प्रयोगातून विज्ञान | SCIENCE IS - MARATHI - PRAYOGATOON VIGYAN

Book Image : प्रयोगातून विज्ञान  - SCIENCE IS - MARATHI - PRAYOGATOON VIGYAN

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुसान बोसाक - SUSAN BOSAK

No Information available about सुसान बोसाक - SUSAN BOSAK

Add Infomation AboutSUSAN BOSAK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न संशौधंक हे सतत प्रश्‍न विचारत असतात. खालील खेळामध्ये उत्तराचे अनेक पर्याय असताना, प्रश्‍न विचारत नेमक्या उत्तराकडे पोचता येते का बघू या. ट्रीपला गेल्यावेळी, प्रवासात, लहानमोठे सर्वांनी मिळून दोनपासून ३०-४० मुलांमध्ये हा खेळ खेळता येतो. श, एकाने एक वस्तू निवडून (टेबल, खुर्ची अशी निर्जीव किंवा कुत्रा, पोपट अशी सजीव) कागदावर लिहून ठेवायची आहे. असंख्य उत्तरे असू शकतात. त्यामुळे समोरच्या मुलांना गवताच्या गंजीतून सुई शोधायची तयारी ठेवावी लागते. उ समोरच्या मुलांनी एकेकाने किंवा चर्चा करून तुम्हांला प्रशन विचारायचे आहेत. उत्तर फक्त होय किंवा नाही यांपैकी एकच असेल. प्रश्‍न विचारताना अडले तर तुम्ही एखादी सूचना देऊ शकता. प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरागणिक विचारणारा उत्तराच्या जवळ जाती. प्रश्‍नांची संख्या वाढली की प्रश्‍न नेमके होत जातात. कुणालाच उत्तर आले नाही तर एखादी संबंधित सूचना देऊन खेळ पुढे न्यायचा आहे. दोन गट करून हा खेळ खेळता येतो. पूर्ण उत्तर मिळेपर्यंत किती प्रश्‍न विचारले जातील ती संख्या शंभरातून वजा करून तितके गुण देता येतील. त्यामुळे कमीतकमी प्रश्‍न विचारून उत्तर शोधणाऱ्या गटाला जास्त गुण मिळतील. आपल्याजवळ असलेली वस्तू धरली तर धावत जाऊन तिला शिवणे हा शारीरिक भागही त्याला जोडता येईल. एखादी प्रसिद्ध व्यक्ती, खेळ, स्थळ निवडून हा खेळ खेळता उदा., कावळा हा शब्द लिहून ठेवला. प्रश्नांची सुरुवात खाली दिल्याप्रमाणे करता येईछ : १. सजीव आहे? होय. २. वनस्पती आहे? नाही... म्हणजे प्राणी. (किंवा पक्षी) ३. पाण्यात संचार असतो? नाही. . जमिनीवर? माही... म्हणजे पक्षी. ५. शहरात आढळतो? होय. ६. माणसाळता येतो? नाही. ७. काळा रंग आहे? होय... कावळा/कोकीळ/मैना. असे उत्तराचे पर्याय कमी कमी होत जातात. वस्तूच्या गुणधर्मांवर आधारित प्रश्‍न असावेत, त्यामुळे उत्तरावरून वस्तूचा एक मोठा गट वगळता येतो. पक्षी या पर्यायाकडे आल्यावर चिमणी आहे? पोपट आहे? असे प्रश्‍न विचारले तर संख्या वाढते आणि गुण कमी होतात. वस्तूंचा गट करून प्रश्‍न विचारले तर कमीतकमी प्रश्‍नसंख्येत उत्तराकडे पोचता येते. नीट निरीक्षण करणे आणि नेमके प्रश्‍न विचारणे हे विज्ञानात महत्त्वाचे आहे. संशोधक ही प्रत्येक वस्तूबद्दल, घटनेबद्दल कुतूहल वाटणारी माणसे असतात. स्वतःला सतत प्रश्‍न विचारत त्याची उत्तरे शोधत असतात. त्यासाठी विज्ञानातील मूलभूत कल्पनांचा आधार घेतात. नेमका प्रश्‍न विचारणे हे वाटते तेवढे सोपे नसते. कधीकधी चुकीच्या दिशेने विचार केला जातो; कारण प्रश्‍नाचे नेमके स्वरूप कळलेले नसते. मग उत्तरेही चुकीची मिळतात. आपण योग्य ते प्रश्‍न विचारण्याची वृत्ती जोपासणे महत्त्वाचे आहे. संशोधक वृत्तीचा तो एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. आजूबाजुच्या कशाकशाबद्दल कुतूहल वाटते यावर मुलांनी विचार करायला हवा. आसपासची घटना, उदा. एकाने जांभई दिली तर दुसऱ्याला ती का येते? इतिहासातील घटना, उदा. डायनासोरचे काय झाले? दूरवरच्या घटना, उदा. परग्रहावर जीवसृष्टी आहे का? आपल्या या विश्वाबद्दल शास्त्रज्ञांना सर्वकाही ठाऊक आहे का? इ. अशा प्रश्‍नांवर विचार करत राहिले तर मुलांना सर्व वस्तू, घटना याबद्दल आश्चर्य वाटत राहते. प्रश्‍न शोधायची आणि मग त्यांची उत्तरे शोधायची सवय लागते. यालाच पुढे संशोधक वृत्तीचे स्वरूप प्रयोगातून विज्ञान / २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now