कैप्टन लक्ष्मी एंड रानी ऑफ़ झांसी रेजिमेंट | CAPTAIN LAXMI SEHGAL AND RANI OF JHANSI REGIMENT

CAPTAIN LAXMI SEHGAL AND RANI OF JHANSI REGIMENT by पुस्तक समूह - Pustak Samuhरोहिणी गवाणकर - Rohini Gawankar

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रोहिणी गवाणकर - Rohini Gawankar

No Information available about रोहिणी गवाणकर - Rohini Gawankar

Add Infomation AboutRohini Gawankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कै.कर्नल सहगल यांनी सांगितलेले रबराच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या हालांचे वर्णन ऐकून अंगावर काटा येतो. ' रबराच्या झाडांच्या रांगा इतक्या आडव्या पसरलेल्या की त्यातून सूर्यप्रकाशाचा एक किरणही जमिनीवर येत नसे. पावसात दलदल इतकी होई की गुडघाभर पाय खाली चिखलात जाई. झोपड्या खांबावर बांधीत व त्याही एक प्रकारच्या झाडांच्या फांद्या व पाने यांच्या. जंगलात जळवांचे राज्य, मलेरियाचे थैमान. अशा ठिकाणी दक्षिण हिंदुस्थानी मजूर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी येऊन राहिले. त्यांना संघटना बांधता येत नव्हती. अहोरात्र कष्ट, कष्ट आणि कष्ट. अशा परिस्थितीत, सिंगापूर पडल्यावर जेव्हा इंडियन इंडिपेण्डन्स लीग त्यांच्या साहाय्याला आली तेव्हा त्यांना देवदूत भेटल्यासारखे वाटले तर नवल काय! अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा मातृभूमीच्या मुक्तीसाठी मानाने मरणे पत्करायचे त्यांनी ठरविले. म्हणून आझाद- हिंद-फौजेत पुढे त्यांची भरती मोठ्या प्रमाणावर झाली. १९३0 मध्ये मलायातील हिंदी लोकवस्ती ८,00,000 पर्यंत जाऊन पोहोचली होती. ब रबर उत्पादनात २,00,000 व ३,00,000 लोक टिन खाणींमध्ये, इतर उद्योगधंदे, कृषिउद्योग व सरकारच्या विविध खात्यांत काम करीत होते. युद्धापूर्वीच अखिल मलाया राष्ट्रीय काँग्रेस, सेंट्रल इंडियन असोसिएशन अशा संस्था स्थापन होऊन त्या राजकीय हक्कही मागू लागल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धापूर्वीच अनेकांनी आपली बायका मुले हिंदुस्थानातून आणून आपल्या जीवनाला मलायातच स्थैर्य आणले होते. मलाया हेच आपले घर आहे असे अनेकांना वाटू लागले होते. त्यामुळे द इथेच राहायचे असेल तर संघर्षाला पर्याय नाही हेही त्यांना कळून चुकले. सिंगापूर पडले, इंडियन इंडिपेण्डन्स लीग मलायातील भारतीयांच्या मदतीला धावून आली. पुढे सुभाषबाबू बोस मलायात आल्यावर तर या भित्र्या, अपमान सहन करीत कण्हत कुंथत जगणाऱ्या, मलायातील स्त्री-पुरुषांचा संपूर्ण कायापालट होऊन ते स्वाभिमानी, निडर बनले व भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यास सर्वांत प्रथम पुढे आले. र पूर्व व आग्रेय आशियातील युद्ध सुरू होण्यापूर्वी मलायात ८,00,000, सयाम (थायलंड) मध्ये ४0,000, ५0,000 इंडोचायना, जावा व सुमात्रामध्ये » बोर्निओमध्ये ५,000, फिलिपाईन्समध्ये ३,000 व चीनमधील हाँगकांग, शांघायमध्ये सुमारे २0,000 व जपानमध्ये सुमारे १५00 भारतीय होते. (सिदकी पृ.६४) र सयाम- आग्रेय आशियातील सयाम (थायलंड) हे एकुलते एक स्वतंत्र व अर्ध-वसाहतवत्‌ (8671-00107/8)) राज्य होते. या राज्यात चिनी व भारतीय संस्कृती व सभ्यता या दौन्हींचे वास्तव्य होते. सयाममधील कला, भाषा व कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झाशी रेजिमेंट ३० “स्कृतीवर भारताची अधिक छाप होती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी मथा] पंचावन्न हजार भारतीय होते. (इं नॅ. आर्मी पृ.४) बहुसंख्य भारतीय व्याप!/। ४1. फाही पोलीसमध्ये होते व काही पहारेकरी, निरोप्ये म्हणून काम करीत. दुस-या महायुद्धाच्या वेळी सयाममध्ये बर्‍याच भारतीय संस्था होत्या. १९३0 मध्ये इंडियन असोसिएशन ऑफ सयामची स्थापना झाली. सयाममधील भारतीयांना एकत्र आणण्याचे काम प्रफुल्लुकुमार सेन यांनी केले. सयाममधील लोक त्यांना स्वामी सत्यानंद पुरी या नावाने ओळखत. रवीन्द्रनाथ टागोर व म.गांधी यांचे भक्त असलेले तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर सेन गुरुवर्य टागोरांच्या सांगण्यावरून सास्कृतिक दूत म्हणून सयामला गेले. त्यांनी सयामी भाषा शिकून भारतीय संस्कृतीबद्दल विपुल ग्रंथनिर्मिती केली. सयाममधील भारतीयांचे ते नेते बनल्यास नवल नव्हते. सयाममधील भारतीयांचा राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्येयधोरणाशी परिचय होता, परंतु त्याची शाखा मात्र सयाममध्ये नव्हती. स्वामी पुरी व त्यांच्यासारख्याच विचारांच्या स्थानिक भारतीयांना जपानमधील राष्ट्रवादी भारतीयांच्या कार्याविषयी आस्था व रस वाटू लागला. सयाममध्येही इंग्रजविरोधी गुप्त कारवाया करणारा गट स्थापन झाला होता. युद्ध सुरू झाल्याबरोबर स्वामी व त्यांच्या सांस्कृतिक संघटनेने आपले ध्येय बदलले. सांस्कृतिक गोष्टीपेक्षा राजकीय कृति- कार्यक्रमांमध्ये भाग घेणे हे भारतीय लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटले. १९३३पासून सयाममध्ये असलेले शीख धर्मप्रचारक प्रीतम सिंग व ज्येष्ठ क्रांतिकारक बाबा अमर सिंग या दोघांनी मिळून इंडिपेण्डन्स लीग ऑफ इडिया या नावाची एक गुप्त संघटना स्थापन केली होती. गदर पक्षाशी त्यांचे संबंध होते असे सांगितले जाते. या इंडिपेण्डन्स संस्थेचे किती सदस्य होते हे कळायला मार्ग नव्हता. कारण ती संघटना गुप्त होती. त्या संस्थेशी संबंधित बरेचसे लोक फाशी गेले असावेत. सयाममध्ये 'स्वतंत्र भारत आकाशवाणी कार्यक्रम सयामी रेडिओ स्टेशनवरून सुरू झाला. स्वयंसेवकांचे एक पथकही तयार झाले होते. त्यात यु.पी.मधून आलेल्या गवळ्यांची अधिक भरती होती. ईशार सिंग 7 रघुनाथ शास्त्री, मौलवी मोहमद अकबर, शुक्ल इत्यादी नावांच्या तरुणांनी सयाममधील भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत पुढाकार घेतला होता. आकाशवाणीवरून स्वदेशवासीयांना युद्धाचा फायदा उठविण्याची विनंती ते करीत असत. ग्यानी प्रीतम सिंग यांनी थाय-मलाया सरहद्दीवरील भारतीय जवानांना उद्देशून लिहिलेली पत्रे ब्रिटिश हिंदी सैन्यात वाटली. सयाममधील इंडियन नॅशनल कॉन्सिल व इंडिपेण्डन्स लीग ऑफ इंडिया या दोन्ही संस्था पुढे इंडियन इंडिपेण्डन्स लीग ऑफ ईस्ट एशिया या संस्थेत विलीन झाल्या. थाय सरकारनेही भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला ३१ कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिग?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now