महर्षि धोंडो केशव कर्वे | MAHIRSHI DHONDO KESHAV KARVE

Book Image : महर्षि धोंडो केशव कर्वे  - MAHIRSHI  DHONDO KESHAV KARVE

More Information About Authors :

एन० एम० जोशी - N. M. JOSHI

No Information available about एन० एम० जोशी - N. M. JOSHI

Add Infomation AboutN. M. JOSHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वप्न: पूर्ती आणि विस्तार 'महर्षी कर्वे' हे पदवीनं नंतर महर्षी झाले. पण कार्याच्या रूपानं ते सुरुवातीपासूनच महर्षी होते. या महर्षीनं एक' स्वप्न पाहिलं. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यानं अथक परिश्रम केले. अनाथबालिकांना आणि विधवांना शिक्षणाद्वारे समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या रूपानं या स्वप्नाची सुरुवात झाली. सर्वसामान्य मुलींनाही शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशानं महिला विद्यालयाची स्थापना झाली. पण एवढ्यानं ही स्वप्नमालिका थांबली नाही. खरीशिक्षणाचं पताकास्थान म्हणजे महिला विद्यापीठ. अनेकांच्या मनात असा प्रश्न होता की १८५७ सालीच भारतात विद्यापीठांची स्थापना झाली होती. मुंबई विद्यापीठ होतेच. या विद्यापीठात खरियांना उच्च शिक्षणासाठी मज्जाव होता असे नाही. मग कर्वे यांना महिलांसाठी वेगळे विद्यापीठ असावे असे का वाटू लागले? आपल्या आत्मवृत्तात कर्वे यांनी खीशिक्षणाबाबत आपली तात्त्विक भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे असे- कै स्रिया म्हणजे मानवजातीचे घटक व स्वत्वविशिष्ट व्यक्‍ती आहेत हे ओळखून त्यांना शिक्षण द्यावे. ्ॅ* सुपत्नी व सुमाता होण्याची पात्रता खियांच्या अंगी येईल असे शिक्षण त्यांना देणे. कै आपल्या प्रापंचिक जीवनाचा राष्ट्राच्या उन्नति-अवनतीशी, अस्फुट असला तरी, निकट संबंध आहे असे त्यांच्या नेहमी ध्यानात राहील अशा प्रकारचे शिक्षण त्यास देणे. महर्षी धोंडो केशव कर्वे २३ निरनिराळे पाश्चात्य व पौर्वात्य विचारवंत, शरीरशास्त्रज्ञ, डॉक्टर, वंशशासतज्ञ यांचे खत्रीपुरुषभेदासंबंधी व समानतेसंबंधी विचारांचे समालोचन करून कर्वे यांनी याबाबत भूमिका तयार केली. स्त्रियांना वेगळ्या शिक्षणाचीच गरज आहे येथपासून स्त्रियांना वेगळेच काय, पण कुठलेच शिक्षण असण्याची मुळीच गरज नाही असे विविध वादीसंवादी सूर त्याकाळी समाजात प्रचलित होते. या सर्व विचारांचा ऊंहापोह करून कर्वे यांनी ख्ियांच्या उच्चशिक्षणाबाबत आपली चार प्रमेये मांडली. $$ आपण जबाबदार मानवी व्यक्ती आहोत ही भावना व आपल्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वास ज्याच्या योगाने उत्पन्न होईल असे पुरुषसामान्य शिक्षण सखियाना देणे. $ स्त्रिया या कुटुंबाच्या सूत्रधार असतात. 'गृहिणी गृहमुच्यते यातील गर्भितार्थाप्रमाणे तशी ग्हिणी बनविण्याचे सामर्थ्य ज्या शिक्षणाच्या योगाने ख्रियांमध्ये उत्पन्न होईल असे शिक्षण त्यांना देणे. कै आपण राष्ट्राचा घटक आहो ही भावना ज्या शिक्षणाने उत्पन्न होईल असे शिक्षण स्रियांना दिले पाहिजे. $ काही कारणांनी आपण संसारात पडू नये असे ज्या स्त्रियांना वाटत असेल त्यांनी आपापली ध्येये ठरवून, ती साध्य होण्याला ज्या शिक्षणाची जरूर असेल, ते शिक्षण त्यांना दिले पाहिजे. अशा स्त्रियांचा लहानसा वर्गही राष्ट्राच्या स्थैर्याला व प्रगतीला आवश्यक आहे. कोणत्याही स्त्रीला आपण अमुक विद्या शिकावी असे वाटून, अमुक उद्योग करावा असे वाटत असेल, तर कायद्याची अथवा समाजाची बंधने तिच्या मार्गात आडवी येऊ नयेत. सामान्यत: स्त्रियांनी कोणते शिक्षण घ्यावे याविषयी विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या विचारांचे प्रतिबिंब कृतीत उठविणारी माणसे तयार झाली पाहिजेत. अशा विचारांच्या व कृतीच्या झगड्यातुनच उत्क्रांतीची वाट गेली पाहिजे. निष्काम-कर्म-मठ या चळवळीत सहभागी असणारे श्री. महादेव गाडगीळ यांनी महिला विद्यापीठाच्या कार्यासाठी पहिली दहा हजार रुपयांची देणगी देण्याचे ठरविले. “महाराष्ट्र वुइमेन्स युनिव्हर्सिटी ही स्थापन होऊन तिचे पहिले कॉलेज हिंगणे येथे असावे अशी गाडगीळ यांनी इच्छा व्यवत केली. याच सुमारास राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अधिवेशन मुंबईत भरले. परिषदेचे सरचिटणीस होते सर नारायण चंदावरकर. परिषदेचे अध्यक्ष म्हणून कर्वे यांची निवड झाली. राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष या नात्याने कर्वे यांनी महिलाशिक्षणाविषयी आपले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now