले पंख पसरवून बसली होती . आम्ही गोंधळून तिच्याकडे पाहू लागलो. झरोक्यावर बसलेली ती घार भितीदायक वाटत होती. शिवराजची गलोल/<्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now