वामन मल्हार | Vaaman Malhaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaaman Malhaar  by वा. ळ. कुळकर्णी - Va. L. Kulkarni

More Information About Author :

No Information available about वा. ळ. कुळकर्णी - Va. L. Kulkarni

Add Infomation AboutVa. L. Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पक भ्रेष्ठ वाड्ययीन व्यक्तिमत्व र तो काव्यांत आधिक्याने वसत असल्यामुळे त्याचें परिशीलन हें अ्थसौंदर्य निष्पत्तीच्या दृष्टीने एकदा करून भागत नाही. त्यांतील सौंदर्याचा संपूर्ण आस्वाद घेण्यासाठीं तें वारंवार करावें लागतें; व प्रत्येक वाचनाबरोबर नवीं नवीं अर्थात्मक सौंदर्य आपल्या दृष्टीला पडत असतात, हेंहि खरें. एवढेंच नव्हे तर जितक्या वेळां अधिक तें वाचले जातें तितक्या वेळां त्यांत दडलेल्या सौंदर्याची वेगवेगळीं अंगे रसिक वाचकांस आधिक्याने प्रत्ययास येतात हा अनुभव आहे; अथात्‌ हा अनुभव गद्य-वाझ्मयाच्या वाचकांच्या वाट्यास येत नाही असें म्हणतां येणार नाही. * सूचना ? ज्या प्रमाणांत काव्यांत वास करते, त्या प्रमाणांत गद्य-वाड्मयांत वास करीत नाही, ही गोष्ट खरी असली तरी तिचें गद्म-वाझ्मयांतील वास्तव्यच त्याच्या ठिकाणी ही नवनवीन सौंदर्य प्रतिक्षणी प्रगट करण्याची शक्ति आणतें हें उघड आहे. ललित- वाढ्ययाच्या सगळ्या गद्मप्रकारांतून ह्या “सूचना? सुणांचें अधिष्ठान कसें असतें हें शोधून काढणें मनोरंजक असलें तरी तें भापणांस अभिप्रेत नाहीं. ललित-वाड्ययाच्या गद्यप्रकारांतहि नवनवीन सौंदर्य प्रगट करण्याची ही शक्ति वसत असते, एवढेंच आपण लक्षांत घेतलें आहे; व ज्या लेखकांच्या लिखाणांत ही अतिशंयत्वानें असते त्या लेखकांच्या लिखाणांतील गोडी अवीट राहते ह त्यावरून स्पष्टच होत आहे. ह्या दृष्टीने विचार करतां अर्वांचीन मराठी गद्य ललित-वाड्मयाच्या लेखकांमध्ये ही शक्ति कोणकोणत्या लेखकांच्या लिखाणांत विशेषत्वाने आढळतें तें आपण सहज जातां जातां पाहात आहोत, नाटककारांत गडकरी, खाडिलकर, कोल्हटकरांचीं नांवें; कादंबरीकारांत हरिभाऊ आपटे ह्यांचें नांव व एकंदर सर्वच प्रकारच्या वाढ्ययाचा विचार करतांना श्री. तात्यासाहेब केळकर ह्याचें नांव, हीं नांवें डोळ्यांपुढे येतात; परंतु हीं नांवें डोळ्यापुढे आलीं तरी त्यांचें समग्र लिखाण डोळ्यापुढे येत नाही: त्यांतील कांही भाग तेवढा आलासा वाटतोः कांही भागाबद्दल अशाश्वती वाटते; कोठें बुद्धीची चमक दिसते, परंतु जीवनाचा अर्थ उलगडण्याची घडपड दिसत नाही; हा अर्थ शोधण्याचा घडपड करणारी, मधूनच थकून मूक बनणारी, परंतु त्या मूका- वर्स्थेतच अत्यंत बोलकी भासणारी, सखोल, व्यापक बुद्धि दिसत नाही. कोटेः सहानुभूति दिसते, सूश््मावलोकन दिसतें, जीवनाच्या विशिष्ट अंगोपांगांचें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now