भ्रमाचा भोपळा | Bhamaachaa Bhopalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhamaachaa Bhopalaa  by प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिवाय का कुठं खरूज येते? एवढ्यासाठी मला घराचा दरवाजा बंद करून दिंडीशीं भय्या बसवावा लागला ! [ भय्याचा वेष घेतलेला निरंजन टपाल घेऊन येतो. कचेश्वर : दरवाजा छोडकर यहां क्याँ आया, भय्या ? निरंजन : टपाल लेकर आया साहब! वो पोस्टमन अंदर आना चाहता था! लेकिन मेने उसको बाहर हकाल दिया ! कचेश्वर : (टपाल बघत) हा बघ पत्रांचा केवढा गहा आला आहे तो पोरटां- तून ! आपल्या पोरींच्या प्रेमासाठी तळमळणाऱ्या उमेदवारांचे अर्ज असतील हे सारे ! विलायतची डाक आल्यासारखीं येत असतात प्रेमपत्रं हीं रोज अशीं ! कांहीं दिवसांनीं मला आपल्या घरांतच एक लहानसं पोस्ट ऑफिस उघडावं ळागेल ! विद्यागौरी : कावीळ झालेल्या माणसाला सारंच पिवळं दिसतं, तसं आहे तुमचं ! साऱ्या मुलखाचे तुम्ही संशयी ! दुम्हांला एक देखील सरळ दिसायचं नाहीं ! माझ्या नांवाची आलेलीं हळदीकुंकवाचीं कार्ड देखील तुम्ही कधीं माझ्या हातीं लागू देत नाहीं ! कचेश्वर : अभीतक तुम यहां क्यों खडा है भय्या १ चले जाव दरबाजेपर ! नहीं तो कोई आदमी अंदर घुस आयिगा ! निरंजन २: आप फिकीर मत करिये साब, कोई अंदर नहीं आयेगा ! कचेश्वर : नही आयेगा काय १ परवांचे दिवशीं दुपारी एक माणूस सरळ आंत शिरला आणि खुद्याल आपला वर चालला होता ! मीं जिन्यांत अडवला म्हणून बरं झालं ! म्हणतो काय मला तो, कीं माझा पतंग अडकलाय वर गचचीवर ! तेव्हां मीं त्याची मानगूट पकडली भागि त्याला वावडीसारखा बाहेर भिरकावून दिला ! तूं बसला असशील त्यावेळीं घोरत कुठं तरी! ऐसा गाफिल रहता है तुम्‌! किसीकू अंदर मत आने दो ! निरंजन : अच्छा साब ! अगर मेरा बाप का बाप भी घुस आय तो मै उसे अंदर नही आने दूंगा ! [ जातो. कचेश्वर : म्हणून म्हणतो कीं इतका सारा उपद्व्याप करण्यापेक्षां या पोरींच्या लग्नाची खटपट एकदांची नाहिशी करून टाकली म्हणजे झालं, त्यांतून माझी प्रकाति ही अशी ! करी काय होईल याचा नेम भाहे का ! रॅ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now