कांही पाउलें १ | Kaanhiin Paaulen 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaanhiin Paaulen 1 by काकासाहेब काळेळकर - Kakasaheb Kalelkarभाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

More Information About Authors :

काका कालेलकर - Kaka Kalelkar

No Information available about काका कालेलकर - Kaka Kalelkar

Add Infomation AboutKaka Kalelkar

भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

No Information available about भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

Add Infomation AboutBhau Dharmadhikari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२३ मंगल, अधिक सुंदर करण्याकडे त्यांचा विनियोग केला, सदगणाचा हा घर्मच आहे कीं तो कधीं संकुचित राहूं शकत नाहीं. व्यक्तिस्वरूपांतून समाजस्वरूपांत अशी त्याच्या विकासाची गति आहे. ही गति श्री. दादासाहेबांच्या चरित्रावलोकनावरून चांगली प्रत्ययास येते. अर्थांत त्यांचें चरित्र वा आत्मचरित्र अजून जनतेपुढे आलेले नाहीं, पण त्यांच्या या दिनदृत्तांतून जेवटें पहावयास मिळतें तेवढ्यावरून वरील सिद्धान्ताची सत्यता पटण्यास हरकत नाहीं. मात्र गांधीजींच्या प्रभावाने ज्यांच्या स्वभावाला अथवा जीवनाला कलाटणी मिळाली अश्या मंडळींत दादासाहेबांची गणना करतां येणार नाहीं. ते स्वभावतःच सत्यनिष्ठ- सत्याग्रही, अभिजात रुचीचे, बोलावे तस करावें या इत्तीचे, परदुःखानें द्रवणाऱ्या हृदयाचे आणि स्वतःच्या मनःशांतीकरितां परदुःखनिवारणास तत्पर होणारे असे आहेत. इंग्रजींत ज्याला *लिबरल मॉइंडेड्नेस्‌ * म्हणतात तशा उदार वृत्तीचे ते आहेत. स्वमताविषयींची निष्ठा राखूनहि इतरांचीं मतं समजून घेण्याची व त्यांना वाव देण्याची त्यांची वृत्ति आहे. त्यासुळें नित्याच्या .व्यवहयरांत त्यांचा स्वभाव चोखपणामुळे प्रथम जरी कडक भासला तरी त्याचबरोबर ते तितकेच भिडस्त व निराग्रही आहेत असे अनुभवान्तीं आढळून येतें. हा त्यांच्यांतील उदार वृत्तीचा परिणाम असावा. पुर त्यांच्या दिनवृत्तांत अशीं अनेक प्रकरणें आलेलीं आहेत कीं ज्या बाबतींत कडक राहावें अशी त्यांना आंतून इच्छा असूनहि त्यांच्यां- तील औदार्यंजन्य भिडस्तपणामुळें ते कडक होऊं शकलेले नाहींत, उदा» आत्तेष्टांना उसनवार म्हणून दिलेल्या पैशाचे प्रकरण. गांधीजींमध्ये हा सत्याचा आग्रह व इतरांविषयींची उदारवृत्ति अधिक शुद्ध स्वरूपांत वसत होती. यालाच त्यांनीं आपल्या परिभाषेत “सत्य” आणि *अहिंसा? अशीं नांवें दिलीं आहेत. यांतील सत्यनिष्ठेचा वारसा दादासाहेबांना त्यांच्या पुण्यश्लोक वाडवडिलांकडून मिळाला आहे असें दिसतें, त्यांचें दिनवृत्त वाचतांना मला स्वतःला एकंदरींत त्यांच्या प्रकृ- तीच्या घडणीविषयीं बरेंच कतूहल उत्पन्न झालें व दादासाहेबांकडे स्पष्टी करणाथं म्हणन दिलेल्या प्रइनावलींत त्यांच्या घराण्याविषयींची माहितीहि मी त्यांना विचारली. दादासाहेबांनीं मला प्रत्यक्ष कांहीं उद्बोधक परिचय
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now