विचारा का ? | VICHARA KA?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
947 KB
Total Pages :
42
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
विभिन्न लेखक - Various Authors
No Information available about विभिन्न लेखक - Various Authors
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)7.3 प्रमाणेच पडदा व भिंग ठेवा. » बाजूने भिंगातून
पाहिले की बटर पेपरचा पोत स्पष्ट दिसतो.प्रयोग
7.3 मध्ये जेव्हा भिंगातून पडद्यावर रेखीव प्रतिमा
मिळते, तेव्हा भिंगाच्या नाभीपाशी पडदा ठेवलेला
आहे. म्हणजेच भिंगातून पडद्याचे निरीक्षण
करण्यासाठीही ते अंतर योग्य आहे. या प्रयोगात
बाजूला लावलेले भिंग हे फक्त पडद्यावरील दृश्य
तपासून पाहण्यासाठी आहे. ते डोळ्यातील भिंगाची
प्रतिकृती म्हणून नाही.
आता 7.1 ची प्रतिकृती तयार करू.
छोटे छिद्र असलेले कार्ड टोपणात घाला. ते 8 बाजूवर
लावा. ऑप्टिका अशी धरा की बाहेरून येणारा उजेड
छिद्रावाटे पडद्यावर पडेल.
आता पडद्यावरची प्रतिमा भिंगातून पाहून तपासा.
पिनहोलमुळे पडद्यावर पडलेली प्रतिमा जर नुसत्या
डोळ्यांनी पाहिली तर ती अंधुक दिसते. पण भिंगातून
पाहिल्यामुळे ती जराशी गडद आणि रेखीव दिसेल.
थोड नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल, की प्रतिमा
र कः प्रयोग 7.1 ची प्रतिकृती
उलट आहे. तुम्हाला दिसली का?
प्रयोग 7.1 मध्ये आपल्या डोळ्यात नेमकं काय घडत
होतं त्याची ही प्रतिकृती आहे. प्रयोग 7.1 मध्ये
आपण पिनहोलमधून लांबचे दृश्य पाहत होतो.
त्यावेळी डोळ्यातील भिंग जवळजवळ सपाट झालेले
असते आणि त्यामुळे प्रतिमा तयार करण्यात ते
कोणतीच भूमिका निभावत नाही. ते जवळपास
नसल्यासारखेच झाले. त्यामुळेच आपल्या चष्म्याचा
नंबर काहीही असला, तरीही चष्मा काढल्यावर
पिनहोलमधून बाहेरचे टृश्य रेखीव दिसते.
प्रयोग 7.1 मध्ये पिनहोल कॅमेरा तत्त्वाने बाहेरच्या
टृश्याची डोळ्याच्या पडद्यावर तयार होते. या
प्रयोगातल्यासारखी ती प्रतिमाही उलटी होती.
मग 7.1 मध्ये आपल्याला बाहेरचे दृश्य सुलट का
दिसले?
याचे कारण तुम्हीच आता सांगायचे आहे (थोडी मदत
- प्रयोग 7.3 पुन्हा वाचा).
User Reviews
No Reviews | Add Yours...