तुमचे आमचे सुपर हीरो | TUMCHE AAMCHE SUPERHERO

TUMCHE AAMCHE SUPERHERO  by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAदीपा देशमुख - DEEPA DESHMUKHपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

दीपा देशमुख - DEEPA DESHMUKH

No Information available about दीपा देशमुख - DEEPA DESHMUKH

Add Infomation AboutDEEPA DESHMUKH

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ । सुपरहिरो । अरविंद गुप्ता काय बनवता येईल याचा विचार करत. अनेक प्रकारे प्रयोग करून अगदी खेळण्यातली छोटी छोटी उडणारी बिमानंही त्यांनी तयार केली होती आयआयटीतल वाचनालय खूपच चांगल्या - उत्तम अशा दर्जाचं होतं. विद्यार्थ्यासाठी सकाळी ८ पासून रात्री १२ वाजेपर्यंत हे वाचनालय खुलं असे. त्यामुळे कुठल्याही वेळेस वाचनालयात जाऊन हवं ते पुस्तक घेऊन वाचता येत असे. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकाला एका वेळी १0 पुस्तकं या वाचनालयातून नेता येत असत. लहानपणी, बरेलीत, जगातल्या ज्या ज्ञानापासून अरविंद बंचित होता, ते सगळं त्याच्यापुढे इथं खुलं होतं. त्याला खुणावत होतं. बरेलीतली वाचनाची सुप्त भूक आयआयटीत असलेल्या वबाचनालयानं भागवली होती. अरबविंदच्या हॉस्टेलमध्ये ५-५ वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र येत आणि अरविंद ती अधाशासारखा एका दमात वाचून त्याचा फडशा पाडत असे. कानपूरमध्ये आयआयटीत अरविंद शिकत असतानाचा काळ राजकारणानं भारलेला होता. तो काळही विलक्षण धुमश्चक्रीचा होता. बाहेरच्या जगात बरंच काही घडत होतं. हे जग खूपच वेगळं ८ होतं. यात गरिबी होती, बेकारी होती आणि युद्धंही होती. तसंच संप, मोर्चे आणि घोषणाही होत्या! जगभर भांडवलशाहीच्या विळख्यात समाज अडकलेला होता. या काळात जगभर युद्धविरोधी चळवळ, कीटकनाशकाच्या विग्रेधातले आंदोलन, स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ, हिप्पी चळवळ, बीटल्सच संगीत, विद्यार्थ्यांची बंड आणि कामगार चळवळी यांच्याबरोबर आणखी एक संधर्ष खदखदत होता तो म्हणजे, वंशट्रेषाविरुद्धचा संघर्ष. भारतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळींचा जोर वाढत होता, तसंच दुसरीकडे नक्षलवादी चळवळीही वाढत होत्या. काही जग बदलू पाहणारे तरुण एका हातात चारमिनार सिगारेट आणि दुसर्‍या हातात कॉफीचा कप घेऊन तावातावानं चर्चा करताना दिसत. पण त्या पोकळ चर्चेत अरविंदला रस नव्हता. आपण काय करू शकतो आणि काय केलं पाहिजे याची स्पष्टता त्याच्याकडे होती. गांधीजींच्या विचाग्रनं प्रेरित होऊन आपल्या आरामाच्या नोकऱ्या सोडून अनेकांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. गोंधींजीचा खेड्याकडे चला हा संदेश तरुणांना आकर्षित करत होता. त्यामुळेच आयआयटीतल्या काही तरुणांना, आपणही काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं घेरलं होतं. पण नेमक काय करायचं हे नक्की कळत नव्हतं. त्या काळाची घोषणाच होती, लोकांबरोबर राहा, त्यांच्याबरोबर आणि त्यांना माहीत असेल तिथुन सुरुवात करा. त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर उभे राहा. या घोषणेचा आणि लहानपणी शाळेतल्या संदेशवहीतल्या संदेशाचा अर्थ एकच होता. अरविंदवर या गोष्टींचा बोलवर परिणाम झाला. अरविंदची सामाजिक शिक्षणाची सुरुवात याच घटनेनं झाली. आयआयटीतल्या उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांच्या मुलांसाठी आयआयटीच्या परिसरातच दोन शाळा होत्या. या शाळेत प्राध्यापकांची मुलं जात; पण आयआयटीत काम करणारा जो कामगार आणि कष्टकरी वर्ग होता, त्यांच्या मुलांसाठी मात्र शिक्षणाची कुठलीही व्यवस्था नव्हती. स्वयंपाक बनवण्यापासून ते साफसफाईचं काम करणारे अनेक जण पहाटे ५ पासून रात्री ११ पर्यंत राबत. त्या कामगारांचे हे कष्ट पाहन अरविंद आणि त्याच्या मित्रांना अतिशय वाईट वाटायचं. प्राध्यापकांची मुलं जेव्हा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now