विचार सौंदर्य | Vichaar Saundarya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vichaar Saundarya by वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाकाव्ये बाबतींत गोंधळ असतो तो दूर करण्याला असलें विडंबन आवश्यक आहे. प्रो. पयवर्धनच उपरिनिर्दिष्ट टीपेंत म्हणतात--- “: रुक्ष प्रदेश, नीरस भूरचना, सदा बदलणारी हवा, धबधब्याचा आवाज वगेरे गोष्टींच्या साहचर्यामुळें वडस्वर्थ कवीचा स्वभाव सरळ, साधा, गंभीर, न डगमगणारा, प्रसंगाला निमूटपणे तोंड देणारा, घिमा आणि नीरस किंवा विनौद- शून्य झाला असे म्हणावयास जागा आहे. परंतु त्याच किंवा तशाच धबधब्यांच्या, विजांच्या, वावटळींच्या, झंझावातांच्या संगतीमुळें देले, बायरन यांच्या वृत्ती उद्दाम, बेधडक मुसंडी मारणाऱ्या झाल्या असाव्या. * [काव्य आणि काव्योदय, पृष्ट २०] वरील अवतरणांतील हेत्वाभास दाखविण्याकरितां एक कल्पित गोष्ट सांगणे साईचें आहे. कांही मंडळी एका बागेत गली असतां त्यांना एक गुलाबाचे झाड दिसले. त्यांतील एकाने गुलाबाचे एक मोठें फूल तोडून हुंगलें दुसऱ्याने एक अधेविकसित फूल तोंडून बटनहोलमध्ये घातले; तिसऱ्यानें पाकळ्या तोडून टाक- ण्यास आरेभ केला; चवथ्यांने “ या गुलाबाचे फ्रेंच नांव कायंससे आहे ते काय बरे १ ” असें म्हटलें व डोकें खाजविण्यास आरंभ कला; पांचव्याने आमच्याकडे या फ्रच जातीचा गुलाब नाहीं, पण दुसऱ्या जातीचा आहे असे म्हटले; सहाव्याने आपल्या मुलीकरितां कांहीं फुले ताडलीं; सातव्याने आपल्या सहचरीला एक फूल तोडून दिलें व आठव्याने गुलकंदाकरितां कांही फुलें तोडून हातरुमालांत घातली ! नववा मागे मारग रेंगाळत होता त्याचे कारण असे की, त्याला आपल्या गत प्रियतमेच्या गुलाबी गालांची व हास्याची आठवण होऊन तो उदास झाला होता; आणि दहावा गालांतल्या गालांत हंसत तेथेच उभा होता, कारण त्याला गडकऱ्यांच्या “ गुलाबी कोड़ा 1 ची आणि केशवकुमार अन्यांच्या * प्रेमाच्या गुलकंदा * ची त्याच वेळीं आठवण झाली ! आतां प्रस्तुत गुलाबाचे झाडच तेथे नसते तर गुला- बाच्या संबंधीं या भिन्न ठृत्ती व ही भिन्न कर्म शक्यच नव्हतीं; तेव्हां * गुलाबाचे झाड 1 ही परिस्थिति या सर्व कायाचे कारण आहे. आणि यावर कोणी जर आक्षेप घेऊ लागला कीं एकच कारण भिन्न काम कशीं घडवून आणतें, तर प्रो. पटवर्ध- नांप्रमाणें * स्वभावभेदामुळें ' हें उत्तर सांगून मोकळे व्हावे ! उपरिनिर्निष्ट दहाहि कार्ये गुलाबाच्या झाडाच्या अभावीं अशक्य होतीं, तेव्हां या अथाने तें झाड “ कारण ' या संज्ञेस पात्र असलें, तरी या झाडामुळे हदी कार्ये घडली या म्हणण्या- ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now