जा माझ्या माहेरा | Jaa Maajhyaa Maaheraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaa Maajhyaa Maaheraa by सरोजनी बाबर - Sarojani babar

More Information About Author :

No Information available about सरोजनी बाबर - Sarojani babar

Add Infomation AboutSarojani babar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द्ह्ा जा माझ्या माहेरा काळजीनें घेरलेले असतें. म्हणून खेडोंपाडींची मंडळी धराण्याचा “पदर पालव* । कसोशीने पारखून घेतात. एकमेकांची संस्कृती जुळतीमिळती राहील यासंबंधी दक्षता घेतात. त्यामुळें स्वाभाविकच मुलीबाळींच्या कानांवर सासर-माहेरच्या गोष्टी वारंवार पडतात; आणि त्या या ना त्या कारणानें त्यांच्या वाणीत रुळूनही जातात. म्हणूनच कीं काय लहानपर्णी भोंडला (हादगा) घालतांना “ सासरच्या वाटे कुचुकुचू काटे ” किंवा “ अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीतं अस्सं माहेर गोड बाई खेळाया धाडीत”? असलीं गाणीं पोरीबाळी म्हणतांना ऐकूं येतात. त्याचबरोबर हीं गाणीं शिकविणारी त्यांची वडीलधारी आजी अगर आई किंबा मात्रशीही--- “ तुपांतलं कारलं आजीरलं ग सई गोञजीरलं ग कोण्या तुम्नीणिनं रांघलनूं ग सर रांधळं ग....”” असल्या गोष्टी अगर--- “ नणंदा भावजया दोघीजणी शिंक्यावरचं लोणी खां कोणीं, . .”” या प्रकारच्या गोष्टी गीतांतून गुंफवीत मोठ्या आत्मीयतेने रंगून गेलेल्या आढळून येतात. आणि अखेरीस-- “ तुपात तळली, साखरेत घोळली जिलबी बिघडली....”' या न्यायाने सासरपेश्षां माहेरच कसं चांगले असतं, याच्या बहमरदार कहाण्या ऐकवीत रहातात. अशा वेळीं त्यांना होणारें समाधान पोरीबाळींच्याही हाडींमासीं उतरते ! आणि सासरपेश्षां माहेरच चांगले वाटून त्या सदैव--- रुणझणत्या पांखरा रे जा माझ्या माहेरां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now