बाईळवेडा | Baaiilavedaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
272
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)विस ति त मिति सिक सिमिति रिल तिर अ सि विमित मि सि कि लि सि सिप मि मि ििसिििसिििििसििसिमिसिलिनिि
वतांना दिला असून अक्कलशन्यता तेवढी गरीबांच्या वांद्याला घातली आहे
ह्याच तत्त्वावर जगाचे सारे व्यवहार चालले आहेत !
मी माधुकरीचे शिळे तुकडे ताटांत वाहून घेऊन जेऊ लागलों म्हणजे
माझ्यापुढें नेहमीं असा एक प्रश्न उभा राही; तो हा कीं, जगांतले सारेच
जीव सारखेच सुखी किंवा सारखेच दुःखी कां नसावे १ परमेश्वर समन्यायी
असून यच-यावर्जीव जर त्याचीच लेकरं आहेत, तर एक गरीब व एक श्रीमंत
असा त्यांच्यांत भेदाभेद कां असावा १ आम्ही गरिबांनींच काय त्याचें असें
घोंडे' मारले आहे !
आईला एकदां मी हा प्रश्न विचारला, तेव्हां ती उत्तरली, “ बाळ, तुझ्या-
सारख्या कर्तबगार मुलावर जसा माझ्यासारख्या आईचा विश्वास असतो,
तसाच देवाचाहि विश्वास असतो. तूं मनगटाच्या जोरावर श्रीमंतीचशी काय; पण
स्वतांसाठीं नवी सष्टीहि निर्माण करूं शकशील. तुला आयतें वैभव देवानें देणें
म्हणजे तुझा अपमान करणेंच नव्हे काय? ज्या दुबळ्या जीवांना वडिलोपार्जित
वैभव व संपत्ति यांशिवाय तरणोपाय नाहीं, अशांनाच देव श्रीमंत लक्ष्मीवंतांच्या
पोटीं जन्माला घालीत असतो. आम्ही दुबळ्या बायका नाहीं का घरांत बसून
तुम्हां पुरुषांच्या जीवावर सुखें भोगतों; हा आमचा बाईलपणा 'व श्रीसंतांची
श्रीमंती हीं सारख्याच दर्जाचीं आहेत. ”*
आईच्या उपदेशाने माझ्या आंगीं नवीन स्फूर्तीचा संचार होई. त्यासुळें
मनुष्य हा आपल्या दैवाचा नियंता आहे, हा सिद्धांत माझ्या अंतःकरणांत
सोळा आणे बाणला. त्या घटकेपासून मी माझ्या मनाची समजूत करून घेऊं
लागलों कीं, गरिबी व लाचारपणा हीं कांहीं माझ्या पांचवीला पुजलेलीं नाहींत.
माझे बाबा लाचार नव्हते, माझी आई लाचार नाहीं, मगं मी तरी लाचार
कुणासारखा होऊं १ माझाहि भाग्योदय होईल, इतकेंच काय, पण मी गरीब
आहें म्हणूनच माझें भाग्य उद्याला यायचा विशेष संभव आहे. थोर गणल्या
जाणाऱ्या कितीतरी विभृतींचीं चरित्रें माझ्या अवलोकनांत आलीं होतीं,
त्यांचा अभ्युदय गरीबींतून झाला होता, असें कळतांच तर॒ माझ्या गारिबीचा
मला विषाद न वाटतां उलट अभिमान वाढू लागला. समाजाचा, जगाचा,
किंवा देशाचा उद्धार करण्याचें सामथ्ये गरीबींतूनच थोर पदवीला चढलेल्या
महात्म्यांच्या हातूनच तडीला जातें. परमेश्वराच्या पूजेचे केंद्रस्थान बनलेल्या
कम
User Reviews
No Reviews | Add Yours...