इंदिरा | Indiraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Indiraa by बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyayभा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

More Information About Authors :

बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

No Information available about बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

Add Infomation AboutBamkim Chandra Chattopadhyay

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ब दि सी सलिल ललल र मी आकाशाकडे पाहिलं--किती सुंदर निळे निळं होतं ते | वर पांढरे पांढरे ढग थराथरांने रचले जात असतांना त्यांतून वेगवेगळ्या मूर्ती निमीण होत होत्या. छोटे छोटे पक्षी उडत असतांना त्या निळ्या आकाशाच्या चादरीवर ढगांचे पांढरे शिटकाव झाडल्यासारखे दिसत होते. असं वाटलं, माणसाला पक्ष्यासारख उडता यायची विद्या कुणाला साध्य झाली नाहीं का १ मी पक्षी असतें-मला पंख असते तर एकदम उडून नसते कां गेलें मी मुक्कामावर १ पुन्हा सरोवराकडे माझी नजर गेली. मी थोडीशी घाबरलें, भोयांखेरील बाकीचे सर्व लोक स्नानासाठीं पाण्यांत उतरले होते. दोन बाया होत्या माझ्या- बरोबर-एक सासरची अन्‌ एक माहेस्ची. त्या दोघीही पाण्यांत उतरल्या होत्या. मी थोडीशी घाबरले. जवळ कुणी नाहीं. ही भयाण जागा--इथे थांबळों तें बरं केलं नाहीं. काय करायचे ! कुलवधू होतें ना मी !१ तोंड उघडून कुणाला हांक मारायची कशी ! इतक्यांत मेण्याच्या दुसऱ्या बाजूला कसलातरी आवाज झाला. पलिकडल्या वडाच्या झाडावरून खालीं कांहींतरी पडल्यासारख वाटलं. मी त्या बाजूच दार थोडंसं उघडून पाहिलं--एक कळाकुट्ट भला जाडजुड माणूस मला तिथं दिसला. भीतीने मी दार बंद केलं--यावेळीं दार उघडं ठेवणंच बरं असं माझ्या ध्यानांत आलं--मी दार उघडतें न उघडतें तोंच आणखी तक्षाच एका माण- सानं झाडावरून खालीं उडी घेतली. पहातां पहातां भाणखी एक जण आला[-- पुन्हा एकाने उडी घेतली -- एका मागून एक चार असामी झाडावरून उडी मारून आले आणि माझा मेणा खांद्यावर घेऊन एकदम पळत सुटले. तें पहातांच, “कोन है रे कोन हे रे? करीत आमचे दरवान आरडा-ओरडा करीत पाण्याबाहेर आले. त्यावेळीं मला कळून चुकलं, कीं मी डाकूंच्या हातीं सांपडलें. आतां लाज कसली धरायची १ मेण्याची दोन्हीं दारं उघडली. उडी मारून पळून जावं असा विचार करीत होतें पण माझ्याबरोबरचीं माणसं आरडा-ओरड करीत मागून येत आहेत असं पाहून मला घीर आला. पण थोड्याच बेळांत तो भ्रम दूर झाला. वाटेतल्या झाडावरून कितीतरी डाकू उड्या मारून खालीं आले. हीं वडाची झाडें पाण्याच्या कांठीं होतीं. ज्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now