हर्मन मायनर | HERMAN MEINER

Book Image : हर्मन मायनर  - HERMAN MEINER

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शोभना रानडे - SHOBHANA RANADE

No Information available about शोभना रानडे - SHOBHANA RANADE

Add Infomation AboutSHOBHANA RANADE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दिली. अजून मला वाटत होतं की हा बेत बदलावा, बॅग उचलावी आणि सरळ घरी जावं. त्यांच्या छक्षात येईल की मी ठरलेल्या जागी उभा नाही, तेव्हा कुर्ट थोडा वेळ नाराज होईल आणि ते सर्वजण सरळ निघून जातील ! मी माझी बॅग उचचली. पण थांबलो. मला या प्रवासाचे आणखी एक आकर्षण होते. बालग्राम- मुलांची वसाहत ! ह्या विचाराने माझी ट्यूब पेटली पण डोळ्यांसमोर बालग्राम दिसेना ! पण हा विषय माझ्या आवडीचा होता आणि मी या बालग्रामांबद्दल वाचले पण होते ! अमेरिकेत फादर फ्लॅनेगनची एक बालनगरी (४0५5 0) आहे. इटलीमधे कॅरॉल अँबिंग असे प्रयोग करीत आहे. तर स्विटझ्रलंडमधे पेस्ट- छोझीने एक बालग्राम स्वतःच्या हिंमतीवर उभे केलेले आहे. समाजातील टाकून दिलेल्या मुलांबद्दल मी थोडेफार चिंतन पण केलेले आहे. व्हिएन्नामधे विद्यार्थी म्हणून असताना मी बालयुन्हेगारांच्या कोर्टातील कैफियती ऐकून त्यावर एक ठेखमालिका पण लिहिली होती आणि ह्या ठेखांतून माझी प्रतिक्रिया पण मी व्यक्त केली होती. माझे मन पुन्हा त्या विषयात रेंगाळठे. माझ्या टेबहाावर एक मोठा अहवाल मी ठेवला आहे. त्या अहवालात महायुद्धामुळे तरुण मुलांची जी हानी झाली होती त्याचे वर्णन दिले आहे. दुर्लक्षित मुळे, बेघर झाल्यामुळे उद्‌ध्वस्त जीवन झाहेली मुले, निर्वासित मुळे आणि बालगुन्हेगार मुळे सर्वांच्याच प्रश्नांचे सांगोपांग वर्णन त्या अहवालात दिले आहे. आता १०.३० वाजले. अजून ती बस कुठे दिसत नाही. बॅग उचलली पण पुन्हा खाली ठेवली. रस्त्याच्या त्या कडेला एक मुलगा लोळत पडला होता. त्याच्या अंगावर फाटका, तुकडे जोडून केळेला कुडता होता. माझ्या लक्षात आठं की जवळच एक निर्वांसितांची वसाहत आहे आणि त्यातूनच हा मुलगा इथे आला असावा. अशा ह्या निर्वासित भग्न वसाहती लिंझच्या जवळ पण आहेत. आणि त्यातली मुलं तुमच्याकडे मोठे डोळे करून भकास नजरेने बघत राहतात. काही जरा भित्री अस- तात, तर काहीजण चांगली धीट असतात. पण सर्वांची भूक एकच असते. त्यांना मायेची ऊब, जीवनाचे स्थैर्य आणि प्रेमाचा औलावा हवा असतो. मी त्यातल्या कित्येक मुछांजवळ त्यांच्या आईवडिलांची चौकशी केली होती. पण त्यांना कुणी नव्हतेच. मी त्यांचे घर कुठे आहे म्हणून विचारले होते पण ती सर्व मुले बेघर होती. कुठून आलो च ह्या दुःखद वाटेने कुठे जायचे आहे हे त्या मुलांना माहीतच नव्हते. खरंच, टिरोल येथील बालग्राम ह्या मुळांचे हे प्रश्न सोडविणार आहे का? कुर्ट म्हणाला होता की हे उत्तर शोधण्यासाठी प्रेसचे लोक टिरोलला जाणार आहेत आणि हर्मन मायनर ॥ २ ॥| म्हणूनच मी माझ्या प्रश्नाला प्राधान्य देऊन ह्या लोकांबरोबर बालग्रामला जायचे नक्की केले होते. पण ह्या बालग्रामाच्याबद्दल वर्तमानपत्रांतून बरीच चर्चा वाचली होती आणि त्यात बरीच टीका-टिप्पणीच होती. मला एकदा एक चर्च- चॅरिटी संस्थेचे संचालक भेटले होते. त्यांना ह्या बालय्रामची बरीच माहिती होती. आणि त्यांच्या बोलण्यावरून माझे मन पण थोडेफार साशंक बनळे होते. ते म्हणाठे होते की कुणाला तरी पुन्हा एकदा ह्या दुर्दैवी मुलांची आठवण झाली असावी आणि त्याचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी करून हे नवीन बालग्रामचे खूळ स्वतःची तुंबडी भरण्यासाठी वापरले असावे. तेव्हाच मी ठरवळे होते की एकदा प्रत्यक्ष जाऊन है टिरोलचं बालय्राम बघायचं. मी जातीचा पत्रकार होतो आणि त्यामुळे चांगल्या भाषण- बाजीने किंवा मुलांच्या नीटनेटक्या दिसण्यामुळे भावनावश होणाऱ्यांपैकी, खासच नव्हतो. ह्या विचाराने मी घरी परत जाण्याची कल्पना सोडून दिली. मी है बालग्राम बघायचेच ठरवले. मी बारकाईने पडद्याआडचं सर्व काही निरखायचं ठरवलं आणि आमच्या डोळ्यांना भुरळ पाडायला एखादी कृत्रिम रचना केली की काय याचा पण नक्की शौध घ्यायचा विचार नक्की केला. ही मंडळी खरी मुलांची सेवा करतात की सामाजिक प्रतिष्ठेची हाव त्यांना वाटते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग वर्तमानपत्रां- तूनच त्यांचे पितळ उघडे करण्याची कल्पना माझ्या मनात रुजली. ० माझ्या विचारात मी इतका गर्क होतो की व्हिएन्नाची बस आलेली मी पाहिलीच नाही. कुर्ट उडी मारूनच बाहेर आला आणि आम्ही दोघे बसमधे चढलो. बसचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि बस टिरोलच्या दिशेने धावू लागली. आमच्या समोरील इन्न व्हॅडीवरचे (100-४8116५) आकाश स्वच्छ होते. समौरील ३००० फूट उंचीवरील पर्वतशिखरांवर सूर्यनारायण विसावला होता. इन्नसब्रुक (॥7050100/८) आणि ऑरल्बेर्ग (8110८18) मधटठे इम्स्ट (7018) नावाचे एक लहान शहर आम्ही नुकतेच मागे टाकळे होते. पर्वतारोहण करणाऱ्या बसचे धक्के बसत होते. तेवढ्यात मला एक पाटी दिसली. “बालग्राम इम्स्टकडे जाणारा रस्ता'' अजून थोडे अंतर गेल्यावर काही टिरोलियन घरे दिसू लागली. एक निशाण पण फडफडत होतं आणि एका हिरवळीजवळ आमची बस थांबली. अखेरीस आम्ही पोहोचलो. बसच्या बाहेर पडताना मी शेवटी होतो. एक गृहस्थ हात पुढे करून माझ्याकडे आहे आणि म्हणाठे, “इम्स्ट बालग्राममधे तुमचे हार्दिक स्वागत.” हे गृहस्थ हर्मन मायनर होते. त्यांच्याशी झालेली ही माझी भेट व तो क्षण बालय्रामचा जनक ॥। ३ ॥।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now