चढाओढ | Chadhaaodh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
79
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक पाहेला-प्रवेश पाहेला $
गणपतराव:-आतां हद्द झाली; इथं सांगतात, थांबा वेळ आहे,
आणि तिकडे सांगतात, आटपा उशीर झाला. ( घाम पसून ) छे, माण-
साला वेडच लागायचं.
सरस्वती:--आणखी किती वेळ लागणार आपलं आटपायला ?
गणपतराव:-जरा थोडा धीर धरावा कीं नाहीं माणसांनी. तुमचे
काय ? चांगलं जागच्या जागीं ऐटीत बसायला मिळतं आहे. नाहींतर
माझ्या जिवाची पहा किती धांवपळ.
सरस्वती:-तुम्हींच सांगितलंत कीं या जागेवरून हाळूं नका
आणि आतां आपणच कुरकुर करतां आम्ही एके ठिकाणीं बसून राहिलॉ
म्हणून.
गणपतराव:-अरे पण-
सरस्वतीः-पुरे झाली तुमची महाबळेश्वरची यात्रा.
गणपतरावः-जेवणानंतरची वामकुक्षी ब॒डाली कीं-बरं बसा स्वस्थ
आरामांत.
सरस्वतीः-होय, पण आपलं आटपा एकदां लवकर.
गणपतराव:-होय, तें पहा उघडळंच तिकिट आफिस ( घांवत
जाऊन पांचसहा माणसांना ढकलून सर्वांच्या पुढं तिकेटें काढा-
यला जातो. )
एक ग्रहस्थः-अहो महाराज, जरा पायाखाली पाहून चालावं.
तिकिट मास्तर:-सवौनीं आपापल्या पाळीने तिकिटे घ्यावीत.
पाठीमागून पुढें घुसूं नये.
गणपतरावः-( पुटपुटत, कुरकुरत ) अरे रामा ! माझं सामान,
माझी मंडळी. (वांकडे तोंड करून रांगेच्या शेवटीं जाऊन उभा
राहतो. )
( समशेर बहादुर संभाजीराव भॉसले व त्यांची पेटी घेऊन त्यांचा नोकर
रामू प्रवेश करितात. )
User Reviews
No Reviews | Add Yours...