आपापळें हितगुज | Aapaapalen Hitaguj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aapaapalen Hitaguj by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
3 3 3 माझ्या घराण्याची मला म्हणण्यासारखी कसलीच माहिती नाही मला आई होती येवढेच काय तें मला माहीत आहे. गुलामांच्या वसतीत राहात असतांना, आणि पुढंही, आम्हां काळ्या लोकांत चाललेली सभाषणाची कुजबुज माझ्या कानी पडे आफ्रिकेतून अमेरिकेत येतांना गुलामांचा काय छळ झाला त्याची हकीकत मला या कुजबुजीवरून प्रथम कळली या गुलामांतच माझ्या आईच्या माहेरची माणसं होतीं त्यांचा अनन्वित छळ झाला होता, तथापि चौकशी करूनही या माणसांची कसलीही माहिती मला उपलब्ध झाली नाहीं; आई होती येवढेच काय तें निश्चित आहे तिला एक सावत्र भाऊ ब एक सावत्र बहीण होती गुळामांगेरीच्या द्विसांत नीग्रो माणसां- पैकीं कणाचा कोण होता आणि तो कुठला होता याची पंचायती कोणी करीत नसे, आणि त्यांच्या नात्यागोत्याची नोंदही कोणी ठेवीत नसत गुलाम विकत घेणाऱ्यापिकीं एकाचें लक्ष माझ्या आई- कडे गेले, इतकच पुढं हा गृहस्थ तिचा व माझा मालक झाला. त्याच्यापाशी असलेल्या गुलाम मडळींत माझी आई थेऊन दाखल झाली, पण यांत विशेष काहींच नव्हतं एकादे नवें घोडे, नाहीं तर, एकादी नवी गाय गोव्यांत येण्यांत व आई त्याच्या घरीं येण्यांत कांहींच फरक नव्हता आईविषयीं मला जितकी माहिती आहे त्याहीपेक्षा मला माझ्या बापाविषयीं कमी आहे मला इतर्केच ठाऊक आहे कां, माझा बाप गोऱ्या लोका्पेकी होता, पण कोणीही असला तरी इतकें खरें आहे कीं, त्याने माझी पूसतपास केल्याचें किंवा माझ्या खाण्या- पिण्याची व्यवस्था केल्याचें माझ्या ऐकिवात नाहीं तथापि या कामीं माझ्याने त्याला दोष देववत नाही. या राष्ट्राने त्या काळीं दुदैवाने पतकरलेली जी गुलामगिरीची संस्था तिचा इतर लोकांप्रमाणे त्यानेही उपयोग करून घेतला होता इतकेच. नरे--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now