उत्तम संस्कार कथा -1 | UTTAM SANSKAR KATHA - ONE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
56
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विभिन्न लेखक - Various Authors
No Information available about विभिन्न लेखक - Various Authors
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८. तोडणे सोपे, जोडणे अवघड
भगवान बुद्धांच्या काळातली गोष्ट. एका घनदाट अरण्यात एक
दरोडेखोर राहत होता. तो फार दुष्ट होता. लोकांना लुटणे, त्यांचा
जीव घेणे याचे त्याला काहीच वाटत नसे. केवळ मजा
म्हणूनदेखील तो लोकांची मुंडकी उडवी. कोणाचाही जीव घेण्यात
त्याला मोठा आनंद बाटे. लोक त्याला फार घाबरत. नुसते त्याचे
नाव ऐकले, तरी ते थरथर कापू लागत
एकदा काय झाले -- भगवान बुद्ध त्या भागात आले.
लोकांनी त्यांना परोपरीने विनवले, “महाराज, आपण या अरण्यातून
जाऊ नका. या अरण्यात एक दरोडेखोर आहे. तो फार दुष्ट आहे.
त्याला कसलीच दयामाया नाही मागंपुढं न पाहता तो तुमचाही
जीव घेईल. आपण मागं फिरावं.** हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद
स्मित केले. सर्वांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि काही न
बोलता शांतपणे ते पुढे निघाले. त्यांना अरण्यात शिरताना पाहून
सगळे लोक हळहळले. त्यांना वाटले आता भगवान बुद्ध त्या
दरोडेखोराच्या तावडीत सापडणार आणि' तो त्यांना ठार मारणार.
थोडे अंतर चालून गेल्यावर दाट अरण्य लागले. भगवान बुद्ध
त्या अरण्यातील वाटेने पुढे जात होते. इतक्यात अचानकपणे तो
दरोडेखोर त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात तळपती
नंगी तलवार होती. भगवान बुद्धांना पाहून खाशी शिकार
मिळाल्याचा त्याला आनंद झाला. खदखदा हसत तो भगवान
बुद्धांकडे रोखून पाहू लागला. भगवान बुद्ध जराही भ्याले नाहीत,
की घाबरून मागे सरकले नाहीत. आपल्या जागेवर ते निश्चल उभे
होते. त्यांनी शांतपणे विचारले, “तुला काय हवंय ?”'
य
दरोडेखोर म्हणाला, ' तुझा प्राण !*
भगवान बुद्ध बोलले, ' माझा प्राण ? म्हणजे तू मला ठार
मारणार आहेस ? बेलाशक मार ! हा मी तुझ्यापुढ उभाच आहे,
पण त्या आधी माझं एक छोटसं काम करशील का ?*
“काम ? कसलं काम ?''
भगवान बुद्ध म्हणाले, “अगदी साधं, सोपं काम. ह्या
समोरच्या झाडाची चार पानं हवी आहेत. तू तोडून आणशील ?
“एवढंच ना ? माणसांची मुडकी सपासप तोडणारा मी ! मला
पानांचं काय ?*'* असं म्हणून तो झटकन वळला आणि त्या
झाडाची चार पाने तोडून घेऊन आला. त्या पानांकडे बघत बुद्ध
म्हणाले, छान !. आता अजून एक काम कर अन् मग मला.
खुशाल ठार मार. उ
“काय काम ते लवकर सांग.
भगवान बुद्ध म्हणाले, आता एवढंच कर -- ही पानं तू
जिथून तोडून आणलीस, तिथंच परत जोडून ये.
दरोडेखोर हसून म्हणाला, *'तोडलेलं पान कधी जोडता येतं
का?”
बुद्ध म्हणाले, मग भल्या माणसा, तोडलेलं पान जर जोडता
येत नसेल, तर मग घेतलेला प्राण परत देता येईल का ? जे
आपल्याला जोडता येत नाही ते आपण तोडावं कशाला ? तोडणं
सोपं, जोडणं अवघड. ज्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा
अधिकार काय ?*'
भगवान बुद्धांचे हे बोल ऐकून तो चपापला. (तोडणं सोपं
जोडणं अवघड हे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानांत घुमू लागले.
त्यापाठोपाठ आजवर कापलेली मुंडकी त्याच्या डोळ्यांपुढे येऊ
२१
User Reviews
No Reviews | Add Yours...