पाळापाचोळा | Paalaapaacholaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paalaapaacholaa by न. चिं. केळकर - N. C. Kelkar

More Information About Author :

No Information available about न. चिं. केळकर - N. C. Kelkar

Add Infomation About. . N. C. Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ ोटारीचे कर्ण “बोला आतां अशा प्रश्नाला इंग्रजींत (0५८5४०० ०£ ०१११८4 । म्हणतात. म्हणज तो प्रश्न विचारणाराचा आशय असा असतो कीं दुसऱ्याने त्याचें उत्तर “होय, अगदीं बरोबर? असें थोडक्यांत नेमकें देऊन याचें संवादी समर्थन करावें. पण ज्याला आपल्या सयुक्तिक व्तेनाचा किंवा तकशुद्धतेचा इतका आत्माविश्वास वाटतो त्यानें दुसऱ्याकडून * होय बरोबर ? अशा हुकमी उत्तराची अपेक्षा तरी कां करावी १ तें अपील एखादे वेळीं फुकट जावयाचे. नामंजर व्हावयाचे ! पण नाहीं. मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो. गाण्यांतल्या स्वरांप्रमाणेंच हें संभाषणांतले प्रश्नोत्तरांचें संवादित्व म्हणाना ! संवादित्वाच्या अपेक्षेचा दुसराहि एक प्रकार संभाषणांत आढळतो. एका मित्राला वाटतें कीं, आपण बोलले तें यथाथ समर्पक आहे. पण याचें समर्थन तो दुसऱ्याच्या तोंडच्या उत्तराने मागत नाहीं, तर हात पुढें करून टाळीनें मागतो. जर खरोखरच दुसऱ्याला त्या पहिल्याचें बोलणें अगदीं तेतोतेंत व एकदम “* होय? म्हणण्यासारखें पटलें असेल तर, त्याला पहिल्याच्या उघड्या तळहातावर टाळी दिल्याशिवाय राहवत नाहीं. पण पुष्कळदां असें होतें कीं ही टाळी पडत नाहीं. कारण त्याचें बोलणेच जर याच्या मनाला पटलें नाहीं तर टाळी द्यायला याचा हात वर उचलणार कसा १ आणि टाळी घेण्याकरितां हात पुढें करावा पण त्यावर ती न पडल्याने तो माघारा घ्यावा लागावा--या- सारखी लज्जास्पद, हास्यास्पद, मानहानिकारक गोष्ट त्या वेळीं दुसरी कोणतीच नसते, लग्नांत वधूच्या हातची माळ गळ्यांत पडण्याच्या अपेक्षेने वराने मान पुढें करावी, पण वधूच्या हार्ती माळच नसावी किंवा ती हातांतल्या हातांत तुटून पडावी, यानें वराची जी स्थिति होत असेल तीच टाळी घेण्याकरितां पुढें केलेला हात मागें घेणाराची होते ! मिळून काय १ संवादित्व नाहीं ! काम बेसुरेल झाले ! अशा साध्या गोष्टींताहि संवादित्व साधत नाहीं ! आणि मनुष्य अपेक्षा करणार सव लोकमतानें माझ्या मताच्या गाण्याची सुरेल संवादी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now