रागिणी | Raagini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raagini by वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अपघात. करण्याकरिता “ईश्वर १ शब्दाची शास्त्रीबुवांनां किती ओढाताण करावी लागली, हें त्यांचे त्यांनांच ठाऊक ! वेदांतील हास्यास्पद प्रार्थना घेऊन नानासाहेबांनी वेदांची टवाळकी केल्यावर मग मात्र शास्त्रीबुवा संतापले. शास्त्रीबुवा बहुधा संतापत नसत; पण आज काय झाले कोणाला ठाऊक, त्यांचें माथे फिरले, आणि त्यांनीं इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनां, अज्ञेयवादी हिंदी सुधारकांनां व त्यांच्या सुधारणां*नां खूप दिव्या देऊन घेतल्या. सामाजिक सुधारणेच्या त्यांनीं आपल्या जिमेच्या पट्ट्याने अगदीं चिंघड्या उडवून दिल्या ! हें पाहून गंभीरखृत्ति नानासाहेबांचें मनहि क्षुब्ध होऊं लागलें. वादविवाद करीत चालतांचालतां आपण किती वाट चाललो याचें, व कोठें आलों याचें मंडळीला भान राहिलें नाहीं. त्यांच्या डाव्या हाताला आता उंच डोंगराचा कडा, व उजव्या हाताला खालीं घोर दरी लागली होती. वाट जेमतेम एका माणसापुरतीच होती. शास्त्रीबुवा सवत पुढें, त्यांच्या पाठी- मागें नानासाहेब, आनंदराव, भाऊसाहेब, व त्यांच्या पाठीमागें उत्तरा वगैरे बायका, आणि शेवटीं जनुभाऊ चोरट्यासारखे चालले होते. पुष्कळ वेळ चालल्यामुळें बायका दमून गेल्या; पण पुरुषांचे या गोष्टीकडे लक्ष्य गेलें नाहीं. कोण किती चाळ शकेल, याचे वादाच्या भरांत त्यांनां भान राहिलें असेल, तर ते या गोष्टीचा विचार करणार ना! वायूच्या झटक्यामुळें उत्तरा बरीच अशक्त झाली होती. ती तर या चाल- ण्यानें फारच दमली. पण आजच्या फिरण्यानें तिचा एक फायदा झाला. नानांचा व शास्त्रीबुवांचा तो शुष्क वाद ऐकून, व या क्षुल्लक प्रश्नांबद्दल आपली भैत्री विसरून ते अगदीं हमरीतुमरीवर आलेले पाहून तिला आपल्या विवाद- प्रवृत्तींतील दोष चांगलाच दिसून:आला. “मीसुद्धां अशीच वादामध्यें संतापतें,” अर्सें ती मनाशीं ह्यणाली, व याउपर वादांत फारसें बोलावयाचे नाहीं, असा तिने निश्चय केला. उत्तरेच्या मनःस्थितीची गोष्ट ओघालाच आली आहे, तेव्हां येथें हेंहि सांगावयाला हरकत नाहीं, कीं, तिचा स्वभाव व तिचे विचार यांमध्यें आतां बराच पालट झालेला होता. पूर्वीचे तिचे घाष्ट्ये जात चाललें, व त्याबरोबर दुदेबॅकरून तिच्या मनाचा मोकळेपणाहि जाऊं लागला. वयाला इतकीं वर्षे झालीं होतीं, तरी उत्तरा इतके दिवस पुरुषांनां विशेष लाजत नव्हती, १५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now