महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ३ | Mahaaraashhtrachaa Saanskritika Itihaasa 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashhtrachaa Saanskritika Itihaasa 3 by शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendase

More Information About Author :

No Information available about शंकर दामोदर पेंडसे - Shankar Damodar Pendase

Add Infomation AboutShankar Damodar Pendase

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ १, विषयश्रवेश त्रण अंशतः फेडण्याचा एक अगदी नम्र प्रयत्न महाराष्ट्रीय तरुणांकरिता या पुस्तकांत करण्याचा विचार आहे. महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक इतिहास आप्रणास पहावय़ाचा आहे तो अवांचीन ज्ञात महाराष्ट्राचा होय. महाराष्ट्र हें देशवाचक नांव खिस्ती शकापूर्वी तीन चार शतकें प्रचलित असावें असें दिसते. खिस्ती दाकापूर्वी तीन शतके होऊन गेलेल्या, सम्राट अशोकाच्या कारकीर्दीच्या सतराव्या वर्षी, मोग्गलिपुत्त तित्स याने बुद्ध धमाचा प्रसार करण्याकरितां, भरतखंडांतील अनेक देशांत प्रचारक पाठविल्याचा उल्लेख “महावंस* ग्रंथांत आहे, त्यांत योनधम्मरकूखित नामक प्रचारकाला अपरान्तांत म्हणजे कोकणांत आणि महाथम्मरकूखित नामक प्रचारकाला महार देशांत पाठविलें अस लिहिलं आहे. “महावंस?' हा सीलोनच्या इतिहा- साचा ग्रंथ पांचव्या किंवा सहाव्या शतकांत रचला असला तरी स्यांतील माहिती परंपरेने आली असल्यासुळे, अशोककालीं “महाराष्ट्र! हे नाव प्रचलित होतें असें म्हणावयास हरकत नाही. अशोकाच्या शिलालेखांतील पांचव्या द्यासनांत राष्ट्रिक, पेतनिक आणि अपरान्त अशा महाराष्ट्रांतील निरनिराळ्या विभागांची नांवे आलीं आहेत. खिस्ती शकापूर्वीच्या व नंतरच्या दोन शतकांत खोदलेल्या, नाणेघाट, भाजे, कार्ले आणि कान्हेरीच्या लेण्यांत देणगीदारांचीं जीं नांवें कोरलेलीं आहेत त्यांपैकी कित्येक नांवांच्या पुढे “महारथी?” व “महारथिनी?? असे शब्द आहेत. तेही त्या देणगी देणाऱ्या स्त्रीपुरुपांचा देश महाराष्ट्र होता अस दर्षविणारे, मराठी? व '“मराठीण? अशा अर्थाचे असावेत असा कित्येकांचा तक आहे. सहाव्या किंवा सातव्या शतकांत झालेल्या दंडीने आपल्या भकाव्यादर्श? ग्रंथांत “महाराष्ट्र देशांत प्रचलित असलेल्या भाषेला महाराष्ट्री प्राकृत म्हणतात असे सांगितले आहे.* ही भाषा खिस्ती शकापूर्वी व नंतर २-३ शतके महाराष्ट्रांत प्रचलित होती, इ. स, ६० मध्ये हाल नावाच्या राजाने, या भाषरतील गीतांचा संग्रह *गाथासप्त- शती” मध्ये केला आहे. त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या वररुचीने “महाराष्ट्री” या प्राकृत भाषे'चें व्याकरण केलें आहे. * महाराष्टराश्रयां भाषा प्रकृष्टे प्राकूतं विदु: ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now