वसईची मोहीम | Vasaichi Mohim

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वसईची मोहीम  - Vasaichi Mohim

More Information About Author :

No Information available about यशवंत नरसिंह केळकर - Yashvant Narsingh Kelkar

Add Infomation AboutYashvant Narsingh Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ वसईची मोहीम या सर्व कसोट्या लावून पाहिलें तर असें दिसतें कीं, ही बखर पुष्कळशी विश्वसनीय मानावी लागते. तींत फिरंग्यांनीं साष्टी-वसईे प्रांत जिंकल्यापासून तों अखेर साष्टीप्रांत इंग्रजांच्या हातीं जाइंपर्यंतची हकिकत सांगितलेली आहे. तथापि त्यांतील मुख्य हकिकत १७३९ मधील वसईमोहिभेसंबंधींचीच आहे. व हाकेकतींत फारशा कालाचुक्रमाच्या चुका झालेल्या नाहींत. त्यापुरतेच पहावयाचे तर एकदोन चुका सांगतां येतात. बखर्राच्या १७ व्या पानावर १७३८ च्या जानेवार्राच्या सुमारास आपासाहेब फिरंगाणांत ठाण्यास आले असें सांगून नंतर धारावींस झालेल्या लढाईची हकिकत दिली अहे. व त्यानंतर कडदिनानें धारा- वांचा मेढा चेतला व मराठ्यांशी लढाई दिली त्यावेळची हकिकत दिली आहे. वास्ताविक ती हकिकत १७३७ च्या मेमध्ये घडली. व धारावीच्या सेढ्यावर फिरंगी चालून गेले ती हकिकत १७३८ च्या फेब्रुवारीमधील आहे. सारांश, १० महिन्यांच्या अंतरानें घडलेल्या दोन लढायांच्या काळांत बखरकारानें काळाची आलटापालट केली. १७३७ पर्यंतची फिरंगाणाची हालहवाल, तेथे चाललेली पेशव्यांचीं भेदाचीं कारस्थाने, इत्यादिकांची हकिकत बखरकारानें पुष्कळ दिली आहे. परंतु पेशवे दप्तरांतांल नवीन निघालेल्या कागदपत्रांचा प्रत्यंतर पुरावाहि अपुरा पडत असल्यामुळें त्या हृकिकतींत आलेल्या गोष्टी कालाचुक्रमपूरण आहेत कीं नाहींत तें सांगतां येत नाहीं. बखरकारानें नक्की कालाचा उल्लेख असा फक्त दोन-तीन ठिकाणीच केला आहे. एक ठारणें-सा्टीस वस्ती झाली त्यासंबंधीं व दुसरा फिरंगाण मोडले, वसई कार्बाज झाली त्यासंबंधीं. ते उल्लेख असे. (१ ) “फिरंगी निघून बतेल्यावर चढून गेला. शके १६५९ पिंगलनाम संवत्सरे माहे चैत्र झ। ७ रविवार ते दिवशीं साष्टीस वस्ती झाली. लष्कर ठण्यास गेलें. ११( २) “ शके १६ ६१ सिद्धा्थीनाम संवत्सरे वेशाख शु॥। ९ या दिवशीं फिरंगाण मोडला. ” (३)“शके १६९६ त इंग्रजांनीं मुंबईहून पलटणें आणोन ठाण्याचा किल्ला सर करून घेतला. ” एरवीं बखरकार “ पुढले सालीं ? “ पुढील वर्षी १? * पुढे अश्विनमासीं १ * त्याच वर्षी श्रावणमासांत ? “* मग ? “* त्याजवर सराईस * “ मग दोन वर्षांनंतर १ * पुढें चौथे वर्षी * * पुन्हा वैशाखमासीं * “* नंतर ” * मग दुसरे सालीं ? * इकडे असें झालें तेच दिवशीं १ “ इतक्यांत १? “* इकडे हॅ वतेलें तॉ १ * तिकडे १ * त्याजवर १ असे मोघम उल्लेख करतो. बखरीच्या पहिल्या पॅऱ्यांत फिरंग्यांनीं घमेच्छल केला त्याची हकिकत आहे, ती संकलित असली तरी सर्वस्वी बरोबर आहे. दुसऱ्या व तिसऱ्या पेऱयांत अणजूरकरांच्या घराण्याची हकिकत असून सत्यांनीं संभाजीमहाराज, बाळाजी विश्वनाथ, श्रीपतराव प्रतिनिधि, खंडेराव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now