भारतमातेची हांक | Bhaaratamaatechii Haank

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratamaatechii Haank by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दांडी यात्रेचे पडसाद १३. “ असा घाबरतोस काय १ महार म्हणून काय अरसें भ्यायचें १ ठम्हां अस्एृद्यांचा उद्धार करण्यासाठीं महात्माजी कसे रात्रदिविस आपलें रक्त आदटवीत आहेत ह वगात नाहीं मी तुम्हाला समजावून सांगत १” ते त्या मुलाला सदानंदापुर्दे करीत म्हणाले, “ हा आमच्या शाळेतला सवात हुषार महार विद्यार्थी. शाळेंत नेहमीं याचा पहिला नंबर असतो. या वर्षी त्याला आम्ही मिडूल स्कूल स्कॉलरशिपूच्या परीक्षेला बसवणार आहों. आमचे हेड मास्तर देखील म्हणतात कीं हा मुलगा आमच्या जिल्ह्यातच काय पण साऱ्या मुंबई इलाख्यांतही पहिला येईल. ” “ शाबास ! ” सदानंद त्या मुलाला आपुलकीच्या कळवळ्याने जवळ ओढीत त्याच्या पाठीवरून प्रेमानें हात फिरवीत म्हणाला, “काय रे, तुझें नांव काय १” “ पिरा शिवा म्हार. ” तो मुलगा घाबरट नजरेन सदानंदाच्या व आबा मास्तरांच्या तोंडाकडे पाहात दोन्ही हात जोडीत उत्तरला. “ काय सांगितले आहे मीं तुला १ कर्सें नांव सांगायचे १'” आबा मास्तरांनीं किंचित्‌ भुवया चढवीत दटावणीच्या पण हसऱ्या नजरेने त्या आपल्या आवडत्या विद्याथ्यांच्या अंतःकरणाचें कवाड' उघडीत विचारलें. “ पिराजी शिवाजी काजरोळकर. ” तो विद्यार्थी पाण्यांत उमळूं लाग- लेल्या कळीसारख्या लाजऱ्या नजरेने आबा मास्तरांकडे पाहात म्हणाला. पिराजीच्या पाठीवरून प्रेमानें हात फिरवीत सदानंद आग्रा मास्तरां- कडे' पाहून म्हणाला, “ शाबास ! महात्माजींना आपण पत्र पाठवून या मुलाची हकिगत कळवूं, का हो मास्तर! स्कॉलरशिप मिळते याला!” “ नाहीं. कांहीं मिळत नाहीं. हा असा-अंगावर धड' कपडाही नाहीं, आणि कित्येकदां तर उपाशी देखील शाळेंत येतो ! मग मधल्या दुपा- रच्या सुट्टींत देऊळवाड्यांत चार धरीं हिंडून उंड्या मागून खातो. ” आबा मास्तर पिराजीची हनुवटी कुरवाळीत उद्गारले, “ उकिरड्याच्या टिगाऱ्याखालीं दडपले गेलेले असले कोहिनूर हिरे त्या उकिरिड्याच्या राशी आम्ही त्यांच्यावर रचलेल्या आमच्या हाताने उपसून टाकून असे उजेडांत आणले पाहिजेत, अशा हिऱ्यांच्या दिव्य
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now