पडघवळी | Padaghavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Padaghavali by गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

More Information About Author :

No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

Add Infomation AboutGopal neelkanth Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२० पडघवळी “तूं का ऐकायचाएस १ आण.” राघूकाकांनीं अंगावर चिलखत 'चढवलं, नि दोघे टेकाडाजवळ गेले. “या महाराजा ! आलोंय्‌ गंडमाळा काढायला. ” तशीं आपलं तें एवढं थोरलं धूड बाहेर निघालं, नि या दोघांच्या समोर येऊन आडवं पडलं ! “ गगाण्या, असा पलीकडून हो. ही हळद घे. मीं कापलं कीं मग सांगेन तेव्हां घाल जखमेवर, ”' अलगद कटत्यारीन कापल्या गंडमाळा, नि वर गैगाण्यानं हळद घातली. मग पट्टीनं बांधली जखम. दोघांनीं नमस्कार केला नि राघोभट म्हणाले, ** प्रहाराजा, अशीच लागेल तेव्हां सेवा घेत चा. ” त्या रात्रीं म्हातारा पुनः स्वप्नांत आला, नि म्हणाला, “ खोता, शाबास तुझी नि शाबास तुझ्या गड्याची. आतां माझं टेकूड तेवढं मोकळं सोडून भोतालीं बागा करा. चांगल्या उठून येतील. माझ्या मानेला चार चिरे दिलेस. तुझ्या चार पिढ्या सुखानं या बागा पिकवून खातील! ” राघोभट नेमानी नागपंचमीला त्या टेकडाजवळ इवलं दूध नि लाह्या नेऊन ठेवीत. अगदीं परवां व्यंकूभावजींच्या मनीं दळभद्रीपणा उभा राहीपर्यंत तो नेम चाळू होता आमच्या घरीं. पण तें सगळं मग सांगेन. ८३. ८७ ८ 'चोंढे पाडले, बागा लावल्या--गांव हिरवागार दिसायला लागला. पण तेवढ्यांत आणखी एक अरिष्ट येऊन गेलं गांवावरून. मराठे नि मुसुनमान यांच्या अंजनवेल अन्‌ दाभोळेसाठीं सारख्या लढाया चालायच्या. दाभोळ बंदर ना? म्हणून, तर दाभोळेस मुसुनमानांचा चांगला जमाव, भल्या भक्कम जुन्या काळच्या मसुदी. बंदरपट्टीला सगळीं मुसुनमानांचीं घरं. आजहि तशींच आहेत. पडघवळली नि दाभोळच्या मधोमध एक भली उंच टेकडी आहे. एकटीच उभी आहे बापडी. चिवड्याची सुळकुंडी पुडी उपडी ठेवावी ना, तशी सुळके- दार. तिच्यावर आहे बालेपिराचं ठाणे. एऱ्हवीं पडघवलींत सुद्धां उन्हाळ्याच्या भरांत पाण्याचा कोण काहार ! पण तेवढ्या उंच बालेपिराजवळ काळ्याशार पाण्याची कसली छानदार बाव आहे ! त्या पट्टयांतल्या मुसुनमानांची बालेपिरावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now