अणणा भाऊ साठे | ANNA BHAU SATHE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
49
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
बजरंग कोरडे - BAJRANG KORDE
No Information available about बजरंग कोरडे - BAJRANG KORDE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)24 अण्णा भाऊ साठे
जाती-जमातींचे अत्यंत प्रामाणिक, समर्थ आणि जिवंत चित्रण या कादंबरीत करण्यात
आले आहे. हे या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अण्णा भाऊंनी
अतिशय बारकाईने या भटक्या लोकांची जीवनपद्धती, त्यांचे संघर्ष, त्यांची दुःखे,
त्यांच्यातील प्रेमप्रकरणे, त्यांची नीतिमत्ता, व्यवसाय, रीतिरिवाज, दंडक,
त्यांच्यामधील पोटजाती आणि सुस्थिर समाजाचा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोण यांचे
चित्रण केले आहे. पारंपरिक मराठी साहित्याच्या वाचकासाठी या कादंबरीत केलेले,
ग्रामीण भागातील भटक्यांचे चित्रण पूर्णपणे नवीन आहे. या कादंबरीत यंकू या
माकडवाल्याची मुलगी दुर्गा आणि सख्या माकडवाल्याचा मुलगा येमू यांच्यातील
उत्कट प्रेमाचे चित्रण केले आहे. दुर्गा आणि येमू यांना कोणकोणत्या अडचणींतून
जावे लागते, अखेर कशा प्रकारे एके खत्री पाऱ्या या खलनायकाने चिथावून
पाठवलेल्या दोन चोरांशी लढताना यंकूचा मृत्यू होतो याचेही चित्रण कादंबरीत
करण्यात आले आहे.
'वैर' ही कादंबरी एकंदर भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील
जमीनदारी पद्धत, सामान्य माणसांची पिळवणूक आणि जमीनदारांची
जुलूृमजबरदस्ती यांच्याबद्दल आहे. या कादंबरीला “वैर' असे शीर्षक दिलेले आहे,
कारण येळापूर गावातील गोपाळराव इनामदार या जमीनदाराचे आपल्या जवळजवळ
संपूर्ण गावाशीच वैर असते. काही खलप्रवृत्तीच्या गुंडांच्या सहाय्याने तो गावकऱ्यांना
चिरडण्याचा प्रयत्न करतो. ज्या गावात आपण रहातो, त्या संपूर्ण गावाशी वैर
करणे हे धोकादायक व चुकीचे असते हे त्याला फार उशीरा, अगदी शेवटी
उमगते. पण ही फार उशीरा झालेली जाणीव असते, आणि जेव्हा त्याला ही
जाणीव होते, तेव्हा त्याचाच एक साथीदार गुंड्या त्याला मारून टाकतो. येळापूर
गावातील “आहे रे” वर्गातील एक सधन शेतकरी आणि 'नाही रे' वर्गातील अनेक
गरीब शेतकरी यांच्यातील वर्गसंघर्षाचे चित्रण म्हणूनही या कादंबरीचा अभ्यास
करता येतो. अण्णा भाऊंनी आपल्या प्रत्यक्ष जीवनात स्वीकारलेल्या, वर्गसंघर्षाच्या
साम्यवादी तत्त्वज्ञानाशी हे सुसंगतच आहे.
“डोळ मोडीत राधा चाले' या कादंबरीचे शीर्षक महाराष्ट्रातील संत एकनाथ
यांच्या 'वारियाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले' या प्रसिद्ध गवळणीच्या
ध्रुवपदातून घेण्यात आले आहे. खत्रीच्या वागणुकीतील मनमोकळेपणाचा ग्रामीण
भागातील खलप्रवृत्तीच्या लोकांकडून कसा विपरीत अर्थ लावला जातो आणि
त्यामुळे अनेकांच्या जीवनात दुःखद घटना कशा घडतात याचे चित्रण या कादंबरीत
करण्यात आले आहे.
कादंबऱ्या 25
'रानबोका' या कादंबरीतील सुरळ गावातील काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा
कोंबड्या, कोंबडे व त्यांच्यासारखेच निष्पाप पक्षी-प्राणी मारणाऱ्या रानबोक्यासारख्या
स्वभावाच्या असतात, म्हणून या कादंबरीला रानबोका' हे शीर्षक दिलेले आहे.
ज्यांना या 'रानबोक्यां'चा उपद्रव होतो, अशा लोकांकडून कधी-ना-कधी हे रानबोके
त्यांच्या घृणास्पद गुन्ह्यांसाठी मारून टाकले जातात. त्याचप्रमाणे, काही काही
खलप्रवृत्तीची पात्रे या कादंबरीत मारून टाकली जातात. या कादंबरीत मोहना,
संभाजी चौगुले आणि लक्ष्मी असा प्रेमाचा त्रिकोणही आहे. मोहना ही तमाशातील
एक नर्तकी असते. संभाजी चौगुले हा चिमाबाई चौगुले यांचा एकुलता एक मुलगा
असतो. आपला मुलगा तमाशातल्या नर्तकीवर अनुरक्त झाला आहे हे लक्षात
आल्यावर चिंमाबाई संभाजीचे लग्न लक्ष्मीशी ठरवतात. परंतु, मोहनाने संभाजीला
लक्ष्मीशी लग्न करण्यासाठी परवानगी देऊन केलेल्या त्यागाची लक्ष्मीला जाणीव
असल्याने ती संभाजीला मोहनाशी दुसरे लग्न करण्याची लेखी अनुमती देते.
कुरूप' (इथे अर्थ : चिघळलेली जखम) या कादंबरीची कथा महाराष्ट्रातील
दोन पाटील परिवारांमधील नेहेमीच दिसणाऱ्या स्पर्धेची पारंपरिक व साचेबंद कथा
आहे. म्हणजेच, यातील एक व्यक्तिरेखा चांगल्याचे प्रतिनिधित्त्व करते, तर दुसरी
व्यक्तिरेखा वाईटाचे प्रतिनिधित्त्व करते. “कुरूप” हे कादंबरीचे शीर्षक प्रतीकात्मक
आहे. कारण बाबा पाटील ह्य खलनायक आपल्या दुष्टपणामुळे व
अत्याचारीपणामुळे गावकऱ्यांसाठी एक प्रकारचे कुरूपच बनला आहे. पण दादा
पाटील हा बाबा पाटलाच्या वाईट चालींशी चांगलाच सामना देतो. परंतु, तापामुळे
दादा मरण पावतो आणि बाबा पुन्हा आपले अत्याचार सुरू करतो. दादाची पत्नी
हरणाबाई हिच्याबद्दल बाबाला लैंगिक आकर्षण वाटत असते. तिच्यावर अत्याचार
करण्यासाठी एका यात्री दादाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना,
हरणाबाईने झाडलेल्या पिस्तुलातील गोळ्यांमुळे तो मारला जातो. गावकऱ्यांना
एखाद्या कुरूपाप्रमाणे उपद्रव देणाऱ्या बाबा पाटलाचा अशा श्रकारे काटा काढला
जातो.
पाझर” या कादंबरीत आकुबा आणि तुकोबा या गावगुंडांच्या गुंडगिरीमुळे
पारगाव नावाच्या खेड्यातील मायेचा पाझर कसा आरतो, या गुंडांचा शेवटी
पराभव कसा होतो आणि गावातील मायेचा पाझर पुन्हा कसा वाहू लागतो याचे
चित्रण करण्यात आले आहे. या कादंबरीत चंद्रा आणि नाना यांच्या प्रेमाचे व
विवाहाचेही चित्रण आहे.
'केवड्याचं कणीस” ही गुंड्या नांवाचा एक पहिलवान आणि त्याचे साथीदार
User Reviews
No Reviews | Add Yours...